

संशोधकांचा असा विश्वास आहे की योग निद्रेद्वारे, अवचेतन मनात खोलवर दडलेल्या निराशा मानसिक पृष्ठभागावर आणण्यास आणि कालांतराने त्यापासून मुक्त होण्यास मदत होते. कुठल्याही प्रकारच्या आजारात किंवा तणावाच्यावेळी ‘योगनिद्रा’हा उपाय एखाद्या चमत्कारिक औषधाच्या रूपात काम करतो.
योगनिद्रेचे अनेक फायदे आहेत. यामुळे रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, डोकेदुखी, पोटात घाव, दम्याचा आजार, मानेचे दुखणे, कमरेचे दुखणे, गुडघ्याचे तसेच सांध्यांचे दुखणे, सायटिका, प्रसव कानातील वेदना या सर्वच वेळी खूप फायदा मिळतो. तसेच यामुळे मन आणि मेंदूलाही खूप लाभ होतो. यामुळे मेंदूवरील तणाव दूर होतो. अपुरी झोप, थकवा आणि तणावामध्ये योगनिद्रा खूपच लाभदायक ठरते. योगनिद्रेद्वारे माणसाकडून चांगली कामे देखील करून घेतली जाऊ शकतात. तसेच वाईट सवयीदेखील सोडवता येतात. योगनिद्रेत घेतलेला संकल्प खपूच शक्तिशाली असतो. अतिशय साधीसोपी असणारी ही योगनिद्रा शास्त्रसुद्ध पद्धतीने करून आपण अनेक मानसिक, बौद्धिक तणावांना सहजपणे सामोरे जाऊ शकतो. त्यांच्यापासून मुक्ती मिळू शकतो. योगनिद्रा म्हणजे आत्मसंमोहन नाही, हे लक्षात घ्यावे.