

आजकाल अनेक लोक साखर कमी असलेली किंवा गोड नसलेली उत्पादने निवडतात. त्यावर "साखरमुक्त" किंवा "साखर न घातलेले" असे लिहिलेले असते. पण ही दोन्ही गोष्टी एकसारख्या नाहीत. मधुमेह असलेल्या किंवा साखर टाळू इच्छिणाऱ्या लोकांनी हा फरक समजून घेतला पाहिजे, नाहीतर नकळत साखर खाल्ली जाऊ शकते.
आहारतज्ज्ञ कनिक्का मल्होत्रा सांगतात की, "साखरमुक्त" म्हणजे एका सर्व्हिंगमध्ये ०.५ ग्रॅमपेक्षा कमी साखर असते. अशा उत्पादनांमध्ये थोडी नैसर्गिक साखर असू शकते किंवा कृत्रिम गोड पदार्थ वापरलेले असतात. तर "साखर न घातलेले" म्हणजे उत्पादन तयार करताना साखर घातलेली नाही, पण फळे, दूध यामधून नैसर्गिक गोडवा असतो.
"साखरमुक्त" उत्पादने अनेक वेळा कृत्रिम गोडव्यासह येतात, ज्यामुळे कॅलरी कमी असतात. पण यामुळे काही लोकांना अपचन, वजन वाढ, मधुमेहाचा धोका किंवा हृदयविकारासारखे त्रास होऊ शकतात. त्यामुळे उत्पादन घेताना त्यावरील ‘Total Sugar’ आणि घटकांची यादी नीट वाचा. शक्यतो नैसर्गिक, न साखर घातलेली व संपूर्ण अन्नपदार्थ निवडावेत.
आजकाल "साखरमुक्त" असे लिहिलेली अनेक उत्पादने बाजारात मिळतात. पण त्यात गोडवा आणण्यासाठी साखरेऐवजी कृत्रिम गोड पदार्थ (Artificial Sweeteners) वापरले जातात. हे पदार्थ जरी कॅलरी कमी देत असले, तरी त्यांचा दीर्घकालीन वापर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो.
अॅसपार्टेम (Aspartame)
सुक्रालोज (Sucralose)
सॅक्रीन (Saccharin)
सायक्लेमेट (Cyclamate)
स्टेव्हिया (Stevia) – नैसर्गिक पण प्रक्रिया केलेले
वजन वाढू शकते:
जरी हे पदार्थ कमी कॅलरीचे असले, तरी शरीराला अधिक गोडाची सवय लागते, त्यामुळे खाण्याची इच्छा वाढते.
मधुमेहाचा धोका वाढतो:
काही संशोधनानुसार हे गोड पदार्थ शरीरातील इन्सुलिन कार्यावर परिणाम करू शकतात.
पचनात बिघाड:
काही कृत्रिम गोड पदार्थांमुळे पोट फुगणे, गॅस, जुलाब किंवा अपचन होऊ शकते.
हृदयविकाराचा धोका:
विशेषतः ‘एरिथ्रिटॉल’ सारखे शुगर अल्कोहोल्स जास्त प्रमाणात घेतल्यास रक्तदाब व हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
मेंदूवर परिणाम:
काही पदार्थ मानसिक अस्वस्थता, चिडचिडेपणा किंवा डोकेदुखी निर्माण करू शकतात.
लेबल वाचून उत्पादनातील गोड पदार्थ कोणते आहेत ते ओळखा.
शक्य असल्यास नैसर्गिक आणि संपूर्ण अन्नपदार्थच निवडा.
खूप वेळा गोड लागणाऱ्या सवयीपासून स्वतःला दूर ठेवा.
मधुमेह किंवा वजन नियंत्रण आवश्यक असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.