Sugar free tea benefits: बिनसाखरेचा गोड चहा: आरोग्य आणि मन दोन्हीसाठी गोड अनुभव

तुम्ही रोज दोन कप चहामध्ये प्रत्येकी दोन चमचे साखर टाकत असाल, तर वर्षभरात तुम्ही जवळपास तीन किलो साखर खाताय, जे आरोग्यासाठी आहे घातक
Sugar free tea benefits
Sugar free tea benefitsPudhari Photo
Published on
Updated on

आपल्यापैकी अनेकांच्या दिवसाची सुरुवात गरम गरम चहाच्या कपाने होते. पण रोजच्या या सवयीत असलेली साखर आपल्या आरोग्यावर किती गंभीर परिणाम करते, याचा आपण कधी विचार केला आहे का? 'बिन साखरेचा गोड चहा' ही संकल्पना सुरुवातीला जरी काहीशी वेगळी वाटली तरी, ही एक अशी नवीन सवय आहे जी तुमच्या शरीरासाठी एक भेटवस्तू आणि मनासाठी एक नवीन 'रिच्युअल' ठरू शकते.

साखरेऐवजी मसाल्यांचा नैसर्गिक गोडवा

हा बदल स्वीकारण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे चहामध्ये साखरेऐवजी मसाल्यांचा वापर करणे. वेलदोडा (इलायची) चहाला एक नैसर्गिक गोडवा देतो. त्याचप्रमाणे दालचिनी, आलं, सुकं आलं आणि जावित्री यांसारखे मसाले केवळ चहाची चवच वाढवत नाहीत, तर त्याला 'गोडस' वाटायला मदत करतात. साखरेची गरजच भासत नाही.

साखरेचा आरोग्यावर होणारा परिणाम

तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, जर तुम्ही रोज दोन कप चहामध्ये प्रत्येकी दोन चमचे साखर टाकत असाल, तर वर्षभरात तुम्ही जवळपास तीन किलो साखर खात आहात. ही साखर शरीरात अतिरिक्त चरबी वाढवते, रक्तातील साखरेची पातळी वाढवते आणि हृदयविकाराचा धोका निर्माण करते. याउलट, आरोग्य टिकवून ठेवणे, थकवा कमी होणे, आणि वजन नियंत्रणात राहणे हाच खरा 'गोड' परिणाम आहे.

सुरुवात कशी करावी?

हा बदल लगेच होणार नाही. पण काही सोप्या पद्धतींनी तुम्ही सुरुवात करू शकता:

  • पहिल्या टप्प्यात: सुरुवातीला तुमच्या चहामधील साखरेचे प्रमाण अर्ध्या चमच्याने कमी करा.

  • दुसऱ्या टप्प्यात: त्याचवेळी चहा मसाल्याचे प्रमाण वाढवा.

  • शेवटी: हळूहळू, पूर्णपणे साखर घालणे बंद करा.

फक्त 7 ते 10 दिवसांत तुमच्या जिभेला या नवीन चवीची सवय लागेल आणि तुम्ही साखरेला विसरून जाल.

दूध की काढा?

तुम्ही दुधाचा चहा पित असाल किंवा मसाला काढा, दोन्ही उत्तम पर्याय आहेत. फक्त एकच नियम पाळा , साखर टाळा. घरगुती मसाला वापरल्यास वेलदोडा, सुंठ आणि दालचिनीचे मिश्रण चहाला गोडसर बनवते. हा बदल स्वीकारण्यासाठी फक्त एकच गोष्ट आवश्यक आहे. ती म्हणजे तुमची इच्छाशक्ती. एकदा का तुम्ही मनाशी ठरवले की, साखरेची जागा मसाल्यांनी भरायची आहे. मग चवही छान वाटेल आणि आरोग्यही सुधारेल. या बदलामुळे तुमचा साखरेवरील खर्च तर वाचतोच, पण साखरेमुळे होणाऱ्या अनेक आजारांपासूनही तुमचा बचाव होतो.

साखरविरहित चहाचे दीर्घकालीन फायदे

  • वजन नियंत्रण: अनावश्यक कॅलरीज कमी होतात.

  • मधुमेहावर नियंत्रण: रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते.

  • त्वचेसाठी फायदेशीर: त्वचेची चमक वाढते.

  • मानसिक स्पष्टता: शरीरात साखर कमी गेल्याने मानसिक स्पष्टता वाढते.

  • साखरेची लत सुटते: सर्वात महत्त्वाचे म्हणजे, साखरेची सवय पूर्णपणे बंद होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news