

वयाबरोबर ब्लडप्रेशरही वाढत जाते, हा समज सर्वत्र आढळतो. परंतु, वयाबरोबर वाढत जाणार्या ब्लडप्रेशरसाठी तपासण्या व उपचार न करणं ही चूक ठरते. कारण, कोणत्याही वयात वाढणार्या ब्लडप्रेशरपासून अपंगत्व किंवा मृत्यू याचा धोका टळलेला नसतो. जास्त ब्लडप्रेशर असणार्या रुग्णांपैकी 90 टक्के रुग्णांत त्याचं कारण आढळून येत नाही. म्हणून याला हायपरेंटशन असेही म्हटले जाते. याला कारण म्हणजे आनुवंशिकता, जास्त वजन असणं, जास्त प्रमाणात मिठाचं व स्निग्ध पदार्थांचं सेवन, धूम्रपानाची सवय, डायबेटीस हे आहे.
साधारणपणे 35 ते 40 वयापासून हा रोग आढळतो. प्रत्येक वेळी वाढलेल्या ब्लडप्रेशरमुळे काही लक्षणे निर्माण होतीलच, असं नसल्यामुळे बर्याच रुग्णांना त्यांचं ब्लडप्रेशर वाढलेले आहे, याची कल्पनाच नसते. परंतु. सामान्यत: डोकेदुखी, चक्कर येणं, अशक्तपणा वाटणे, विसरभोळेपणा, एखाद्या गोष्टीवर एकाग्रचित्त न होणं, त्रासिकपणा, छातीत धडधड होणं, नाकातून रक्तस्राव होणं अशी लक्षणे आढळून येतात.
अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदय, मेंदू, किडनी, द़ृष्टी व हातापायाकडील धमन्यांवर दुष्परिणाम होतो. वाढलेल्या ब्लडप्रेशरमुळे मेंदूच्या,डोळ्याच्या, हृदयाच्या मूत्रपिंडाच्या तसंच हातापायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कायमचा फरक पडतो. या फरकामुळेच अर्धांग, आंधळेपणा, हृदयाचे रोग, हृदयाचा आकार वाढणे, मूत्रपिंडाचे विकार निर्माण होतात. अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयाचा आकार मोठा होऊ शकतो. त्याची आकुंचन-प्रसरण पावण्याची क्षमता कमी होऊ शकते. हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात. हृदयाला रक्तपुरवठा करणार्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळी तयार होऊन हार्ट अॅटॅक येऊ शकतो.
अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे किडनीच्या कार्यास अडथळा निर्माण होतो. किडनीची कार्यक्षमता हळूहळू कमी होऊ लागते. अशावेळी रुग्णास डायलिसिसची गरज भासते. भारतात डायलिसिस सुरू असलेल्या रुग्णांत मधुमेह व उच्च रक्तदाब ही मुख्य कारणे आहेत.
अशा तर्हेचे रक्तवाहिनीत निर्माण होणारे बदल अगदी प्रथम अवस्थेमध्ये वाढलेले ब्लडप्रेशर ओळखून योग्य उपाययोजना केल्यास थांबू शकतात. वाढलेलं ब्लडप्रेशर अगदी थोडं असो किंवा खूपच जास्त प्रमाणात असो योग्य औषधोपचारांनी आटोक्यात येऊ शकतं. या उपायांचा पुरेपूर फायदा मिळण्यासाठी लवकरात लवकर वाढलेलं ब्लडप्रेशर ओळखणं व लगेचच उपाययोजना करणे अत्यंत अगत्याचं ठरतं. उपायांनी ब्लडप्रेशर योग्य प्रमाणात आल्यानंतर त्यावरील उपाययोजना सोडून देणं हा वेंधळेपणा ठरेल. कारण, औषधोपचार थांबल्यानंतर ब्लडप्रेशर हळूहळू नकळत वाढत जातं.