Snoring problem | उपाय घोरण्याच्या समस्येवर

Snoring problem
Snoring problem | उपाय घोरण्याच्या समस्येवरFile Photo
Published on
Updated on

डॉ. संतोष काळे

घोरण्याची सवय चांगली नाही. केवळ पुरुष घोरतात आणि स्त्रिया घोरत नाही हा समजदेखील चुकीचा आहे. घोरण्याची समस्या कोणालाही होऊ शकते.

असे मानले जाते की गळ्याचा मागचा भाग संकुचित होतो आणि ऑक्सिजन तिथून जाताना आजुबाजूच्या पेशी कंप पावतात. त्यामुळे घोरणे सुरू होते. घोरण्यामुळे दुसर्‍यांची झोपमोड होऊ शकतेच, पण घोरणे ही चांगली सवय नाही, असे मानले जाते. त्यामुळे प्रत्येकजण घोरण्यापासून बचाव करण्यासाठी उपाय शोधत असतो. घोरणेमुक्त झोप कशी मिळवावी त्याविषयी माहिती घेऊया...

झोपण्याच्या पद्धतीत बदल : एका अंगावर झोपण्याची सवय असेल तर ती सवय ताबडतोब बदला. कारण एका अंगावर झोपूनही घोरण्याची समस्या वाढतेच.

नाक स्वच्छ ठेवा : नाक स्वच्छ करूनच झोपावे. कारण आपण नाकाने श्वास घेतो आणि श्वास घेताना अडथळा आला तर व्यक्ती घोरू लागते.

गरम पाण्याचे सेवन : गरम पाण्याच्या सेवनाने गळ्याच्या नसा मोकळ्या होतात आणि आपण आरामात झोपू शकतो. त्यामुळे रोज झोपण्यापूर्वी गरम पाण्याचे सेवन जरूर करावे.

थंड पदार्थांचे सेवन टाळा : थंड पदार्थांचे सेवन केल्यास घसा बसतो त्यामुळे घोरणे सुरू होते. त्यामुळे थंड पदार्थांचे सेवन टाळावे.

अतिऔषधांचे सेवन नको : जास्त जड औषधे आणि झोपेच्या गोळ्या घेतल्यास घोरण्याची समस्या वाढते. खोकल्यावरील औषधांमुळे शरीराच्या स्नायूंना आराम मिळतो आणि त्यामुळेही घोरणे सुरू होते.

अति मद्यपान : अति मद्यपानामुळे घोरणे सुरू होते याविषयी बहुतांश लोक अनभिज्ञ असतात. जास्त मद्यपान केले की शरीराचे स्नायू शिथिल होतात ज्यामध्ये घसा आणि जीभ यांचे स्नायू सामील आहेत. त्यामुळे मग घोरण्याचे प्रमाण वाढते.

वजनावर नियंत्रण ठेवा : स्थूलपणाची समस्या असेल तर घोरण्याचे ते ही एक कारण आहे. कारण जास्त वजनामुळे पेशी जास्त जाड होतात. गळ्याच्या पेशी जास्त जाड होतात त्यामुळे घसा मोकळा होण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे श्वास घेण्यास अडचणी निर्माण होतात आणि घोरणे सुरू होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news