Prolonged Sitting Affects Kidneys | सतत एका जागी बसून काम करणे धोकादायक; किडनीवर होतो परिणाम?

२० ते ४० वयोगटातील तरुणांमध्ये किडनी स्टोनचे प्रमाण वाढले
Prolonged Sitting Affects Kidneys
Prolonged Sitting Affects Kidneys | सतत एका जागी बसून काम करणे धोकादायक; किडनीवर होतो परिणाम? File Photo
Published on
Updated on

किडनी स्टोनचा धोका : बैठ्या जीवनशैलीमुळे आणि एसीमध्ये जास्त वेळ राहिल्यामुळे पाणी कमी पिण्याची सवय लागते आणि शरीरात मुतखडा तयार होतो. 20 ते 40 वयोगटातील तरुणांमध्ये किडनी स्टोनचे प्रमाण वाढण्यामागे बैठी जीवनशैली हे प्रमुख कारण आहे.

रक्तदाब वाढणे : शारीरिक हालचालींच्या अभावामुळे रक्तदाब वाढतो. उच्च रक्तदाब हा किडनी खराब होण्याचे एक मुख्य कारण आहे. वाढलेला रक्तदाब किडनीतील रक्तवाहिन्यांवर ताण टाकतो आणि त्यांच्या फिल्टरिंग क्षमतेवर नकारात्मक परिणाम करतो.

लघवी साठवून ठेवण्याची सवय : कामात व्यस्त असताना अनेकजण लघवीला जाणे टाळतात किंवा ती जास्त वेळ अडवून ठेवतात. संशोधनानुसार, 8 तासांपेक्षा जास्त वेळ बसल्याने व लघवी अडवून ठेवल्याने यूटीआय आणि किडनीच्या कार्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

किडनी निरोगी ठेवण्यासाठी या गोष्टी आवश्यक...

पाणी भरपूर प्या : दिवसातून किमान 3 ते 4 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.

नियमित ब्रेक घ्या : कामात दर 30 ते 45 मिनिटांनी खुर्चीवरून उठा. 5 मिनिटांचा छोटा ब्रेक घ्या.

सक्रिय राहा : दिवसातून किमान 30 मिनिटे मध्यम स्वरूपाचा व्यायाम (चालणे-धावणे-योगा).

मीठ-साखरेवर नियंत्रण : आहारात मीठ-साखरेचे प्रमाण कमी ठेवा. जास्त मीठ रक्तदाब वाढवते.

पेनकिलर टाळा : डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक औषधे घेऊ नका. त्यांचा किडनीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

अनेक तास एकाच जागी बसून काम करणे, शारीरिक हालचालींचा अभाव असणे या गोष्टी सामान्य झाल्या आहेत. मात्र, अशा प्रकारची निष्क्रिय जीवनशैली केवळ वजन वाढवण्यासाठी किंवा हृदयविकारांसाठीच नव्हे, तर तुमच्या शरीरातील एका महत्त्वाच्या अवयवासाठी म्हणजेच किडनीसाठी गंभीर धोका निर्माण करू शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, बैठ्या जीवनशैलीचा थेट आणि अप्रत्यक्ष परिणाम किडनीच्या कार्यावर होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news