अस्थमा हा फार मोठा आजार नाही. श्वासोच्छ्वासाच्या मार्गात काहीतरी अडथळा निर्माण होऊन श्वासोच्छ्वास करण्यासाठी कठीण होणे म्हणजे दमा उसळणे होय. दमा उसळला की रुग्णाला धाप लागते. उथळ व जलद श्वासोच्छ्वास सुरू होतो.
अस्थमा या जीर्ण श्वास विकारात अधूनमधून धाप लागते. विशेषत: उच्छवासास त्रास होतो. याचा हल्ला एकाएकी सुरू होतो. पाच मिनिटांपूर्वी बर्या स्थितीत असलेल्या माणसाला एकाएकी धाप सुरू होते. श्वास वाहिन्याचे स्नायू एकाएकी आकुंचित झाल्याने व त्यांचे अस्तर सुजल्याने ही लक्षणे सुरू होतात. श्वासोच्छ्वासासाठी त्याला उच्छवास करण्यास लागणार्या सर्व स्नायूंची मदत घ्यावी लागते. खोकला येतो व छातीत सू सू आवाज सुरू होतो. अवघ्या काही तासांपासून तर काही दिवसांपर्यंत हा आवेग टिकू शकतो. तसेच तो परत कसा उद्भवेल याचाही नेम नसतो.
* रोज सकाळी वमन करावे. तसेच आपल्या शरीराची व तोंडाची स्वच्छता करावी.
* मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात. प्राणायाम, लंग व्हायटलायझरच्या साहाय्याने श्वासोच्छ्वासाचा व्यायाम करावा. योगासने करावीत.
* सकाळ, सायंकाळ डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घ्यावीत.
* रात्री झोपताना गरम पाण्यात 15 ते 20 मिनिटे पाय बुडवून बसावे.
* नाकाची स्वच्छता राखावी.
* प्रत्येक जेवणानंतर दात घासावे व जीभ स्वच्छ करावी.
* धुम्रपान करू नये.
* उग्र दर्प असलेल्या वस्तूपासून दूर राहावे.
* अधिक धावू नये, त्याऐवजी हळूहळू चालावे.
* अॅस्पिरिनयुक्त औषधे पोटात घेऊ नये.
* दारू, थंड पेय, तळीव पदार्थ, आंबट पदार्थांचे सेवन कधीच करू नये.
* दिवसातून अधिकाधिक पाणी प्यावे.
* रात्रीचे जेवण मात्र हलके घ्यावे व ते सूर्यास्तापूर्वी करावे