सोरायसिस आणि आयुर्वेद | पुढारी

Published on
Updated on

सोरायसिस विकाराकरिता सर्वांकरिता प्रवाळ आणि कामदुधा प्रत्येकी 3/3 गोळ्या आणि महातिक्तघृत 2 चमचे 2 वेळा घ्यावे. रात्री त्रिफळा चूर्ण 1 चमचा गरम पाण्याबरोबर घ्यावे. खपल्या आणि खाज यांकरिता शतधौतघृत लावावे. प्रवाळ, कामदुधा, चंदनादिवटी सकाळ संध्याकाळ 3/3 गोळ्या, रिकाम्या पोटी घ्याव्यात. कफप्रधान विकारात याचे जोडीस आरोग्यवर्धिनी आणि पित्तप्रधान विकारात याचे जोडीस महातिक्तघृत दिवसातून 2/2 चमचे घ्यावे आणि सध्या कामदुधेऐवजी मौक्तिकयक्त कामदुधा घ्यावी. कफ प्रधान विकारांत कडूनिंबाची अ‍ॅलर्जी नसल्यास कडुनिंब पानाच्या पाण्याने स्नान करावे. सौम्य विरेचन म्हणून आवळकाठी, बाळहिरडा, बहावामगज, गुलबकळी अत्यल्प प्रमाणात सोनामुखी पाने, कोरफडीचा गर यांचा काढा घ्यावा. सोरायसिसचे जोडीस मधुमेह असल्यास प्रवाळ आणि कामदुधा घेऊ नये. त्याऐवजी आरोग्यवर्धिनी, आम्लपित्त टॅब्लेट, फलत्रिकादि काढा घ्यावा. लाली जास्त असल्यास मौक्तिक भस्म पन्नास मिली ग्रॅम दोन वेळा द्यावे. उपळसरीचूर्ण एक चमचा सकाळी पाण्याबरोबर घ्यावे. आवश्यक तेथे शतधौतघृत लावावे. सोरायसिस आणि दमा; अ‍ॅलर्जी अशी आलटून पालटून लक्षणांची पाठशिवणी असते; त्याकरितां सोरायसिसचे उपचार करावे. दमा, अ‍ॅलर्जी यांचे पथ्यपाणी पाळावे. 

ग्रंथोक्त उपचार : महामंजिष्ठादि काढा, लघुमंजिष्ठादि काढा, सारिवाद्यासव, सौम्य विरेचन काढा, खदिरासव, शतावरीसिद्ध तेल. 

विशेष दक्षता आणि विहार : मीठ वर्ज्य करावे, साबण वापरू नये. अनवाणी उन्हांत हिंडू नये. कॉर्टिझान, स्टेराईड, प्रेडनेसॉल, बेटनेसॉल अशी औषधे पोटांत घेऊ नये. ती मलमेसुद्धा बाह्योपचाराकरितां वापरू नये. 

पथ्य: साधा, साजूक तूप असलेला आहार. दमा आणि अ‍ॅलर्जी या विकाराचे पथ्य सांभाळावे. 

कुपथ्य : आंबवलेले आणि उष्ण, खारट, आंबट अन्न, मांसाहार, मसालेदार आणि जड पदार्थ, थंड पेये, मिल्कशेक इत्यादी. डालडा, रिफाईंड, करडई तेल; साबण, जागरण, चिंता, कडक ऊन, तंबाखू, चुना, पान, मद्य, रात्रो उशिरा जेवण. 

रसायनचिकित्सा : महातिक्तघृत, मौक्तिकभस्म, प्रवाळपिष्टी, आमलकी प्रयोग.

योग आणि व्यायाम : सूर्यनमस्कार, हलका व्यायाम, सकाळी फिरणे. 

रुग्णालयीन उपचार : बस्ती. विरेचन, रुग्ण बलवान असेल आणि कफ असेल तर वमन द्यावे. 

अन्य षष्ठि उपक्रम (पंचकर्मादि) : स्नेहन, सोम्य विरेचन. अवगाह स्वेद. 

चिकित्साकाल : किमान तीन महिने ते प्रदीर्घ काळ. काळ काही वेळा सांगता येत नाही. 

निसर्गोपचार : कोरड्या हवेत रहावे, दमट, प्रदुषयुक्त आणि कोंदट वातावरण टाळावे, गंधकयुक्त पाण्याने स्नान करावे. 

अपुनर्भवचिकित्सा : महातिक्तघृत, प्रवाळ, कामदुधा. 

संकीर्ण : द्राक्षांचे मोसमात काही दिवस केवळ द्राक्षे खाऊन रहावे (द्राक्षरसायनप्रयोग). केवळ गायीचे दुधावर रहावे (गोदुग्धप्रयोग). डोक्यातील खवड्यांवर लक्ष ठेवावे. त्यासाठी केश चुर्णाने केस धुवावेत. त्वचाविकार आणि मधुमेह यांत चिंता केल्याने विकार वाढतो म्हणून बिनधास्त जीवन जगावे. बेफिकीर रहावे. चिंता करू नये. दमा आणि अ‍ॅलर्जीचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news