’ IVF/ICSI ’  च्या प्रक्रियेत…

Published on
Updated on

डॉ. प्रवीण हेंद्रे

आपण मागील लेखामध्ये  IVF/ICSI  करण्यासाठीची पुरुष व स्त्रियांमधील पूर्वतयारीची माहिती घेतली आहे. इतर सर्व उपाय झाल्यानंतर जेव्हा गर्भधारणा होऊ शकत नाही, तेव्हा  IVF/ICSI करतात. वैद्यकीय शास्त्रामध्ये कोणतेही उपचार किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी. Absolute Indication, (अपरिहार्य परिस्थिती) व Relative Indication (सापेक्ष परिस्थिती) कोणती ही पहावे लागेल.

प्रजनन प्रक्रियेमध्ये

1) समागम– पुरुष बीजे स्त्रीच्या शरीरांतर्गत असलेल्या आंत्र जनन अवयवापर्यंत पोहोचविण्यासाठी होतो. परंतु, जेव्हा या प्रवाहामध्ये अडथळा किंवा प्रवास व्यवस्थित होत नाही, तेव्हा त्यासाठी Artificial Insemination Husband  (AIH) म्हणजेच 'कृत्रीम रेतन' प्रक्रियेद्वारे पर्यायी व्यवस्था करता येते. 

2) स्त्री बीज निर्मिती व संकलन – स्त्री बीजाची बीजांड कोशामध्येे निर्मिती (Ovulation) व गर्भनलिकेद्वारे संकलन (Ovum Pick up)  होत असते. त्यानंतर गर्भनलिकेमध्ये स्त्रीबीज व शुक्राणूचा संयोग होऊन भ्रूण अथवा Zygote  तयार होत असते. नैसर्गिक फलन प्रक्रियेसाठी पुरेशा चपळ शुक्राणूची आवश्यकता असते. परंतु, काही परिस्थितीत (Absolute Indication) म्हणजे  उदा. पुरुषामध्ये शुक्राणूची संख्या नैसर्गिक फलन प्रक्रियेसाठी पुरेशी नसल्यास Severe Oligospermia तसेच त्याची हालचाल अथवा चपळता कमी असल्यास Severe Asthenozoospermia किंवा Severe Teratozospermia गुणवत्तेमध्ये नापास झालेल्या शुक्राणूंची संख्या जास्त असल्यास व बहुतेक शुक्राणू निर्जीव असल्यास Necrozoospermia तसेच Pesa, Tesa, Micro TESE  म्हणजेच थेट वृषणामधून बोटावर मोजता येणार्‍या संख्येने प्राप्‍त झालेल्या शुक्राणूद्वारे फलन प्रक्रिया करण्यासाठी  IVF/ICSI   चा मार्ग अवलंबावा लागतो. 

तसेच ज्या स्त्रियामध्ये गर्भनलिका खराब झालेल्या असतात म्हणजे बंद असतात किंवा कार्यक्षम नसतात, अशा परिस्थितीमध्ये  IVF/ICSI   म्हणजेच कृत्रिम गर्भधारणा करण्यासाठी टेस्टट्यूब बेबी Test Tube Baby प्रणाली द्वारा साध्य म्हणजेच अपत्यप्राप्‍ती करणे अपरिहार्य असते.

म्हणजेच गर्भनलिकेतील नैसर्गिक प्रक्रियेला पर्याय म्हणून Artificial Reproductive Technique द्वारे 'कृत्रिम गर्भधारणा प्रणाली' प्रयोगशाळेत करावी लागते. त्यामध्ये विविध प्रकारच्या औषध पद्धती असतात व त्याद्वारे शेवटी एकापेक्षा जास्तीची स्त्री बीजे निर्माण केली जातात व या स्त्री बीजाचे सोनोग्राफीच्या सहाय्याने  स्त्रीबीज संकलन करावे लागते व शेवटी या स्त्री बीजाचे  IVF/ICSI   प्रणालीद्वारे प्रयोगशाळेत फलन करतात व भ्रूण तयार होते. आपण आपले "साध्य" म्हणजेच भ्रूण तयार होण्यासाठी स्त्रीबीज व शुक्राणू या दोन साधनाद्वारे गर्भ तयार करीत असतो. म्हणजे साधनांचा पुरवठा मुबलक व गुणवत्ताधारक असेल, तरच साध्य म्हणजे End Product  हे चांगले होऊ शकते. त्यासाठी स्त्री बीज निर्मिती क्षमता असलेल्या स्त्रीमध्ये अनेक स्त्री बीजे तयार करतात किंवा ज्यांना रजोनिवृत्ती झाली आहे, अशा स्त्रियांऐवजी डोनरची स्त्री बीजे घेऊन कृत्रिम गर्भधारणा करावी लागते.    

अशा अपरिहार्य परिस्थितीमध्ये ( IVF/ICSI ) प्रणाली ही एक वैद्यकीय शास्त्राने मानवी जीवनास दिलेली देणगी आहे. ही प्रणाली जर वैद्यकीय शास्त्रातील सखोल प्रयोगाद्वारे यशस्वी झाली नसती, तर आजच्या युगात असंख्य स्त्री-पुरुष अपत्य प्राप्‍तीपासून वंचित राहिले असते. 

(Relative Indication) औषधोपचार खणख/र्डीशिी खणख  चे पुरेसे प्रयोग करूनसुद्धा गर्भधारणा झाली नाही, तर  IVF/ICSI   प्रणालीचा वापर करणे गरजेचे होते.

ठशश्ररींर्ळींश खपवळलरींळेप  ही व्यक्‍ती सापेक्ष असतात. त्यास व्यक्‍ती हे दाम्पत्य तसेच वैद्यकीय व्यावसायिक दोघे आले. काही दाम्पत्याला इतर उपचाराअंती गर्भधारणा शक्य असते परंतु त्यांचा असा समज आहे, की  IVF/ICSI   केल्यास लवकर गर्भधारणा होऊ शकते. तसेच आपण पुरेसे वैद्यकीय उपचार केले आहेत, असे वैद्यकीय व्यावसायिकास वाटणे हे प्रत्येकाच्या वैद्यकीय ज्ञानाच्या जडणघडणीवर अवलंबून असते. म्हणूनच काही अशा  Relative Indication मध्ये  IVF/ICSI   प्रणालीद्वारा अपत्यप्राप्‍ती झाल्यानंतर नैसर्गिक गर्भधारणा झालेली उदाहरणे आढळतात. म्हणूनच व्यावसायिकानेसुद्धा आपल्यापरीने नैसर्गिक गर्भधारणेसाठी परिपूर्ण प्रयोग झाल्यानंतरच  IVF/ICSI  चा सल्ला द्यावा लागतो.

3) गर्भाचे रोपण : फलन झालेल्या गर्भाचे गर्भाशयात होणारे रोपण (Implantation)  व त्यानंतर होणारी नऊ महिने वाढ ही गर्भाशयाच्या अंतर्गत रचना व कार्य क्षमतेवर अवलंबून असते. जेव्हा गर्भाशय अकार्यक्षम किंवा गर्भधारणेसाठी निष्क्रिय ठरते तेव्हा  IVF/ICSI   द्वारे तयार केलेला गर्भ सरोगेट मदरमध्ये प्रत्यारोपित करता येतो परंतु असा गर्भसुद्धा खतड/खउडख प्रणालीद्वारेच तयार करावा लागतो.

निसर्गात झाडे लावण्यासाठी पूर्वी फक्‍त बीज वापरत, नंतर त्याची कलमे तयार करून वापरत; पण आता आधुनिक प्रणालीद्वारे एखादे वाढलेले संपूर्ण झाडच एका जागेवरून दुसर्‍या जागेमध्ये पुनर्स्थापित करता येते. स्त्रीरोग शास्त्राचा अभ्यास करीत असताना खूपवेळा वाटते अशीच काहीशी प्रणाली वापरून तयार 'गर्भ जर गर्भाशयात प्रत्यारोपित करता आला तर' या वंध्यत्व समस्येचा संपूर्ण प्रश्‍नच निकालात काढता येईल. काही दाम्पत्यांना नको असलेल्यावेळी गर्भधारणा होते व ते काढून टाकण्यासाठी  MTP करतात. अशावेळी हा नकोसा झालेल्या गर्भ तसेच गर्भनलिकेतील गर्भ जर गर्भाशयात प्रत्यारोपित करता आला, तर किती तरी समस्या निकालात निघतील. परंतु गर्भाच्या सुरुवातीच्या जडणघडणीमधील रक्‍तपुरवठा इतका जटिल व गुंतागुतीचा असतो, की तो नवीन गर्भाशयात पुनप्रर्स्थापित होताना गर्भ निर्जीव होण्याचा संभव जास्त असल्यामुळे आजमितीस हे शक्य होत नाही. परंतु, काळाच्या ओघात काय लिहिले आहे हे सांगणे फारच कठीण असते. केवळ रक्‍त पेशीद्वारे शुक्राणू तयार करणे, पुरुषाच्या पोटात गर्भधारणा व विकसित गर्भाचे वंध्यत्वाच्या 'स्त्री गर्भाशयात' थेट प्रत्यारोपण ही वैद्यकीय शास्त्रामधील स्वप्ने एक ना एक दिवस पूर्णत्वास जावीत, हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना.

तोपर्यंत तरी ART- IVF/ICSI  ला पर्याय नाही.

 IVF/ICSI  करण्यासंबंधीची झीळपलळश्रिशी शास्त्रीय तत्त्व जाणून घेतल्यानंतर आपण प्रत्यक्ष  IVF/ICSI  कसे करतात, हे पाहू या.

 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news