

नवी दिल्ली : शरीरातील इस्ट्रोजेन आणि ग्रोथ हार्मोनची पातळी कमी झाल्यानंतर केसांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. यासोबतच झोपेचा अभाव, ताण, थायरॉईडसारख्या समस्या आणि पोषणाचा अभाव यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात. विशेषतः 40 वर्षांनंतर ही समस्या प्राधान्याने जाणवते. पण योग्य आहार, संतुलित जीवनशैली आणि काही सोप्या दिनचर्यांचा अवलंब केल्यास फक्त 90 दिवसांत फरक दिसून येतो.
अपुरी झोप आणि मानसिक ताण : अपुरी झोप व शांत झोप न लागणे आणि मानसिक या झोपेशी निगडित कारणांमुळेही केस गळती सुरू होते.
थायरॉईडसारखे आजार : थायरॉईडची समस्यादेखील केसांची वाढ होऊ देत नाही. हायपोथायरॉईडिजम आणि हायपरथायरॉईडिजम ही दोन्ही कारणे केसगळतीचे कारण ठरते. ज्या व्यक्तींना थायरॉईडची समस्या असते, त्या व्यक्तींच्या केसांची वाढ थांबते.
आहारातील पोषक तत्वांची कमतरता : शरीर आणि त्वचा निरोगी राहण्यासाठी पोषक तत्वांची गरज असते. केसांना निरोगी ठेवण्यासाठीही पोषक तत्वे आवश्यक असतात. जेव्हा तुमच्या शरीरात प्रोटीन, बायोटिन, विटामिन ए, विटामिन ई आणि लोह यासारखी पोषक तत्वांची कमतरता असते, तेव्हा केसांची वाढ थांबते.
केस गळतीवर योग्य आहार, संतुलित जीवनशैली आणि काही सोप्या दिनचर्यांचा अवलंब केल्यास फक्त 90 दिवसांत फरक दिसून येतो. यासाठी प्रथिने, लोह, व्हिटॅमिन सी, झिंक व बायोटिन, ओमेगा 3, तांबे असा सर्व सकस आहार घेतल्यास केसगळती थांबते. केस सिल्की व मजबूत होऊन केस वाढतात. कॉटेज चीज, अंडी, मसूर, टोफू किंवा अंकुरलेली कडधान्ये यामध्ये प्रथिने सर्वात जास्त असते. पालकावर लिंबू पिळून घेतल्यास आणि पेरू खाल्यास लोह आणि व्हिटॅमिन सी मिळते. झिंक आणि बायोटिनसाठी दररोज दोन चमचे भोपळ्याच्या बिया किंवा मूठभर भाजलेले हरभरे खावेत. दररोज एक चमचा जवस पावडर किंवा दोन अक्रोड खावे. यातून ओमेगा-3 मिळते. राजमा, काजू आणि तीळ खाल्ल्यास तांबे मिळते. यातून केसांचा रंग गडद होतो.