पेपटिक अल्सर : समस्या आणि उपाय

Published on
Updated on

डॉ. मयुरेश पोवार

पोटातील व्रण यालाच पेपटिक अल्सर असेही म्हणतात. यामध्ये  पोटातील आवरण खंडित होते. अधिक प्रमाणातील जाठररस व पोटातील आम्ल यामुळे उतींचा नाश होऊन व्रण तयार होतात. 'पेपटिक' या शब्दाचा अर्थ होतो; आम्लामुळे होणार्‍या समस्या. गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट  पेपटिक अल्सरला फक्त अल्सर असेही म्हणतात. 

 पेपटिक अल्सरचे दोन प्रकार आहेत. ज्याठिकाणी व्रण आहेत त्या जागेवरून त्यांची नावे आहेत. 

1. गॅस्ट्रीक अल्सर 

2. ग्युओडेनल अल्सर

गॅस्ट्रीक अल्सर हे जठरामध्ये आढळते. तर ड्युओडेनल अल्सर हे लहान आतड्याच्या सुरुवातीस आढळते. एकाच व्यक्तीस एकाचवेळी दोन्ही प्रकारचे अल्सर होऊ शकतात. 

*  पेपटिक अल्सरची कारणे– 

अन्न पचवण्यासाठी मदत करणारे आम्ल जेव्हा जठरभित्तीका किंवा ड्युगेनमला (लहान आतडीचा सुरुवातीचा भाग) हानी पोहचवते तेव्हा पेपटिकअल्सर तयार होतात. जठरातील ग्युओडिअममधील पाचनद्रव्यांच्या असंतुलनामुळे अल्सर होतात. पेपटिक अल्सरच्या प्रमुख कारणांमध्ये हेलिकोबॅक्टर पायलोरी या जीवाणूचा संसर्ग, छडअखज (एनसेड)औषधे उदा. अस्पीरिन यांचा समावेश होतो. 

अधिक मद्यपान, धूम्रपान यामुळे पेपटिक अल्सर होण्याची शक्यता असते. तणाव व मसालेदार पदार्थांमुळे अल्सर होत नाही; परंतु यामुळे व्रणाची स्थिती अधिक वाईट बनते. 

* पेपटिक अल्सरची लक्षणे 

व्रणांची लक्षणे ही कधी दिसून येतात तर कधी दिसून येतही नाहीत. पोटात दुखणे हे सर्वात प्रमुख लक्षण आहे. जेव्हा जठर रिकामे असते त्यावेळी आम्लामुळे पोटात दुखणे वाढते. आम्ल निष्फळ करणारे अन्न किंवा औषधे घेतल्यावरती दुखण्यापासून आराम मिळतो. जवळपास तीन चतुर्थांश लोकांमध्ये लक्षणे दिसून येत नाहीत. 

पेपटिक अल्सरच्या लक्षणांमध्ये खालील लक्षणांचा समावेश होतो. 

– पोटामध्ये जळजळणे

– उदर भरल्यासारखे वाटणे

– छातीत जळजळणे

– मळमळणे, उलटी येणे

– भूक न लागणे, वजन कमी होणे

– व्रणातून होणार्‍या रक्तस्त्रावामुळे रक्तमिश्रित उलटी होऊ शकते. 

– मेलिना ( विष्ठेचा खराब वास येणे)

पेपटिक अल्सरची लक्षणे ही त्याच्या स्थानानुसार आणि रुग्णांच्या वयानुसार बदलतात. सामान्यतः व्रण हे भरून येतात आणि पुन्हा परत काही दिवसानंतर दिसून येतात आणि त्यानंतर नाहिसे होतात. सहसा लहान मुले आणि वृद्ध माणसांमध्ये गुंतागुंतीशिवाय लक्षणे दिसून येत नाहीत. 

* व्रणांमुळे

* रक्तस्त्राव– व्रणातून होणार्‍या रक्तस्त्रावामुळे रक्तक्षय (अ‍ॅनिमिया) होऊ शकतो. रक्तस्त्राव अधिक असेल तर ते उलटीमध्ये किंवा शौचामध्ये दिसून येते. 

* संसर्ग – पेपटिक अल्सरमुळे जठरभित्तिकेला किंवा लहान आतडीला छिद्र पडू शकते. यामुळे  पेरिटोनायटिस होण्याची शक्यता वाढते.

* अडथळा –  पेपटिक अल्सरमुळे सूज येते यामुळे पाचनतंत्रात अडथळा निर्माण होतो. पोट भरल्याची लगेच जाणीव होते. यामुळे वजन कमी होते, उलटी होते. 

* व्रणाचे निदान

व्रणाची पुष्टी करण्याकरिता डॉक्टर रेडिओलॉजिकल चाचणी/डायग्नोस्टिक इमेजिंग टेस्ट करतात. यामध्ये दोन चाचण्यांचा समावेश होतो. 

1) अप्पर जी-आय सेरीज– 

हा एक्स-रे चा प्रकार आहे. यामध्ये रुग्णाला  विशिष्ट  पाणी पाजले जाते. यामुळे एक्स-रे अधिक चांगल्याप्रकारे दिसण्यास मदत होते. या पाण्यामध्ये बेरियम असते म्हणून या चाचणीला 'बेरियम स्वालो' असेही म्हणतात. 

2) एन्डोस्कोपी– 

एन्डोस्कोप ही कॅमेरा असलेली लवचिक ट्यूब असते. ही ट्यूब  तोंडावाटे पोटात टाकली जाते. यामुळे डॉक्टर पोटातील आवरण पाहू शकतात. या प्रक्रियेमध्ये काहीवेळा छोटासा उतीचा भाग सूक्ष्मदर्शकाखाली पाहण्यासाठी काढला जातो. यालाच बायोप्सी म्हणतात. 

डायग्नोस्टिक इमेजिंग टेस्टमध्ये व्रण आढळला तर रुग्णामध्ये एच पायलोरी जीवाणू असू शकतात.

एच  पायलोर दर्शवण्यासाठी तीन टेस्टस् आहेत.

* रक्तचाचणी-  जीवाणू असतील तर, रक्तामध्ये विशिष्ट अ‍ॅन्टिबॉडीत आढळतात. अ‍ॅन्टिबॉडी हे एक प्रोटीन असते, जे आपल्याला विविध जीवाणूंमुळे होणार्‍या हानीपासून वाचवते. ज्या व्यक्तीला भूतकाळात अल्सर होता आणि त्याकरिता त्याने उपचार घेतलेत अशा व्यक्तींमध्ये ही टेस्ट पॉझिटिव्ह येते. 

* श्‍वास चाचणी- यामध्ये विशिष्ट पेय पिल्यानंतर  कार्बन डॉयऑक्साइड  मोजला  (पान 7 वरून) जातो. एच. पायलोरी हे जीवाणू या पेयाचे विघटन करतात. यामुळे कार्बनचे प्रमाण वाढते. हा कार्बन श्‍वासावाटे बाहेर टाकला जातो. श्‍वास चाचणी ही रक्तचाचणी पेक्षा अचूक आहे. ही चाचणी एच. पायलोर जिवाणू पूर्णपणे नष्ट झाले आहेत का, हे तपासण्यासाठीही करतात. 

* उती चाचणी- ही चाचणी फक्त एन्डोस्कोपिक  बायोप्सी केल्यानंतरच करतात. यामध्ये पोटातील उतींचा वापर करतात. 

*  पेपटिक अल्सर आणि घरगुती उपचार

 व्रणांरती अनेक घरगुती उपचार उपलब्ध आहेत. घरगुती उपचार हे जठराचे आम्लापासून रक्षण करणे यावरती केंद्रित आहेत. घरगुती उपायांबरोबरच डॉक्टरांचा सल्ला घेणेही आवश्यक आहे. यामुळे व्रणांपासून दीर्घकाळापर्यंत आरामाची खात्री होईल. 

* लसूण- लसणामध्ये अ‍ॅन्टिमायक्रोबियल गुणधर्म आहेत. यामुळे एच. पायलोरी जीवाणूंची संख्या कमी होण्यास मदत होते. 

* मेथी- मेथी बीमध्ये जखम भरून येण्याचे गुणधर्म आहेत. हे जठरव्रणांच्या उपचारामध्ये वापरतात. मेथी बीमध्ये म्युसिलेज अधिक प्रमाणात असते. मेथी हे जठरभित्तीकेवर एक चिकट  प्रकारचे आवरण बनवते. त्यामुळे जखम भरून येण्यास मदत होते.

* नारळाचे तेल- हे पोटातील व्रणांपासून त्रस्त असणार्‍या रुग्णांसाठी लाभदायक आहे. यामध्ये जीवाणूविरोधक गुण आहेत. हे जीवाणूंचा नाश करते. 

* मध- जखम भरून येण्यामध्ये अधिक गुणकारी आहे. यामुळे हे पोटातील व्रणांच्या उपचारामध्ये वापरले जाते. मधामध्ये असलेले ग्लुकोज-ऑक्सिडेज हे हायड्रोजनपर ऑक्साइड तयार करते, जे हानीकारक जीवाणूंचा नाश करते. याशिवाय मध हे सूज शमवते व कमी करते. 

* केळी- कच्चे व पिकलेली केळी हे  दोन्हीही लाभदायक आहेत. यामध्ये अ‍ॅन्टीमायक्रोबियन्न गुण आहेत. ज्यामुळे एच. पायलोरी जीवाणूंची वाढ थांबते. 

* कोबी- यामध्ये लॅक्टिक अ‍ॅसिड असते. हे पोटातील आवरणाचे  रक्तप्रवाह उत्तेजीत करणारे अ‍ॅमिना अ‍ॅसिड तयार करण्यास मदत करते. यामुळे जखम भरून येण्यास आणि आवरणाच्या मजबुतीस मदत होते. 

* पेपटिक अल्सम आणि पथ्य- 

ज्या अन्न घटकांमुळे जठराला त्रास होतो, असे घटक टाळावेत. अधिक साखरेचा आणि मीठाचा वापर टाळावा.  फॅटयुक्त पदार्थ टाळावेत. 

फळे, भाज्या, फॅटमुक्त किंवा कमी फॅटयुक्त दुधाचे पदार्थ, धान्ये, ब्राऊन राईस यांचा आहारामध्ये समावेश करावा. 

खालील अन्नघटकांचा समावेश आहारामध्ये टाळावा- 

पेय- कच्चे दूध, फ्लेवरड् मिल्क, कॉफीयुक्त पेये, ग्रीन आणि ब्लॅक टी, संत्री आणि द्राक्षेंचा रस, अल्कोहलयुक्त पेय.

मसाले- मिरची, मोहरी, जायफळ, टोमॅटो केचअप, टोमॅटो सॉस, फ्लेवरड् चीज.

* औषधोपचार-  1) ब्रोयानिया 2) सल्फर 3) ग्राफाइट 4) लायकोपोडियम 5) बोरॅक्स 6) नक्स वोमिका. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news