

आहारतज्ज्ञ रमिता कौर
मायग्रेन किंवा अर्धशिशीचा त्रास दैनंदिन कामात मोठे अडथळे निर्माण करू शकतो. डोक्याच्या एका बाजूला होणार्या तीव्र वेदना आणि मळमळण्यासारख्या समस्यांमुळे कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण होते. या समस्येवर मात करण्यासाठी...
मायग्रेनचा त्रास असलेल्या व्यक्तींमध्ये अनेकदा मॅग्नेशियम या खनिजाची कमतरता दिसून येते. हे खनिज नसांच्या कार्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या आणि विशेषतः पालकचा समावेश करावा.
अर्धशिशीमध्ये सकाळी उठल्यावर केळे खाणे फायदेशीर ठरू शकते. केळ्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते, जे मज्जासंस्था शांत ठेवण्यास आणि स्नायूंचा ताण कमी करण्यास मदत करतात.
मेंदूतील दाह किंवा सूज कमी करण्यासाठी ओमेगा 3 फॅटी अॅसिड अत्यंत उपयुक्त ठरते. अळशीच्या बिया आणि चिया सीडस् यांचे सेवन केल्यास मायग्रेनच्या वेदना कमी होण्यास मदत होते.
मायग्रेनचा त्रास जाणवू लागतो, तेव्हा तुळस, मिरी आणि आल्याचा चहा घेणे गुणकारी ठरते. या तिन्ही पदार्थांमध्ये नैसर्गिक औषधी गुणधर्म असून, ते वेदनाशामक म्हणून काम करतात.
नाश्ता न केल्याने रक्तातील साखरेची पातळी खालावू शकते, ज्यामुळे मायग्रेनचा अटॅक येण्याची शक्यता वाढते.
शरीरातील पाण्याची कमतरता हे मायग्रेनचे एक प्रमुख परंतु लपलेले कारण आहे. त्यामुळे दिवसभर भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.
सकाळी आणि संध्याकाळी मानेचे हलके व्यायाम केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायूंमधील ताण कमी होऊन डोकेदुखीपासून आराम मिळतो.