डॉ. गौरांगी वैद्य
आजकाल मायग्रेनची समस्या केवळ ज्येष्ठांत किंवा प्रौढ व्यक्तींपर्यंतच मर्यादित राहत नसल्याचे दिसून येत आहे. हा त्रास आता मुलांनादेखील होत आहे. शाळेत जाणाऱ्या एकूण मुलांपैकी दहा टक्के मुलांना या विकाराचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे निम्म्याहून अधिक मुलांना १२ वर्षांच्या अगोदरच मायग्रेनचा अॅटॅक सहन करावा लागतो.
मायग्रेन हा एक मेंदूशी निगडित आजार आहे. त्याच्या लक्षणात डोकेदुखी, उलटी येणे, चक्कर येणे, मूड बदलणे, प्रकाश किंवा आबाजाबाबत संवेदनशील होणे आदींचा समावेश आहे. मुलांत हा ज्येष्ठाप्रमाणे दीर्घकाळ राहत नाही. परंतु, मुलांचे सामान्य जीवन विस्कळीत करण्याचे काम मायग्रेन करते.
अधिक काळ टीव्ही पाहणे: या आजाराचे विविध प्रकार असून, त्यापैकी एक क्रॉनिक डेली मायग्रेनचा समावेश आहे. या प्रकारात मुलांना एका दिवसात चार ते पाच तास डोकेदुखीचा त्रास राहतो. डोकेदुखीशिवाय ट्रिगर मायग्रेनचे अन्य काही कारणे आहेत. बोलण्याच्या शैलीत बदल होणे, शरीरात पाण्याची कमतरता जाणवणे, जंक फूडचे अधिक सेवन, दीर्घकाळ टीव्ही किंवा संगणकासमोर बसणे या कारणांमुळेही मायग्रेनचा त्रास बळावतो
अशी होते तपासणी: कुटुंबात एखाद्याला मायग्रेनचा त्रास असेल, तर मुलांना देखील त्याचा त्रास होण्याची शक्यता बळावते. अशावेळी पालकांनी - मुलांच्या डोकेदुखीकडे दुर्लक्ष करू नये आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार रक्त तपासणी, ईईजी, लंबर पंचर, न्यूरोइमेजिंग टेस्ट आदी चाचणीच्या आधारे आजाराचे कारण तपासून घ्यावे.
उपचार कसे होतात? मायग्रेनवर तीन मागाँनी उपचार केले जातात. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेले नियोजन, मुलींत मायग्रेनचा हल्ला हा मासिक पाळीशी निगडित असतो. साधारणपणे तीन प्रकारे मायग्रेनवर उपचार केले जातात. सर्वात अगोदर म्हणजे अॅक्यूट उपचार, म्हणजे त्यात लक्षणांनुसार औषधे दिली जातात. दुसरे म्हणजे प्रतिबंधात्मक उपचार असून, त्यात मायग्रेन अॅटॅकची संख्या कमी केली जाते, तिसरे म्हणजे पूरक उपचार पद्धती. यात औषधाचा वापर केला जात नाही; पण अॅक्यूपंक्चर, व्यायाम, उचित आराम आणि आहाराच्या माध्यमातून मायग्रेन नियंत्रित करण्यात येते.