नेझल पॉलिप्स (नाकातील मास वाढणे)

Published on
Updated on

पाच घाणेंद्रियांपैकी नाक हे एक घाणेंद्रिय, नाकाचे महत्त्व वेगळे सांगायला नकोच. जर नाकाचे कार्य श्‍वासोच्छ्वासाचे हे योग्य पद्धतीने चालले तर आपणास चिंता करण्याची गरजच भासत नाही. परंतु, जर याच नाकाच्या अनेक समस्या सुरू होतात. जर त्याच्या नॉर्मल कार्यात अडथळा आला तर…

वारंवार सर्दी होणे, नाकातून रक्‍तस्त्राव होणे, Aller-gic Coryza ,, बालदमा, दमा, नाकातील मास वाढणे. त्यालाच लोेक नाकातील हाड वाढणे असेही म्हणतात.

जेव्हा नाकातील मासल भाग वाढतो ते उजव्या किंवा डाव्या बाजूच्या नाकातील असू शकतो. जर हा मासल भाग प्रमाणापेक्षा जास्त वाढला व sinusच्या भागाकडे वाढला तर तेथे इन्फेक्शन होऊन नाकातील स्त्रावाचे अतिरिक्‍त साठला जातो व सर्दी दम्यासारखा त्रास रुग्णाला सुरू होतो. 

जरा जरी वातावरणातील बदल, पावसात भिजणे, श्‍वासातील बदल झाला तर अ‍ॅलर्जीक सर्दी सुरू होते व रुग्णाला पाण्यासारखी सर्दी, शिंकाचा त्रास होऊन असह्य असे होऊन जाते. बर्‍याचदा हे नेझल पॉलिप्स हे अनुवंशिकही असू शकतात. ज्या घरात पूर्वी कोणाला असा त्रास असेल तर पुढच्या पिढीलाही हा त्रास होऊ शकतो. कित्येकदा तात्पुरत्या स्वरूपाची गोळ्या, इंजेक्शन घेतात व बरे होते. परंतु, हे चक्र वर्षानुवर्ष चालतच राहते.तात्पुरता आराम पडतो. शिवाय जरी surgery operationकरून ते वाढलेले मास काढले तरी पुन्हा मास वाढण्याची शक्यता 90% असतेच.

होमिओपॅथिक उपचार हा रामबाण उपाय व चांगला उपाय आहे. होमिओपॅथिक औषधांनी प्रतिकारशक्‍ती वाढविली जाते. ज्यामुळे रुग्णाला आजाराला सामोरे जाण्यास व परतवून लावण्यास सोपे काम होते व कायमस्वरूपी रुग्ण हा त्या नेझल पॉलिप्सच्या विळख्यातून सहीसलामत बाहेर येतो.

होमिओपॅथिक उपचारामध्ये रुग्णाची शारीरिकता/मानसिकता आहार आवड-निवड, अनुवंशिकता, झोप-स्वप्न, थंड-उष्ण प्रकृती इ. सूक्ष्म गोष्टींचा अभ्यास करून रुग्णाला साम्य असणारेच औषध योग्य मात्रेस जर दिले तरच रुग्ण या नेझल पॉलिप्स व इतर कुठल्याही आजारातून सहीसलामत बाहेर पडतो. 

होमिओपॅथिक अनेक औषधे नेझल पॉलिप्सवर चांगले उपयोगी पडतात असे की, कलकेरिया फॉस, सिलिसिया, कलकेरिया कार्ब, नॅट्रम मूर, फॉस्फरस, मर्क सॉल, थुजा, सल्फर, सॅन्गवेन्युरिया, कार्लनॅट्रीकम, इपीस, मर्क आय. आर., ट्युक्रियम मॅरम इ. अनेक आहेत.

काही जणांना नाकातील मास वाढण्याबरोबर अ‍ॅलर्जीक सर्दीला सुरुवात होते. त्यामध्ये उठल्या उठल्या शिंका येतात, नाकातून पाण्याची धार लागते.शिवाय, रात्री झोपले असता नाक बंद पडल्यासारखे होते. त्याला आपण नाक चोंदणे असे म्हणतो. म्हणजे ही कलकेरिया फॉसचे रुग्ण होय. यांची थंड प्रकृती असून हे मास वाढणे, हाड वाढणे यासाठी खूप उपयोगी पडते. थोडे हट्टी असा स्वभाव असतो. त्यांना गोडाची तसेच आंबट, दूध, फळे यांची आवड असते. नाकातील मास कमी होण्यासाठी हे कलकेरिया फॉस औषध खूपच उपयोगी पडते.

दुसरे असे की सिलिसिया हेही औषध खालील प्रकारच्या रुग्णामध्ये उपयोगी पडते. बारीक अंगकाठी असून बुद्धीने हुशार, चलाख असतात. फक्‍त त्यांना पाठिंबा, सपोर्ट देण्याची गरज असते. मग ते आयुष्यात पुढे पुढे जातात. ह्यांनाही सर्दी, नाकातील मास वाढल्याने होते. आडवे झाले असता गुदमरल्यासारखे होते. शिवाय मांसपेशीवर या सिलिसिया औषधाचे कार्य छानच आहे. नाकातील मास कमी होत जाऊन रुग्ण हा पूर्ववत होऊन पूर्वीचे आपले सर्व काम नॉर्मली करू शकतो तो पूर्णपणे बरा होतो.

मर्कसॉलसारख्या औषधाची अ‍ॅक्शन तर खास म्युकस मेमरेनवर आहे. म्युकस मेमरेन सुजणे, दाह होणे, सर्दी होणे, शिंका, डोकेदुखीबरोबर नाकातील मांसपेशीची वाढ झपाट्याने होते. मांसपेशी जसजसे वाढतील तसतसे रुग्णाला शिंकाचा, सर्दीचा त्रास होतोच. तहान वाढत जाते उष्ण प्रकृतीचे रुग्ण असतात. या रुग्णांचे वैशिष्ट्य म्हणजे लाळ जास्त स्त्रावत असते जर मास (polyp) डाव्या बाजूच्या नाकपुडीत असेल तर मर्क आय. आर. वापरावे व जर polypउजव्या बाजूला असेल तर मर्क आय. एफ. वापरावे. काही polypsबोटाचा स्पर्श झाला, थोडा धक्‍का लागला तरी रक्‍ताळतात. त्यातून पातळ पण फ्रेश लाल कलरचे रक्‍त येते, तेव्हा फॉस्फरस हे औषध वापरावे. तसे पाहता हे फॉस्फरस औषध मल्टिअ‍ॅक्शन रेमिडी आहे. सर्व आजारांवर चालते तरी पण व्यक्‍ती भिन्‍नतेच्या नियमाआधारे आपण रुग्णाला औषध द्यावे. फॉस्फरसचे रुग्ण उंच, सरळ नाकी, टपोरे डोळे व आकर्षक बांध्याचे असतात. कोणालाही या व्यक्‍तींचा सहवास हवाहवासा वाटतो. नाकातील मास या आजारावर जेव्हा खूप उपचार करून झालेले असतात तेव्हा ट्युक्रीयम मॅरम हे औषध वापरावे. नाकातील मास वाढल्यामुळे खूपच सर्दी होते व वास येण्याचे कमी होते तर कधी कधी वास येतच नाही. 

अशी अनेक होमिओपॅथिक औषधे नाकातील मास वाढण्यावर उपयोगी पडतात; पण त्या त्या रुग्णांचे परीक्षण करून त्याला साम्य असणारे औषध योग्य मात्रेत द्यावे लागतात. कुठलेही औषध होमिओपॅथिक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news