

मायकोसिस हा बुरशीजन्य संसर्ग आहे. नवजात किंवा अगदी लहान बाळांमध्ये होणारा हा सर्वसामान्य आजार आहे. आकडेवारीनुसार 10 पैकी 7 मुलांना त्वचेचा हा आजार होतो.
मायकोसिस त्वचेवर पडणार्या लाल चट्ट्यांसारखा दिसतो; मात्र त्याचा परिणाम खूप धोकादायक असू शकतो. थेट उतींवर हल्ला करत असल्याने हा आजार धोक्याचे कारण ठरू शकतो. हा विकार केवळ त्वचेपर्यंत मर्यादित राहत नाही, तर उती, हाडे आणि शरीर या सर्वांवरच त्याचा परिणाम होताना दिसतो. त्वचेवर लाल चट्टे पडणे, योनीमार्गात संसर्ग किंवा खाज येणे हेदेखील प्राथमिक लक्षण आहे. यावर उपचार करण्यासाठी डॉक्टर सुरुवातीला बुरशीविरोधी म्हणजे अँटिफंगल औषधे सेवन करण्याचा सल्ला देतात.
मायकोसिस आजार हा पांढर्या पेशींशी निगडीत आहे. पांढर्या पेशींना टी सेल असेही म्हटले जाते. जेव्हा या पेशींचे प्रमाण नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा या पेशी रक्तातून हळूहळू त्वचेकडे जाऊ लागतात. त्वचेजवळ गेल्यानंतर मग त्वचेवर पुरळ येणे, खाज आणि खरूज वाढू लागते. अर्थात, मायकोसिस हा जीवघेणा आजार नाही, हे नक्की! शिवाय त्यावरील उपचारही सोपे आहेत. काही डॉक्टरांच्या मते मायकोसिसची लक्षणे रक्ताच्या कर्करोगासारखी असली, तरीही या लक्षणांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. रक्ताचा कर्करोग झालेली व्यक्ती पुन्हा पुन्हा संसर्गाच्या विळख्यात सापडते. बालकांच्या शरीरात ल्युकेमियाच्या पेशी विकसित होतात तेव्हा रुग्णाच्या तोंड, घसा, त्वचा आणि फुफ्फुसे आदींमध्ये संसर्ग होण्याची तक्रार आढळते आणि त्वचेला खाज येते.
मायकोसिस रोगाची लक्षणे : चिंता किंवा असुरक्षित वातावरण हे रोग बळावण्याचे महत्त्वाचे कारण आहे. शरीराच्या कोणत्याही भागात अॅलर्जी किंवा खाज येते. चिंता, मानसिक आजार, नैराश्य किंवा तणावाची परिस्थिती, त्वचा कपडे किंवा बॅग्ज किंवा इतर अॅक्सेसरीजमुळे रगडली जाते. याशिवाय जीवाणूजन्य किंवा विषाणूजन्य संसर्ग, सूर्यप्रकाश किंवा उष्णता यांचा त्वचेशी अतिसंपर्क, खरूज किंवा मुरुमे असे त्वचेचे आजार, औषधे किंवा इंजेक्शन यांच्या विरोधात रिअॅक्शन येणे यासारख्या कारणांमुळे मायकोसिस बळावू शकतो.