

बरेच लोक माऊथवॉशचे फायदे-तोटे समजून न घेता ते वापरण्यास सुरुवात करतात. वस्तुतः, दंतचिकित्सकांच्या सल्ल्यानुसार माऊथवॉश निवडणे आवश्यक आहे. माऊथवॉश घेताना बाटलीवरील सूचना काळजीपूर्वक वाचा आणि त्यानुसार वापरा.
सामान्यतः, एका वेळी १०-१५ मिली लिटर माऊथवॉश तोंडात घेणे श्रेयस्कर ठरते. माऊथवॉश तोंडात ३० सेकंद ते १ मिनिटापर्यंत फिरवावे, जेणेकरून ते तोंडाच्या सर्व भागांमध्ये पोहोचेल. माऊथवॉश कधीही गिळू नये. माऊथवॉश वापरल्यानंतर किमान ३० मिनिटे काहीही खाणे-पिणे टाळा, ज्यामुळे त्याचा प्रभाव टिकून राहील.
माऊथवॉश तोंडातील दुर्गंधी निर्माण करणाऱ्या जीवाणूंना नष्ट करून ताजा श्वास प्रदान करते. अँटीसेप्टिक माऊथवॉश तोंडातील हानीकारक जीवाणूंची संख्या कमी करून संक्रमणांचा धोका कमी करतात.
फ्लोराईडयुक्त माऊथवॉश दातांच्या कॅव्हिटींची शक्यता कमी करतात. माऊथवॉश हिरड्यांवरील सूज आणि रक्तस्त्राव कमी करून त्यांचे आरोग्य सुधारतात. काही माऊथवॉश तोंडातील अल्सरमध्ये आराम देऊ शकतात.
अल्कोहोलयुक्त माऊथवॉशचा नियमित वापर केल्यास तोंडातील लाळेचे प्रमाण कमी होऊन तोंड कोरडे होण्याची शक्यता असते. काही माऊथवॉश तात्पुरती तोंडाची चव बदलू शकतात.
माऊथवॉशचा अतिवापर केल्यास तोंडातील नैसर्गिक जीवाणू संतुलन बिघडू शकते. माऊथवॉशचा सतत वापर केल्याने जास्त तहान लागू शकते. याशिवाय 1 दातांवर डाग, काहींना अॅलर्जी आणि तोंड लालसर होण्याची शक्यता असते