नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
तुळस हे भारतातील एक पवित्र आणि औषधी गुणांनी भरलेले एक बहुपयोगी रोपटे असल्याने आजकाल खेडयात आणि शहरात प्रत्येकाच्या घराच्या दारात पवित्र तुळशीचे रोपटे असतेच. भारतीय पंरपरेत पवित्र तुळशीचे पुजन लक्ष्मीचे रूप म्हणून केले जाते. तुळशीला पुजन करत असलेल्या Holy Basil आणि बिया असलेल्या तुळशीला Sweet Basil असे दोन प्रकार पाहावयास मिळते.
तुळशीमध्ये प्रोटीन, फायबर, विटामिन ए, विटामिन बी, कार्बोहायड्रेड, ओमेगा -३ फँटी असिड याशिवाय खनिज तत्वे तुळशीत असते. शीतपेय, फालूदा तयार करण्यासाठी तुलशीच्या बियांचा वापर केला जातो. त्यामुळे जाणून घेवूयात औषधी तुळशीचे गुणधर्म…
१) वजन कमी करणे
तुलशीच्या बिया वजन कमी करण्यासाठी केला जातो. या तुळशीच्या बियात फायबर असल्याने पाण्यात भिजवल्याने त्याचा आकार ३० पट्टीने वाढतो. हे पाणी पिल्याने पोट भरल्यासारखे वाटत राहते त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
२) केसांसाठी उपयुक्त
तुळशीच्या बियामध्ये विटामिन, प्रोटीन आणि आर्यन हे घटक असतात. त्यामुळे केसातील कोंडा कमी होवून केस चमकदार होण्यास मदत होते.
३) त्वचेसाठी उपयुक्त
तुळशी शरीरातील वेगवेगळ्या आजारांपासून आपल्याला वाचवते. तुळशीच्या बीया (1चम्मचा ) आणि नारळाचे तेल (100 मिलीलीटर )चे मिश्रण पाच मिनटे गरम करून घ्या. ते थोडे थंड झाल्यावर शरीरावर लावल्यास सोरायसिस आणि एझिमा या सारख्या आजारावर गुणकारी ठरत आहेत.
४) अँसिडिटीवर उपयुक्त
तुळशीच्या बिया पोटातील अँसिडिटी कमी करून आराम मिळण्यास फायदेशीर ठरते आहे. दररोज सकाळी दुध (१कप) आणि तुळशीच्या बीया (1चम्मचा ) याचे मिश्रण घेतल्यास पोटातील अँसिडिटी कमी होते. तसेच पोटातील जळजळ कमी करण्यासाठी हे मिश्रण प्रभावी ठरते.
५) मधुमेहावर गुणकारी
तुळशीच्या बिया रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवून मधुमेह टाइप-२ कमी करण्यास उपयुक्त ठरत असतो. यासाठी भिजलेल्या तुळशीच्या बिया (1चम्मचा ), दूध (1 ग्लास) आणि वेनिला याचे मिश्रण दिवसातून एक वेळेस घेतल्यास मधुमेहांवर नियंत्रण ठेवले जाते.
६) पोट साफ होणे
तुळशीच्या बियाचे सेवन केल्यास पोटातील अँसिडिटीबरोबरच पोट साफ होण्यास ही मदत होते. यामुळे शरीराला आराम मिळतो.
७) उष्णता कमी करते
शरीरातील उष्णता कमी करण्यास तुळशीच्या बियाचा फायदा होतो. या बिया सरबत, लिंबू पाणी, फालुदा, ज्यूसमध्ये ही याचा वापर केल्यास जास्त फायदेशीर ठरते.
८) लहान मुलांना तापावर उपयुक्त
लहान बाळांना ताप असल्यास तुळशीच्या तेलाने आंघोळी आधी बाळाची तेलाने मालिश केल्यास ताप कमी होतो. तुळशीत प्रतिजैविके आणि वेदनानाशक घटक असल्याने तापावर उपयुक्त ठरत आहे.
९) दातांची निगा राखणे
तुळशीच्या पानांचा वापर दातांचे दुखणे, हिरडया कमजोर होणे, दातातून रक्त येणे, दात कमजोर होणे, दात सडणे, या सर्वांवर गुणकारी आहे. तुळशीची पाने तोंडात ठेवल्यास चांगला फायदा होता. दात ठणकत असल्यास त्यावर तुळशीची पाने ठेवल्यास प्रभाव पडतो.