

आजच्या काळात प्लास्टिकचा वापर इतका वाढला आहे की तो आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. अन्नाचे डबे, बाटल्या, पॅकेट्स सगळीकडे प्लास्टिकचं वर्चस्व आहे. पण आता हेच प्लास्टिक आपल्या शरीरात शिरत आहे आणि आपले आरोग्य धोक्यात घालत आहे. अलीकडील संशोधनानुसार, महिलांच्या अंडाशयात (ovaries) देखील मायक्रोप्लास्टिकचे कण सापडले आहेत, जे प्रजननक्षमतेवर विपरीत परिणाम करू शकतात.
(Microplastics And Infertility)
मायक्रोप्लास्टिक म्हणजे अशा सूक्ष्म प्लास्टिकच्या कणांचा समावेश, जे 5 मिलिमीटरपेक्षा लहान असतात. प्लास्टिकच्या वस्तू तुटल्या, झिजल्या किंवा विघटित झाल्यावर हे कण तयार होतात. हे कण हवा, पाणी, अन्नपदार्थ, सौंदर्यप्रसाधने इत्यादींमध्ये असतात. प्लास्टिकच्या बाटल्या, पॅक फूड, प्लास्टिकच्या प्लेट्स यांचा वापर केल्याने हे कण आपल्याच्या शरीरात प्रवेश करतात आणि नंतर रक्तप्रवाहाद्वारे विविध अवयवांपर्यंत पोहोचतात.
अमेरिकेतील न्यू मेक्सिको विद्यापीठातील संशोधकांनी एक अभ्यास केला, ज्यामध्ये 24 महिलांच्या अंडाशयातील फॉलिकल फ्लुइडमध्ये मायक्रोप्लास्टिकचे कण आढळले. हे द्रव अंड्यांच्या वाढीसाठी जबाबदार असतात. या प्रत्येक नमुन्यात मायक्रोप्लास्टिक सापडले, हे अत्यंत चिंताजनक आहे कारण अंडाशय हा स्त्रियांच्या प्रजनन संस्थेचा महत्त्वाचा भाग आहे.
या संशोधनात सरासरी 123 मायक्रोग्रॅम/ग्राम मायक्रोप्लास्टिक अंडाशयाच्या ऊतींमध्ये आढळले. तब्बल 7 प्रकारचे प्लास्टिक कण सापडले, ज्यामध्ये पीव्हीसी (Polyvinyl Chloride) चे प्रमाण सर्वाधिक होते. पीव्हीसी हे हार्मोन्सच्या सुसंवादावर विपरीत परिणाम करणारे आहे.
हार्मोनल असंतुलन: पीरियड्स अनियमित होणे, थायरॉईड बिघाड, वजनात चढ-उतार होणे.
प्रजननक्षमतेवर परिणाम: अंड्यांची गुणवत्ता कमी होऊन गर्भधारणेस अडचण निर्माण होऊ शकते.
इम्युनिटीवर परिणाम: शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते.
गर्भातील बाळावर परिणाम: गर्भवती महिलांच्या शरीरातील मायक्रोप्लास्टिक गर्भातील बाळालाही नुकसान करू शकते.
प्लास्टिकच्या बाटल्यांऐवजी स्टील किंवा तांब्याच्या बाटल्या वापरा.
पॅक फूड किंवा मायक्रोवेव्हमध्ये गरम केलेल्या प्लास्टिक कंटेनर्सपासून दूर रहा.
ताजं व घरी बनवलेलं अन्न खा.
बाजारातील सौंदर्यप्रसाधनांमधील मायक्रोप्लास्टिकपासून सावध रहा.
डिटॉक्स ड्रिंक्स किंवा आयुर्वेदिक उपायांचा वापर करा, जे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात.
येत्या पिढ्यांचं आरोग्य वाचवायचं असेल तर आजपासूनच सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.