Women Health| मासिक पाळीच्या असह्य वेदनांवर 'हॉट बॅग' प्रभावी की 'आईस पॅक'? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Period Pain : शेक घेताना 'या' गोष्टींची काळजी घेणे गरजेचे
Menstrual Cramp Home Remedies
Menstrual Cramp Home Remedies Canva
Published on
Updated on

डॉ. भारत लुणावत

मासिक पाळीदरम्यान होणार्‍या असह्य वेदना आणि पोटात येणारे गोळे (क्रॅम्प्स) यांमुळे अनेक महिला त्रस्त असतात. या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय म्हणून अनेकदा गरम पाण्याचा शेक (हॉट वॉटर बॅग) किंवा बर्फाचा शेक (आईस पॅक) वापरला जातो. परंतु, यापैकी कोणता पर्याय अधिक प्रभावी आहे, याबाबत महिलांमध्ये बर्‍याचदा संभ्रम असतो.

मासिक पाळीच्या वेदनांवर बहुतांश तज्ज्ञ आणि संशोधने गरम पाण्याचा शेक घेण्याची शिफारस करतात. पाळीदरम्यान गर्भाशयाचे स्नायू आकुंचन पावत असल्यामुळे वेदना होतात. आपण पोटावर गरम पाण्याची पिशवी ठेवतो, तेव्हा त्या उष्णतेमुळे गर्भाशयाच्या आणि ओटीपोटाच्या आसपासचे कडक झालेले स्नायू शिथिल होतात. रक्ताभिसरण वेगवान होते. गर्भाशयाच्या पेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळतो आणि पेटके येण्याचे प्रमाण लगेच कमी होते.

नैसर्गिक वेदनाशामक : संशोधनानुसार, शरीरावर उष्णतेचा स्पर्श झाल्यामुळे मेंदूकडे जाणारे वेदनांचे संकेत मंदावतात, ज्यामुळे वेदनांची तीव्रता कमी जाणवते.

बर्फाचा शेक (आईस पॅक) कधी उपयुक्त ठरतो?

बर्फाचा शेक हा सामान्यतः पाळीच्या नेहमीच्या क्रॅम्प्ससाठी उत्तम मानला जात नाही, कारण थंडीमुळे स्नायू अधिक आकुंचन पावू शकतात. पाळीच्या वेदनांसोबत ओटीपोटात तीव्र जळजळ, जडपणा किंवा अंतर्गत सूज (इन्फ्लेमेशन) जाणवत असेल, तर बर्फाचा शेक उपयुक्त ठरतो.

भाग बधीर करणे : बर्फाच्या गारव्यामुळे त्या भागातील मज्जातंतू तात्पुरत्या बधीर होतात. यामुळे वेदनांची जाणीव काही काळासाठी कमी होते. विशेषतः ज्या महिलांना उष्णतेमुळे जास्त त्रास होतो किंवा शरीरात आधीच उष्णता वाढलेली असते, त्यांना आईस पॅकमुळे आराम वाटू शकतो. वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केल्यास ‘हॉट वॉटर बॅग’ (उष्णता) हाच मासिक पाळीच्या वेदनांवर सर्वोत्तम आणि नैसर्गिक उपाय मानला गेला आहे. तो थेट वेदनांच्या मूळ कारणावर (स्नायूंच्या आकुंचनावर) काम करतो.

शेक घेताना घ्यायची काळजी-

गरम पाण्याचा शेक : पाणी जास्त उकळते नसावे. त्वचा भाजण्यापासून वाचवण्यासाठी हॉट वॉटर बॅग थेट त्वचेवर न ठेवता कपड्यावरून शेक घ्यावा. एका वेळी २० ते ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ शेक घेऊ नये.

बर्फाचा शेक : बर्फ थेट त्वचेवर थेट वापरू नये. तो नेहमी सुती कपड्यात किंवा आईस बॅगमध्ये गुंडाळून फक्त १० ते १५ मिनिटांसाठीच वापरावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news