

डॉ. वर्धमान कांकरिया
चष्मा किंवा काँटॅक्ट लेन्स न लावता जग स्वच्छ दिसावे, या तीव्र इच्छेतून अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांवर अव्याहतपणे संशोधन सुरू आहे. या शस्त्रक्रिया अधिकाधिक अचूक आणि वेदनारहित व्हाव्यात, यासाठी जगभरातील नेत्रतज्ज्ञ अथक प्रयत्न करत आहेत. यामध्ये लॅसिक लेसर ही शस्त्रक्रिया डोळ्यांचा नंबर घालवण्यासाठीची लोकप्रिय शस्त्रक्रिया मानली जाते.
लॅसिक शस्त्रक्रियेमधील प्रगती
स्माईल लेसरद्वारे चष्मा काढणे : स्माईल लेसर (ब्लेडलेस आणि फ्लॅपलेस लेसिक) ही चष्मा काढण्यासाठीची सर्वात सुरक्षित आणि कमी आक्रमक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत फ्लॅप कटिंगची गरज नसते, त्यामुळे कोरडेपणा कमी होतो आणि दीर्घकालीन परिणाम अधिक स्थिर राहतात. हे विशेषतः गोलाकार (स्फेरिकल) नंबर असलेल्या रुग्णांसाठी उत्तम पर्याय आहे.
काँटुरा लॅसिक : काँटुरा हे प्रगत, वैयक्तिकृत लॅसिक तंत्र असून, ते कॉर्नियाच्या आकाराच्या नकाशावर आधारित लेसर पॅटर्न वापरते. हे पारंपरिक लेसिकपेक्षा अधिक अचूक दृष्टी देते. हे अॅस्टिग्मॅटिझम (सिलिंड्रिकल पावडर) आणि हायपरोपिया (प्लस पॉवर्स) असलेल्या रुग्णांसाठी सर्वात योग्य आहे.
वाचनाचे चष्मे काढणे : 40 वर्षांनंतरही ब्लेंडेड व्हिजन लेसर आणि रिक्रॅक्टिव्ह लेन्स एक्स्चेंज प्रक्रियेद्वारे वाचनाचा नंबर सहजपणे आणि केवळ 5 मिनिटांत दुरुस्त करता येतो.
आयसीएल इम्प्लांट : नव्या पिढीतील आयसीएल तंत्रज्ञानाद्वारे-8 डायॉप्टरपेक्षा जास्त मायोपिया (दूरचा नंबर) सुधारता येतो. यात डोळ्यांचा कोरडेपणा होत नाही, रिग्रेशनची शक्यता कमी असते आणि ही प्रक्रिया गरज पडल्यास उलटवता (रिव्हर्सिबल) येते.