विजापूर : पुढारी वृत्तसेवा
विजापुरात 11 रुग्णांना घरी सोडण्यात आले असू, स्वॅब चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पालकमंत्री शशिकला जोल्ले यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, विजापुरातील 2119 कोरोना संशियतांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत त्यापैकी 1934 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून अजून 141 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला असून 11 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. इतर 33 कोरोनाबांधितांवर सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण विभागात उपचार करण्यात येत आहेत.
जिल्हा सरकारी हॉस्पिटला कोव्हिड 19 हॉस्पिटलात परिवर्तन करण्यात आल्यामुळे इतर रुग्णांसाठी वेगळा विभाग सुरु करुन वैद्यकीय सेवा पुरविण्याची सूचना अधिकारी वर्गाला केली असल्याचेही मंत्री जोल्ले यांनी सांगितले.
बैठकीत जिल्हाधिकारी वाय.एस.पाटील, जिल्हा पोलिस प्रमुख अनुपम अगरवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद रेड्डी, महानगर पालिका आयुक्त हर्ष शेट्टी,आ. एम.बी.पाटील, आरोग्य खात्याचे माजी मंत्री शिवानंद पाटील, माजी मंत्री एम.सी मनगोळी, आ.यशवंरायगौडा पाटील, आ. ए. एस.पाटील नडहळ्ळी, आ. सोमनगौडा पाटील (सासनूर), विधान परिषद सदस्य अरुण शाहपूर व इतर उपस्थित होते.