

मेटॅबॉलिझम म्हणजे ‘चयापचय’ हे उत्तम असणे आरोग्याचे लक्षण मानले जाते. आपला बेसल मेटॅबॉलिक रेट म्हणजे बीएमआर अनेक घटकांवर अवलंबून असतो. मात्र, काही गोष्टींची काळजी घेतली, तर हा रेट नक्कीच सुधारता येऊ शकतो.
मेटॅबॉलिझम ही एक अशी क्रिया आहे, ज्यामध्ये आपल्या शरीराद्वारे खाल्लेले अन्न आणि पेय ऊर्जेमध्ये रूपांतरित होते. अशा परिस्थितीत आपले चयापचय हळू झाले तर शरीरातील ऊर्जा आपोआप कमी होईल. म्हणूनच आपल्याला माहिती पाहिजे की, आपला बेसल मेटॅबॉलिक रेट बीएमआर ठरवण्यासाठी कोणकोणते घटक महत्त्वाचे असतात. हे घटक जाणून घेतले, तर हा रेट योग्य राखणे शक्य होऊ शकते.
शरीराचा आकार म्हणजे बॉडी साईज उंच-धिप्पाड लोकांचे शरीर अधिक कॅलरीज जाळतात. तसेच ज्यांचे मसल्स जास्त असतात त्यांचेही असेच होते. एकाच वयाच्या स्त्री आणि पुरुषांमध्ये शरीरातील चरबीचे प्रमाण भिन्न असते. पुरुषांमध्ये फॅट्स कमी असतात त्यामुळे ते जास्त कॅलरी जाळतात.
वय वाढते तसतसे स्नायूंचे आकारमान कमी होऊ लागते आणि कॅलरी जाळण्याची कृती मंदावते. अन्नावर होणारी प्रक्रिया महत्त्वाची असते. उदा. डायजेस्टींग, अॅब्जार्व्हिंग, ट्रान्सपोर्टिंग आणि स्टोअरिंग यामध्ये अन्नाचा व्यवस्थित वापर झाला तर कॅलरीजदेखील जळतात. त्यामुळे शरीराची पुरेशी हालचाल आवश्यक असते. व्यायाम आणि इतर कामादरम्यान बर्याच कॅलरीज जळतात.
बीएमआर वाढवण्यासाठी काही गोष्टी आपण नक्कीच करू शकतो. सकाळी उठल्यानंतर नाश्ता जरूर करावा. तो नाही केला तर चयापचय मंदावते. दिवसा लवकर खाण्याचा प्रयत्न करावा. अधिक काळ उपाशी राहू नये. ब्रेकफास्ट आणि दुपारचे जेवण वेळेत केले तर आपले वजन नियमित राहते. झोपण्यापूर्वी दोन तास आधी जेवण करावे. बाराशेपेक्षा कमी कॅलरीजचा वापर केल्यास चयापयच कमी होतो. आहारात फळे आणि भाज्यांचा अधिक समावेश करावा.
तसेच कार्बोहायड्रेट्स जास्त घेऊन फॅट असणारे पदार्थ कमी खावेत. नियमित व्यायाम करावा. दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण यानंतर दहा ते पंधरा मिनिटे जरूर चालावे. यामुळे चयापचय सुधारते. लिफ्ट ऐवजी पायर्यांचा वापर करावा. ऑफिसपासून थोड्या अंतरावर गाडी पार्क करावी, यामुळे थोडे चालणे होईल. अल्कोहोल घेणे टाळावे. याऐवजी भरपूर पाणी प्यावे.
अल्कोहोलमुळे चयापचय मंदावते. तसेच कुठलीही समस्या असेल, तर त्यावर वारंवार गोळ्या घेेणे टाळावे. या गोष्टी लक्षात ठेवल्या तर मेटॅबॉलिझम सहज वाढू शकते. मेटॅबॉलिझम वाढले म्हणजे शरीर नेहमी स्फूर्तिदायक राहते.