

केवळ आसन म्हणजे योग नाही, योगाची निर्मिती yug या शब्दापासून झाली. आपल्या शरीराचे अस्तित्व हे आपले शरीर, आपला श्वास आणि आपल्या मनाचे संघटन असते, या तिन्हीमुळे आपल्या अस्तित्वाची ओळख पटते. या तिन्ही गोष्टींचा समन्वय योग करतांना होतो. व्यायामात माणसाचे श्वासावर नियंत्रण नसते, योगामध्ये श्वासावर नियंत्रण असते, श्वास आणि शरीरांच्या हालचालींच्या कृतीतून योग घडतो.
योगासने किंवा योग केवळ शरीराच्या तंदुरस्तीसाठी नाही तर मनाच्या तंदुरूस्तीसाठी आवश्यक आहे. जीवनात भावभावना किंवा सुख- दुःखाचे चढउतार असतात. सुख आणि दुःख या दोन्हींकडे समान भावनेनं पाहण्याची दृष्टी योगामुळे माणसाला प्राप्त होते.
योगसाधनेचा आद्य असलेल्या पंतजंली ऋषींनी दुःखाच्या निवारण्यासाठी योग किती महत्वाचा आहे, हे सांगितले आहे. आपली जीवनशैलीमुळे किंवा प्रारब्धामुळे आपल्याला येणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी योग आणि आयुर्वेद आपल्याला आत्मसात करण्याची गरज आहेत.
योगामुळे आपली पचनशक्ती चांगली राहते, रक्ताभिसरण चांगले होते, शरीरातील प्राणवायुची मात्रा चांगली रहाते, प्रतिकारशक्ती वाढते, हे सर्व शारीरिक फायदे योगामुळे होतात. रोजच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला योगासने करण्यासाठी खूप वेळ देता येत नसला तरी रोज सूर्यनमस्कार करावेत, सूर्यनमस्कारामध्ये सर्व आसने आहेत.
पाठदुखीसाठी सेतूबंधासन, भुजंगासन आणि मार्जरासन करावीत. खांदेदुखी साठी ताडासन, शलभासन,
मधुमेही रूग्णांनी - पोटावर झोपून करता येणारी सर्व आसने करावीत
योग दिना पुरतेच नाहीतर योगासने करण्याची सवय रोजच्या दात घासणे आणि आंघोळ करण्यासारख्या सवयी इतकीच महत्वाची आहे. प्रत्येकांने 40 दिवस नियमित योगासने केली की शरीराला ती सवय लागतो आणि योगाचा संस्कार आपोआप होतो. मन आणि शरीराच्या तंदुरूस्तीसाठी योग नियमित करणे ही आपल्या प्रत्येकाची सवय झाली पाहिजे.