Healthy Fats for Children | बाल्यावस्थेतील स्निग्ध पदार्थांचे महत्त्व

Healthy Fats for Children |
Healthy Fats for Children | बाल्यावस्थेतील स्निग्ध पदार्थांचे महत्त्व
Published on: 
Updated on: 

डॉ. भारत लुणावत

लहान मुलांच्या विशेषतः दीड-दोन वर्षांपर्यंतच्या बालकांच्या आहाराबाबत पालक नेहमीच विशेष काळजी घेतात. प्रौढांच्या आरोग्याच्या कल्पना आणि डाएटच्या सवयींमुळे अनेकदा लहान मुलांच्या आहारातील स्निग्ध पदार्थांकडे म्हणजेच फॅट्सकडे दुर्लक्ष केले जाते; परंतु दोन वर्षांखालील बालकांच्या मेंदू आणि चेतासंस्थेच्या योग्य विकासासाठी स्निग्ध पदार्थ हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.

पहिल्या दोन वर्षांत बालकांच्या मेंदूचा विकास अत्यंत वेगाने होत असतो. या काळात आहारातील स्निग्ध घटकांवर जाणीवपूर्वक बंधने आणणे अयोग्य ठरते. स्निग्ध पदार्थ हे मेंदूच्या पेशींच्या पटलांची (सेल मेंब्रेन) निर्मिती करण्यास आणि मायलिन म्यान (मायलिन शीथ) तयार करण्याच्या प्रक्रियेस मदत करतात. या संरक्षण आवरणामुळे मज्जातंतूंमधून मेंदूचे संदेश जलद आणि कार्यक्षमतेने प्रवाहित होतात. विशेषतः ओमेगा-३ आणि डीएचएसारखे स्निग्ध आम्ल बालकांच्या मेंदू तसेच डोळ्यांच्या निरोगी विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात.

बालकांच्या आहारात स्निग्ध घटकांचा समावेश करताना अन्नाची योग्य निवड करणे गरजेचे आहे. याचा अर्थ प्रत्येक पदार्थात जास्त लोणी घालणे असा नसून, नैसर्गिकरीत्या स्निग्धता प्रदान करणार्‍या पदार्थांचा आहारात समावेश करणे असा आहे. पहिल्या वर्षात आईचे दूध किंवा फॉर्म्युला मिल्क यातून बालकांना आवश्यक फॅट्‌स मिळतात. त्यानंतर साययुक्त दही, बदाम किंवा इतर बियांची पेस्ट यांचा आहारात सुरक्षितपणे समावेश करता येतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news