आजार जपानमध्ये, काळजी भारतीयांना

जपानमध्ये ‘स्ट्रेप्टोकॉकल टॉक्झिक शॉक सिंड्रोम' असा दुर्मीळ आजार पसरतोय
A rare disease called 'Streptococcal Toxic Shock Syndrome' is spreading in Japan
रुग्णाचे लसीकरण करताना वेद्यकिय आधिकारीFile Photo Pudhari New's
डॉ. अनिल मडके

गेल्या काही दिवसांपूर्वी, मनात धास्ती निर्माण करणारी एक बातमी आली आहे, ती बातमी म्हणजे ‘जपानमध्ये पसरतोय एक दुर्मीळ आजार’. ‘स्ट्रेप्टोकॉकल टॉक्झिक शॉक सिंड्रोम STSS (Streptococcal Toxic Shock Syndrome) असे त्याचे नाव. याला कारणीभूत असणारा ‘ग्रुप ए स्ट्रेप्टोकॉकस’ (G-S) जीवाणू हा मांसभक्षी म्हणजेच Flesh-Eating Bacteria असतो. रुग्ण कमी कालावधीत, म्हणजे अगदी 48 तासांत सुद्धा गंभीर होऊ शकतो.

या वर्षीच्या जून महिन्यापर्यंत जपानमध्ये या आजाराच्या 977 रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी ती 941 इतकी होती. त्यामुळे काळजी वाढली आहे. जपानच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फेक्शियस डिसीज’ च्या मते, या आजारावर वेळीच नियंत्रण आले नाही, तर हा आकडा अडीच हजारांवर जाऊ शकतो. याचा मृत्यू दर 30% पर्यंत इतका असल्याने काळजी वाढली आहे. 2022 मध्ये हा आजार युरोपमधील ब्रिटन, फ्रान्स, आयर्लंड, नेदरलँड आणि स्वीडन या पाच देशांमध्ये पसरला होता.

A rare disease called 'Streptococcal Toxic Shock Syndrome' is spreading in Japan
भारतीयांचे ५६ टक्के आजार चुकीच्या आहारामुळेच!

लहान मुले विशेषत: 3 ते 14 वर्षे वयोगटातील मुले आणि वृद्ध व्यक्ती हे या आजाराला अधिक प्रमाणात बळी पडतात. सुरुवातीला बारीक ताप येतो. घसा खवखवतो. घसा दुखतो. स्नायू दुखतात. उलटी – मळमळ होते. सर्वसाधारणपणे फ्लू सारखी लक्षणे असतात. दुर्लक्ष केल्यास किंवा निदान न झाल्यास लक्षणे गंभीर रूप धारण करतात. ताप खूप वाढतो. नाडीचे ठोके वाढतात. चक्कर येते. डोके दुखते. डोळे लाल होतात. छातीत धडधडते. काही व्यक्तींमध्ये जुलाब होतात.

रक्तदाब कमी होत जातो. हळूहळू श्वास घेण्यास त्रास होतो. श्वसनसंस्था क्षीण होते. मूत्रपिंडाच्या कामावरही परिणाम होतो. काही व्यक्तींमध्ये त्वचा लालसर होते. त्वचा आणि स्नायू काळेनिळे पडू लागतात. हा आजार सर्व अवयवात पसरून अवयव निकामी होऊ लागतात ज्याला ‘मल्टी ऑर्गन फेल्युअर’ असे म्हणतात. जपानमध्ये लहान मुले या आजाराला सर्वाधिक बळी पडली आहेत. यांच्यामध्ये सुरुवातीला पायावर सूज येऊन आजार वाढत गेल्याची वार्ता आहे.

A rare disease called 'Streptococcal Toxic Shock Syndrome' is spreading in Japan
आजार लपवून कामावर जाणार्‍यांची संख्या मोठी!

ज्या व्यक्तींना भाजल्यानंतर जखम झालेली असते किंवा ज्या व्यक्तींमध्ये कोणत्याही कारणामुळे झालेली जखम उघडी असते, त्यांना हा जीवाणूसंसर्ग होण्याचा संभव अधिक असतो. एखादी शस्त्रक्रिया झाली असेल, विशेषतः आतड्याशी संबंधित शस्त्रक्रिया असेल किंवा खूप दिवस शस्त्रक्रियेची जखम भरून येत नसेल तर या आजाराचा धोका राहतो. याशिवाय मधुमेही व्यक्ती, मद्यपी व्यक्ती, दुर्बल रोगप्रतिकारक्षमता हे घटक या आजाराला आमंत्रण देतात.

ग्रुप ए स्ट्रेप्टोकॉकस या जीवाणू द्वारे सोडली जाणारी विषद्रव्ये रक्तात मिसळतात आणि त्याचा परिणाम वेगवेगळ्या अवयवांवर होतो. हा आजार रुग्णाचा वैद्यकीय इतिहास आणि अत्यंत वेगाने वाढत जाणारी वर नमूद केलेली लक्षणे यावरून ओळखता येतो. अर्थात जखमेतील स्रावाची कल्चर चाचणी किंवा रक्ताची कल्चर चाचणी यावरून तो स्ट्रेप्टोकॉकस’ (G-S) जीवाणू’ आहे की नाही हे समजते.

A rare disease called 'Streptococcal Toxic Shock Syndrome' is spreading in Japan
रात्री उशिरा जेवल्याने ‘हे’ आजार बळावू शकतात, काय सांगते नवे संशोधन?

रुग्ण गंभीर होत असेल तर फुफ्फुसे, मूत्रपिंडे, यकृत यांच्याशी संबंधित सर्व रक्तचाचण्या कराव्या लागतात. अशा रुग्णांवर तातडीने उपचार करणे आवश्यक असते. ‘स्वच्छता’ हा या आजारापासून दूर राहण्याचा मंत्र आहे. विशेषतः ज्यांना जखमा आहेत, त्यांनी जखमांची नीट काळजी घ्यावी. वेळच्या वेळी शुश्रूषा करावी. जखमांची काळजी घेताना हात स्वच्छ असावेत. रुग्ण, रुग्णासोबतच्या व्यक्ती आणि रुग्णावर उपचार करणारे अशा सर्वांनी स्वच्छतेची काळजी घ्यावी. मधुमेह कर्करोग किंवा अन्य दीर्घकालीन विकार असल्यास त्यावरील नियमित उपचार ही अत्यंत महत्त्वाची बाब असते. सध्या तरी भारतामध्ये या आजाराची मोठ्या प्रमाणावर नोंद झालेली नाही. पण, वाढलेल्या जागतिक दळणवळणामुळे हा आजार इतर देशांत पसरू शकतो, हे लक्षात ठेवावे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news