Parkinson | हात सतत थरथरताहेत? तर मग जाणून घ्या या मागील कारणे...

Parkinson | दीर्घकाळ हात थरथरत असतील, तर ते पार्किन्सन्स, थायरॉईड असंतुलन किंवा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचे लक्षणदेखील असू शकते.
Parkinson's
Parkinson'sPudhari
Published on
Updated on

डॉ. संजय गायकवाड

चहाचा कप धरताना हात किंचित थरथरतात असे तुम्हाला कधी वाटले आहे का किंवा रोजची कामं करणं, लिहिणं, कपडे घालणं किंवा गाडी चालवणं कठीण होऊन बसावं असा हातांचा थरकाप होतो का? असे एखाद्या वेळी घडले असेल, तर घाबरण्याचे कारण नाही; परंतु सातत्यानं असं घडत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.

कधी कधी अतिथकवा, ताण, कॅफीन किंवा काही औषधांच्या दुष्परिणामांमुळे हात थरथर कापतात; पण दीर्घकाळ हात थरथरत असतील, तर ते पार्किन्सन्स, थायरॉईड असंतुलन किंवा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचे लक्षणदेखील असू शकते.

हाताचा थरकाप आणि मेंदूचा काय संबंध ? आपल्या हातांच्या हालचाली मेंदूच्या नियंत्रणाखाली असतात. जेव्हा मेंदू योग्यरीत्या कार्य करत नाही किंवा एखाद्या रोगाचा परिणाम होतो. तेव्हा हात थरथरू शकतात.

पार्किन्सन रोग : हा एक गंभीर न्यूरोलॉजिकल रोग असून यामध्ये मेंदूच्या पेशी हळूहळू कमकुवत होतात. त्याचा प्रभाव हातांवर पडतो आणि ते थरथरू लागतात.

अनुवंशिकता : कुटुंबात पिढ्यान् पिढ्या लिहिताना किंवा वस्तू पकडताना हात थरथरण्याचा त्रास होत असेल, तर अनुवंशिक गुणधर्मामुळे आपल्यालाही तो होण्याची शक्यता असते.

मेंदूला दुखापत : डोक्याला दुखापत, पक्षाघात किंवा कोणत्याही कारणाने मेंदूला इजा झाल्यास हातही थरथरण्याची समस्या उद्भवते.

थायरॉईड समस्या : शरीरात जास्त प्रमाणात थायरॉईड संप्रेरक (हायपरथायरॉईडीझम) तयार होत असल्यास, त्याचा परिणाम नसा आणि स्नायूंवर होऊ शकतो. यामुळे हाताला कंप सुटतो.

औषधांचे दुष्परिणाम : काही औषधे शरीराच्या मज्जासंस्थेवर प्रतिकूल परिणाम करतात. त्यामुळेही हातांचा कंपवात होऊ शकतो.

तणाव आणि चिंता : तुम्ही खूप तणावाखाली असाल किंवा काळजी करत असाल, तर त्याचा शरीरावर आणि मज्जासंस्थेवर परिणाम होऊन हात थरथरू शकतात. अर्थात, यापैकी कोणतेही कारण असूद्या, दीर्घकाळ हातांची थरथर होत असेल किंवा हात कंप पावत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष न करता वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक ठरते. उपाय काय? कंपवातासारखी समस्या उद्भवू नये, यासाठी निरोगी जीवनशैली अंगीकारणे गरजेचे आहे. यासाठी खालील गोष्टी करता येतील.

  • पौष्टिक आहार घ्या.

  • रोज व्यायाम करा. पुरेशी झोप घ्या जेणेकरून

  • तुमच्या शरीराला आणि मनाला आराम मिळेल.

  • तणाव दूर करा.

  • योग आणि ध्यान करा. दीर्घ श्वास घेण्याची सवय लावा.

  • एखाद्या औषधामुळे तुमचे हात थरथरत आहेत असे तुम्हाला वाटत असल्यास, तुमच्या डॉक्टरांशी बोला आणि औषध बदलण्याबद्दल किंवा डोस कमी करण्याबद्दल विचारा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news