आय.पी.एफ.बाबत आशेचा किरण

आयपीएफ एक गंभीर फुफ्फुसाचा आजार
Idiopathic pulmonary fibrosis
इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस
Published on
Updated on
डॉ. नितीन दर्डा

इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस (आयपीएफ) हा एक गंभीर फुफ्फुसाचा आजार आहे. या आजारामध्ये फुफ्फुसांमधील पेशीसमूह किंवा ऊती क्षतिग्रस्त होतात आणि पुढे जाऊन त्या कडक होतात. यामुळे फुफ्फुसांची क्षमता कमी होते. त्यांना योग्य प्रकारे काम करणे कठीण होते. परिणामी, शरीरासाठी आवश्यक असणारा प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन रक्तात मिसळणे कमी-कमी होत जाते.

जगद्विख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांनी अलीकडेच जगाचा निरोप घेतला. त्यांना इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस हा दुर्धर आजार जडला होता आणि या व्याधीशी झुंज देतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर या आजाराविषयी बरीच चर्चा झाली. बहुतेकांना या आजाराविषयी माहिती असणे तर दूर, पण त्याचे नावही ऐकलेले नव्हते. या आजाराची लक्षणे पाहिल्यास श्वास घेण्यात अडचण येणे, सतत कोरडा खोकला येणे, अत्यंत थकवा जाणवणे, वेगाने वजन घटणे, स्नायू आणि सांधेदुखीचा तीव्र त्रास होणे अशा प्रकारची काही लक्षणे रुग्णांना जाणवतात. आज वैद्यकशास्राने थक्क करणारी प्रगती केलेली असली तरी या आजाराचे मूळ कारण काय याबाबत कुणीही ठामपणाने सांगू शकत नाही. सर्वांत धोकादायक बाब म्हणजे या आजारावर आजघडीला कोणतेही परिणामकारक औषध उपलब्ध नाहीये.

दुसरीकडे, या आजाराने ग्रस्त असणारा रुग्ण साधारणतः तीन ते साडे तीन वर्षे जगू शकतो, असे दिसून आले आहे. अर्थात, ही सरासरी आहे. काही रुग्ण त्याहून अधिक काळही जगू शकतात; पण हे जगणे वेदनादायी असते. अशा वेळी अ‍ॅलोपॅथी उपचारांच्या बरोबरीने होमिओपॅथी उपचारपद्धतीचा पूरक उपचारपद्धती म्हणून अवलंब केल्यास आयपीएफग्रस्त रुग्णाचे आयुष्य कमी वेदनादायी होऊ शकते. म्हणजेच ज्याला क्वालिटी ऑफ लाईफ किंवा जीवनाची गुणवत्ता वाढवता येणे शक्य होऊ शकते.

इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस हा आजार सरसकटपणाने आढळताना दिसत नाही. काही हजार लोकांमध्ये एखाद्या व्यक्तीला तो होण्याची शक्यता असते. या आजारात ऑक्सिजनचीच कमतरता भासू लागल्यामुळे रुग्णांना सतत दम लागतो. परिणामी, जगणे हे मरणप्राय बनते. काही महिन्यांपूर्वी या आजाराने ग्रस्त असणार्‍या 79 वर्षांच्या एक महिला आमच्याकडे आल्या होत्या. त्यांना या आजारामुळे प्रचंड त्रास होत होता. होमिओपॅथीमध्ये जेव्हा एखाद्या आजाराचे कारण अज्ञात असते तेव्हा यामागे असू शकणार्‍या काही मानसिक कारणांचे आकलन करून उपचार दिले जातात आणि त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. या महिलेमध्ये तशी कारणे आढळल्यानंतर होमिओपॅथी उपचार करण्यात आले आणि पूर्वी घरामध्ये चालणेही शक्य नसणारी ही महिला आज 200-300 मीटर चालण्यास सक्षम बनली आहे. तसेच दिवसातून सहा ते आठ वेळा लावावा लागणारा ऑक्सिजनही आता बंद झाला आहे. स्टिरॉईडच्या डोसचे प्रमाणही आता कमी झाले आहे. दुर्मीळ आजाराने ग्रस्त असणार्‍यांसाठी हा एक आशेचा किरण आहे. होमिओपॅथी उपचारांच्या या वैशिष्ट्यामुळे जगातील 85 देशांमध्ये होमिओपॅथीचा लाभ घेत आहेत. या उपचारांमुळे इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिससारख्या दुर्धर व्याधी जडलेल्या रुग्णांना किमान वेदनांनी आणि चांगल्या गुणवत्तेचे आयुष्य जगता येऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news