जेवण कसे घ्यावे? | पुढारी

Published on
Updated on

प्रमोद ढेरे

घाई-गडबडीत जेवणे टाळा. नेहमी सावकाशपणे जेवायची सवय लावा. टी. व्ही बघत किंवा मोबाईल चाळत कधीच जेवण करू नका. भूक लागल्यावर जेवणाचा आस्वाद घेत, प्रसन्‍न चित्ताने जेवा.

जेवण करण्याची शिस्तबद्ध पद्धत जाणून घेताना आज आपण जेवायला कसे बसावे, कधी, कसे व किती जेवावे या गोष्टी जाणून घेणार आहोत. जेवायला नेहमी सुखासनात म्हणजे मांडी घालून बसावे. जेव्हा आपण सुखासनात जेवायला बसतो तेव्हा आपला जठराग्‍नी अधिक तीव्र होतो. पचन जास्त चांगल्या पद्धतीने व्हायला मदत होते. शिवाय मांडी घालून बसून जेवताना घास खाण्यासाठी आपली जी मागेपुढे हालचाल होत असते त्यामुळे अन्‍न पुढे-पुढे सरकायलाही मदत होते. डायनिंग टेबलवर बसून जेवणे व बफे डिनर म्हणजे आपण पाश्‍चिमात्यांचे केलेले अंधानुकरण आहे ते टाळावे व आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे जेवायला नेहमी सुखासनात म्हणजे मांडी घालून बसावे.

केव्हा जेवण घ्यावे :   

सर्वात महत्त्वाचे म्हणजे भूक लागल्यावर जेवावे आणि दोन वेळच्या जेवणांच्या मध्ये जर तुम्ही चार तासांचे अंतर ठेवले व या चार तासांच्या कालावधीमध्ये काहीही न खाता, चहासुद्धा न पिता जर तुम्ही फक्‍त पाणी किंवा साधे ताक, म्हणजे साखर किंवा मसाला नसालेलं ताक पिण्याची सवय लावली असेल, तर चार तासांनंतर निश्‍चितच भूक लागते व भूक लागल्यावर जेवणाचा आनंदही मिळतो. मात्र, जर तुम्ही दोन वेळच्या जेवणांमध्ये चहा पित असाल किंवा वरचेवर काहीतरी खात असाल, तर भूक मारली जाते व केवळ जेवणाची वेळ झाली म्हणून जेवले जाते व भूक लागल्यावर जेवणाचा आनंदही मिळत नाही. त्यामुळे  दोन वेळच्या जेवणांमध्ये किमान चार तासांचे अंतर ठेवत, अधूनमधून काहीही न खाता फक्‍त पाणी किंवा प्लेन ताक पित भूक लागल्यावर जेवणाचा आनंद घेत जेवणे महत्त्वाचे.

 कसे जेवावे ः 

घाई-गडबडीत जेवणे टाळा. नेहमी सावकाशपणे जेवायची सवय लावा. टी. व्ही बघत किंवा मोबाईल चाळत कधीच जेवण करू नका. भूक लागल्यावर जेवणाचा आस्वाद घेत, प्रसन्‍न चित्ताने जेवा. एखादा श्लोक म्हणून जेवायला सुरुवात करा. याशिवाय तुम्हाला जितके दात आहेत तितका वेळ प्रत्येक घास चावला गेला पाहिजे. म्हणजे आपल्याला साधारण बत्तीस दात असतात. प्रत्येक घास बत्तीस वेळा चावला गेला पाहिजे. त्यामुळे आपल्या घासात जास्तीतजास्त लाळ मिसळली जाते व आपले पचन चांगल्या पद्धतीने व्हायला मदत होते. त्यामुळे अन्‍नातून आपल्याला जास्तीतजास्त पोषकतत्त्व मिळतात व रोग प्रतिकारकशक्‍ती वाढून आपण निरोगी राहतो.

किती जेवावे : 

आपल्या पोटाचे चार भाग करावेत. अर्धा भाग घन अन्‍नपदार्थ म्हणजे पोळी-भाजी-भात, पाव भाग द्रव अन्‍नपदार्थ म्हणजे कालवण किंवा रस्सा व पाव भाग रिकामा असावा. म्हणजे जेवताना पाणी पिण्याची गरज भासत नाही. थोडक्यात सांगायचे म्हणजे नेहमी भुकेपेक्षा कमी जेवावे. त्यामुळे खालेल्या अन्‍नाचे चांगल्या पद्धतीने पचन होते व त्यातून जास्तीतजास्त पोषकतत्त्व आपल्या शरीराला मिळतात.

शिवाय पचन व्यवस्थितपणे होण्यासाठी तुमच्या पचनसंस्थेचे सर्व्हिसिंग म्हणजेच शुद्धीकरण म्हणजेच Detoxification किमान सहा महिन्यांतून एकदा अवश्य करावे. कारण आपण जे मैद्याचे पदार्थ खातो, बेकरीचे पदार्थ खातो ते काय करतात तर तुमच्या अन्‍ननलिकेला आतून, लहान आतड्याला आतून चिटकतात. वरचेवर चिटकून चिटकून तिथं त्याचा एक थर तयार होतो जो आजपर्यंत आपण कधीही साफ केलेला नाही. मग आता प्यायचं पाणी जरी फिल्टरचे असले, RO चे असते तरी ते जर पाच-सहा महिने बाजूला ठेवले तर त्यातसुद्धा बारीकसारीक किडे तयार होतात. मग हा जो अन्‍ननलिकेला आतून, लहान आतड्याला आतून चिटकलेला मळाचा थर आहे त्यात कालांतराने जंतू तयार होतात व हेच जंतू पुढे रोगजंतूंचे रूप धारण करतात व तुम्हाला कित्येक रोगांना बळी पाडत असतात. म्हणून पोटातून बर्‍याचशा आजारांचं मूळ आहे असं म्हणतात. त्यामुळे किमान सहा महिन्यांतून एकदा जर आपण आपल्या पचनसंस्थेची सर्व्हिसिंग करून हा मळाचा थर जो अन्‍ननलिकेला आतून, लहान आतड्याला आतून चिटकलेला आहे तो वेळोवेळी काढून टाकला, तर आपल्या शरीरात रोगजंतूंची पैदासच होणार नाही व कित्येक आजारांपासून, रोगांपासून आपला बचाव होऊ शकणार आहे. 

शरीराचे शुद्धीकरण :  

याशिवाय तुम्ही जे अन्‍न खाता त्याचे पचन झाल्यानंतर त्याचे आहाररसात रुपांतर होतं व हा आहाररस तुमच्या लहान आतड्यातून रक्‍तात शोषला जातो व तिथून तो सर्व अवयवांपर्यंत पोहोचवला जातो. यालाच वैद्यकीय भाषेत Small Intestine -bsorption असे म्हणतात. मात्र, लहान आतड्याला आतून जर मळाचा थर चिटकलेला असेल तर हे लहान आतड्यातून होणारे आहाररसाचे शोषण नीट होत नाही व आपल्या शरीराला आवश्यक ते सर्व पोषकतत्त्व मिळत नाहीत व आपण खाऊन-पिऊन कुपोषित राहतो. त्यामुळे सहा महिन्यांतून एकदा जर तुमच्या पचनसंस्थेचे सर्व्हिसिंग करून हा अन्‍ननलिकेला आतून, लहान आतड्याला आतून चिटकलेला जो मळाचा थर आहे तो वेळोवेळी काढून टाकला, तर तुमच्या शरीरात रोगजंतूंची पैदासच होत नाही, त्यामुळे कित्येक रोगांपासून तुमचा बचाव होतो व तुम्ही जे खाताय त्यातून जास्तीतजास्त पोषकतत्त्व तुमच्या शरीराला मिळून तुमची रोग प्रतिकारकशक्‍ती वाढून कित्येक रोगांना तुम्ही प्रतिकार करू शकता. त्यासाठी हर्बल उत्पादने वापरून किमान सहा महिन्यांतून एकदा तुमच्या पचनसंस्थेचे सर्व्हिसिंग म्हणजेच शुद्धीकरण म्हणजेच Detoxification  अवश्य करा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news