संप्रेरकांचे असंतुलन आणि ट्यूमर | पुढारी

Published on
Updated on

पिट्युटरी ग्रंथींचे कार्य योग्यप्रकारे न झाल्यास संप्रेरकांचे उत्पादन जास्त किंवा कमी प्रमाणात होते. त्यामुळे मास किंवा गाठ तयार होण्याचा धोका असतो. या गाठीला ट्यूमर म्हणतात. हा कर्करोगविरहित बिनाईन किंवा कर्करोगयुक्‍त मॅलिग्‍नंट असू शकतो. असे ट्यूमर अंतस्रावी तंत्र आणि पिट्युटरी ग्रंथी यांच्या सामान्य कार्यात हस्तक्षेप करून अनेक गंभीर वैद्यकीय समस्या निर्माण करू शकतो. 

अर्थात, ट्यूमर होण्याची शक्यता वयाच्या तिशीनंतर असते; पण कमी वयातील लोकांवरही याचा प्रभाव पडू शकतो. रुग्ण जिवंत राहण्याचा दर हा ट्यूमर गुंतागुंतीच्या स्थानी असण्याव्यतिरिक्‍त, रुग्णाचे वय, ट्यूमरचा आकार आणि प्रकार यासारख्या इतर कारकांवरही अवलंबून असतो. पिट्युटरी ग्रंथी ट्यूमर बहुतांश वेळा कर्करोगविरहित असतात; पण त्याचे नेमके कारण अज्ञात आहे. काही आनुवंशिक असतात; तर काही अगदी दुर्मीळ आनुवंशिक विकारांमुळे होतात. त्याला मल्टिपल इंडोक्राईन नियोप्लासिया टाईप 1 असे म्हटले जाते. ही डिसऑर्डर 3 वेगवेगळ्या अंतस्रावी ग्रंथींशी संबंधित आहे. या ग्रंथींची अतिक्रियाशीलता किंवा ग्रंथी वाढल्यामुळेदेखील होऊ शकते. त्यातीलच एक ग्रंथी म्हणजे पिट्युटरी ग्रंथी. 

अर्थात, ट्यूमरच्या प्राथमिक पायरीवर निदान झाल्यास उपचार करण्यात मदत मिळू शकते. या अवस्थेत ट्यूमरचे निदान झाल्यास सायबरनाईफ या उच्च तंत्रज्ञानाच्या मदतीने रुग्णाला पूर्णपणे नॉन इन्वैसिव्ह पद्धतीने उपचार दिले जातात. त्यासाठी सायबरनाईफ सर्वोच्च रेडिएशन उपचार पद्धती आहे. त्याच्या मदतीने मॅलिग्‍नंट ट्यूमरवरही उपचार केले जातात. ही थेरपी 2 सेंटिमीटरपेक्षा कमी आकाराच्या काही पिट्युटरी ट्यूमरसाठी खूप प्रभावी आहे आणि सुरुवातीच्या टप्प्यात प्राथमिक आणि वैद्यकीय द‍ृष्टीने अक्षम ट्यूमरने पीडित रुग्णाच्या उपचारासाठी खूप शक्‍तिशाली आणि प्रभावी तंत्रज्ञान आहे. हे उपचार खूप सुरक्षित आहे आणि शरीरात सातत्याने होणारा विकार किंवा एखाद्या आजार असलेल्या रुग्णाला हा एक नवा पर्याय देतो. या थेरपीचे वैशिष्ट असे की, सर्जिकल नाईफचा वापर न करता कोणत्याही गुंतागुंतीच्या जागी सहजपणे पोहोचता येते. 

ट्यूमरबरोबर उच्च क्षमतेच्या रेडिएशनबरोबर बीम अत्यंत अचूक आणि सुरक्षित काम करतो. या प्रक्रियेत वेदना होत नाही. तसेच हे उपचार केल्यानंतर रुग्ण लगेचच त्याची दैनंदिन कामे करू शकतो. अर्थात, हे ट्यूमरच्या प्रकारावर अवलंबून असते. 30 मिनिटांपेक्षा अधिक काळ रुग्णाला राहावे लागत नाही. 

शरीरातील हार्मोन्सच्या अंतराच्या आधारे याची विविध लक्षणे दिसतात. सर्वसाधारणपणे डोकेदुखी, द‍ृष्टीची समस्या, थकवा, मनोवस्थेतील बदल, चिडचिड होणे, स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या चक्रातील बदल, नपुंसकता, वंध्यत्व, स्तनांचा अनियमित आकार वाढणे, स्तनांमध्ये दुधाची निर्मिती, कुशिंग सिंड्रोम त्यामुळे वजनही वाढते. उच्च रक्‍तदाब, मधुमेह आणि मानसिक आणि शारीरक इजा, ग्रोथ हार्मोन्समध्ये खूप जास्त वाढ झाल्याने हात-पाय किंवा इतर अवयव मोठे होणे, डोके आणि जबड्याच्या जाडीमध्ये वाढ होणे आदी लक्षणे दिसतात. पिट्युटरी ग्रंथींमध्ये मास्टर ग्लँडच्या नावाने ग्रंथी ओळखल्या जातात. या ग्रंथीचे महत्त्वाचे काम असते ते हार्मोन्स किंवा संप्रेरकाचे उत्पादन करणे. थायरॉईड अँड्रेनल ग्रंथी शरीरातील अन्य महत्त्वाच्या अवयवांचे नियंत्रण करतात. ही एक मटारच्या दाण्याएवढीच ग्रंथी असते. जी डोळ्यांच्या मागे आणि मेंदूच्या खालच्या बाजूला असते. काही ट्यूमर हार्मोन्स उत्पन्‍न करतात. त्याला फंक्शनल ट्यूमर म्हणतात. अन्य ट्यूमर ग्रंथीद्वारे खूप कमी किंवा खूप जास्त हार्मोन्सचे स्राव निर्माण होण्यास कारण ठरतात. त्याशिवाय हा ट्यूमर जवळच्या संरचनांवरही दबाव टाकतो. उदाहरणार्थ, डोळ्याच्या किंवा ऑप्टिक स्नायूंवर दबाव पडल्याने व्यक्‍तीची नजर कमी होते. त्याशिवाय ही प्रक्रिया ट्यूमरच्या स्थानी थेट रेडिएशनचा हाय डोस देण्यासाठी सर्वोत्तम इमेज गायडन्स तंत्रज्ञानाचा उपयोग करते. त्यामुळे इतर उपचारांमध्ये निरोगी पेशींचे नुकसान होण्याचा जो धोका असतो तो या उपचारांमध्ये संभवत नाही. 

उपचारासाठी एकावेळी 30 ते 50 मिनिटे लागतात. तसेच ही उपचार पद्धती स्वस्तदेखील आहे. अशाप्रकारच्या गुंतागुंतीच्या ट्यूमरवरील उपचारांत या प्रक्रियेचे यश 98 टक्के आहे. पिट्युटरी एडेनोमास विकाराने ग्रस्त असणार्‍या रुग्णाला सायबरनाईफ उपचारांबरोबर स्टीरियोटॅक्टिक रेडिओ सर्जरीदेखील केली जाते. त्यावर 12 महिन्यांपेक्षा अधिक काळ लक्षही दिले जाते. उपचाराच्या 2-3 आठवड्यांनंतर रुग्णाच्या सकारात्मक प्रतिक्रिया पाहिल्या जातात आणि कोणताही ट्यूमर पुन्हा होत नाही ना याकडे लक्ष दिले जाते. सायबरनाईफ बरोबर स्टीरिओटॅक्टिक रेडिओ सर्जरी पिट्युटरी एडेनोमासाठी प्रभावी आणि सुरक्षित उपाय आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news