डिप्रेशनकरिता होमिओपॅथी | पुढारी

Published on
Updated on

डॉ. वर्षा पाटील

मराठी भाषेत डिप्रेशन म्हणजे 'नैराश्य', 'उदासीनता'. होमिओपॅथी जे जनक डॉ.सॅम्युअल हनेमान यांनी कित्येक वर्षांपूर्वीच लिहून ठेवलंय, की अधिकांश आजारांचे मूळ हे आधी मानसिक असते आणि त्यानंतर शारीरिक आजार होतात. म्हणूनच केंटसारख्या अभ्यासकानेही उपचार करताना मानसिकतेला अधिक महत्त्व दिले आहे.

डिप्रेशन मागे नक्कीच काहीतरी कारण असते. माणूस कितीही स्ट्राँग असला, तरी प्रत्येकाच्या मनाचा एक चोरकप्पा असतो, ज्यावर आक्रमण झालेले नाही पचत त्याला! कारण, त्याने तो मनस्वी जपलेला असतो. मग, ती असेल स्वतःची ळारसश, तत्त्व, चारित्र्य, प्रामाणिकपणा, आणखी काहीही. ज्यावर त्याला स्वतःचा अभिमान आहे. असं आक्रमण घडलं, तर काही लोक थोडा र्रिीीश घेतात, 2 पावलं मागे येतात. वेळ बदलण्याची वाट पाहतात; पण काहींना नाही जमत हे, ते हतबल होतात आणि नैराश्यातून चुकीचा मार्ग निवडतात. डॉक्टर म्हणून पेशंटकडून ऐकलेले आणि एक व्यक्ती म्हणूनही स्वतः हे अनुभवलेलं असतं. काही डिप्रेशनमधील पेशंटची  उदाहरणे द्यायची, तर जिने स्वतःच चारित्र्य उत्तम जपलं, त्यावरच कुणा आपल्याचे अपमानाचे शिंतोडे, कुणा एकाच्या एका पैशाची कधी हव्यास नि मिंदा नसणार्‍या व्यक्तीवर चोरीचा आळ, एखाद्या विश्वासू व्यक्तीने दिलेला कोणत्याही स्वरूपातील धोका, खूप राबूनही आलेलं अपयश, प्रामाणिक प्रयत्नानंतरही लागलेली नाकर्तेपणाची रांग, खूप खूप प्रकार पण शेवट एकच डिप्रेशन आणि न्यूनगंड. अशावेळी बरेच सल्लागार म्हणतात, की आपल्या माणसाजवळ व्हावं मोकळं. धाय मोकलून रडावं, व्यक्त व्हावं आणि सोबतच्या व्यक्तीने जाणावं की अशावेळी गरज असते फक्त एका विश्वासाच्या थापेची, प्रेमळ, आश्वासक शब्द स्तंभांची.'

मी आहे सोबत तुझ्या, माझा आहे तुझ्यावर विश्वास, यू कॅन अँड यू विल… बस्स; पण ते त्या एक्झॅक्ट वेळेला. अनुभवातून डिप्रेशन येण्याअगोदर किंवा त्यातून बाहेर पडण्यासाठी काही करावयाच्या गोष्टी.

1. मागितल्याशिवाय खूप काही देत गेलात समोरच्या व्यक्तीला, तर त्याची किंमत कधीच लक्षात येत नाही त्याला. उलट तुम्हाला गृहीत धरलं जातं.   

2. आयुष्यात असे काही धक्के बसायला लागतात, तरच आपलं माणूस कोण समजतं. हेच अनुभव आपले भलेभले गैरसमज दूर करतात.      

3. तुम्ही जर एखाद्याच्या नजरेत वाईट असाल, तर त्यांच्या नजरेत स्वतःला चांगलं सिद्ध करण्यात वेळ आणि श्रम वाया घालवू नका किंवा तसा प्रयत्न करण्याच्या जास्त नादी लागू नका.      

4. प्रत्येक ठिकाणी जबाबदारी झेलण्याचा, सगळं काही छान घडवून आणण्याचा मक्ता घेऊ नका. काही गोष्टी ज्याच्या त्याच्या कर्तेपणावर, प्रारब्धावर सोडून द्या.      

5. जिथं आपली गरज नाही तिथे थांबू नका आणि जिथे गरज आहे तिथे पोहोचायला उशीर करू नका.     

6. प्रत्येक माणसाच्या गरजा या सवडीने आणि नडीने बदलतात.      

7. आपली जगण्याची तत्त्व जपावीत. कुणा भावनाशून्य लोकांसाठी त्यांना मुरड घालू नये. नाही तर बघता बघता स्वतःचेच अस्तित्व आपण हरवून जातो.      8. आपण ज्या मानसिकतेतून गेलो, तसं कुणी आसपासही दिसलं, तर त्याला वेळीच किमान धीर द्या. कारण, त्यावेळेचे मिळालेले आशीर्वाद हे खूप किमती असतात.     

9. झालेल्या घडामोडीत स्वतःची चूक असेल, तर ती स्वीकारून पुढे जावं. माणूस आहे, चूक होऊ शकते; पण ती चूक परत होणार नाही हा चंग मात्र मनाशी बांधावा आणि जर चूक नसेल, तर ते सिद्ध करत बसू नये. काळ हे सर्वावर उत्तम औषध आणि पडलेल्या प्रश्नांचं उत्तर आहे.      

10. आपलं खर्चित आयुष्य, क्षण ज्यांच्यामुळे अस्तित्वहीन ठरले त्यांना 'मनापासून माफ करा', हे म्हणणं सोपं आहे. पुस्तकात वाचायला छान आहे; पण थोडं अवघड नि अशक्यच आहे; पण स्वतःला परत नव्यानं उभारी द्यायची असेल, तर त्या गोष्टींना जाणीवपूर्वक बाजूला सारावं लागेल. जसं आपल्याला नको असलेले इमेल्स 'ीींरीह'ला टाकतो आपण तसं. कारण, नको असलेलं जुनं वशश्रशींश मारल्याशिवाय, नवीन गोष्टींसाठी आयुष्यात ीरिलश नाही बनणार.       

11. ज्या लोकांना तुमची किंमत कधी कळलीच नाही, त्यांच्यासाठी स्वतःच मौल्यवान जीवन संपण्याचा विचारही कधी करू नका, नाही तर त्या नगण्य परिस्थितीला, व्यक्तींना, मतांना तुम्ही स्वतःच्या जीवापेक्षा विनाकारण किमती ठरवताय.       

12. आपण सर्वांना एक संधी देतो, तशी स्वतःलाही द्यायची, पुन्हा नव्याने स्टार्टर मारायची.      

13. आणि सर्वात महत्त्वाचं, उठून उभारायची ताकद कुणी देईलही; पण पुढे पाऊल हे आपलं आपल्यालाच टाकावं लागतं. आपलं मन स्वतःच घट्ट करावं लागतं. आलेल्या अनुभवावरून आपल्या जगण्याचे नियम, अटी स्वतःच बदलाव्या लागतात. त्यात भागीदार कोणी नसतं.      

14. शेवटचं, ज्या गोष्टीमुळे आपल्या स्वतःला त्रास झाला, तसा त्रास आपल्यामुळे कोणाला होणार नाही, याची काळजी सदैव घ्यायची.

मग, आता प्रश्न पडेल की डिप्रेशनवर उपचार आहेत का? तर, हो नक्कीच! केवळ झोपेच्या गोळ्या म्हणजे डिप्रेशनवरील उपचार नव्हेत. 

आता थोडं वैद्यकीय शास्त्रानुसार, मराठी भाषेत डिप्रेशन म्हणजे 'नैराश्य', 'उदासीनता'. होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हनेमान यांनी कित्येक वर्षांपूर्वीच लिहून ठेवलंय, की अधिकांश आजाराचे मूळ हे आधी मानसिक असते आणि त्यानंतर शारीरिक आजार होतात. म्हणूनच केंट सारख्या अभ्यासकानेही उपचार करताना मानसिकतेला अधिक महत्त्व दिले आहे. इतर पॅथिनीही आज याचे समर्थन केले आहे, की सत्तर टक्के आजार हे सायकोसोमाटिक आहेत. त्यातील साधारण 15 ते 20 टक्के लोक हे आज डिप्रेशनचे शिकार आहेत आणि लॉकडाऊनच्या काळात हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे.

केवळ झोपेच्या गोळ्या म्हणजे याचे उपचार नव्हेत, तर होमिओपॅथीमध्ये पूर्ण व्यक्तिमत्त्वाच्या विचारांती आजाराच्या मुळाशी घातलेला औषधी घाव खूप प्रभावी ठरतो. ऑरम मेट, अर्गेंटम निट्रिकम, नायट्रम मूर, सेपीआ, नक्स ओमिका, अल्युमिना, स्रमोनियम , कॅनबीस इंडिका, हेलाबोरस अशी कित्येक होमोईओपॅथिक औषधे कोणत्याही साईड इफेक्टशिवाय डिप्रेशनवर अत्यंत प्रभावी ठरतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news