उच्च रक्तदाब आणि हृदयाची कार्यक्षमता

डॉ. बिपीनचंद्र भामरे 

हृदय हा एक स्नायूंनी बनलेला पोकळ अवयव आहे. त्याच्या तालबद्ध हालचालीमुळे (आकुंचन पावणे (सिस्टोल) आणि प्रसरण पावणे (डायस्टोल) रक्त शरीरभर फिरत असते. शरीरात रक्त वाहताना रक्तवाहिन्यांवर जो दाब पडतो किंबहुना ज्या दाबाने रक्त सर्व शरीरातील रक्तवाहिन्यांतून फिरत असते त्या दाबाला 'रक्तदाब' असे म्हणतात.

सर्व अवयवांना त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे रक्तपुरवठा मिळण्यासाठी हा विशिष्ट प्रकारचा दाब आवश्यक असतो. उच्च रक्तदाब अर्थात हाय-ब्लड-प्रेशर किंवा यालाच वैद्यकीय भाषेत आपण हाय-पर-टेन्शन असेदेखील म्हणतो. उच्च-रक्त-दाब म्हणजेच शरीरातील रक्तवाहिन्यांमधून जेव्हा रक्त वहन करत असते तेव्हा रक्तवहनाचा प्रचंड दाब रक्तवाहिन्यांवर पडत असतो. जेव्हा हृदय आरामदायी पूर्वस्थितीत येते तेव्हा रक्तवहिन्यांच्या अंतर-स्तरावरील दाब कमी होतो त्याला डायास्टोलिक रक्तदाब असे म्हणतात.

 उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीच्या हृदयाला काम करण्यास खूप कष्ट करावे लागतात. त्यामुळे हृदय मोठे आणि जाड होऊ शकते. त्याची कार्यक्षमता कमी कमी होत जाते. त्यामुळे हृदयाचे पंपिंग कमी होते. याला 'हार्ट फेल्युअर' असे म्हणतात. उच्च रक्तदाबाची ही आहेत लक्षणे अतिरक्तदाब हा मनुष्याचा 'छुपा शत्रू' आहे, असे म्हटले जाते. कारण बर्‍याचदा मनुष्याला उच्च रक्तदाब असूनही काहीही लक्षणे किंवा त्रास दिसून येत नाही. उच्च रक्तदाबाची लक्षणे खालीलप्रमाणे असू शकतात.

सतत डोके दुखणे, जड वाटणे.

चक्कर येणे, आसपासच्या वस्तू हलत असल्याचा भास होणे, कामात लक्ष केंद्रित न होणे, एकाग्रता न होणे, विसर पडणे, थकवा जाणवणे, चिडचिड करणे.

छातीत धडधड होणे, छातीत दुखणे. 

लैंगिक सामर्थ्य कमी होणे.

अशाप्रकारे तुम्ही उच्च रक्तदाबाला रोखू शकता

संतुलित आहाराचे सेवन करा : साखर, मीठ आणि मेद व कोलेस्ट्रॉलयुक्त पदार्थ खाणे टाळा. ताजी फळे, लो फॅटस् डेअरी प्रॉडक्टस्, धान्य आणि हिरव्या पालेभाज्या खा. मद्य आणि धूम्रपानाचे सेवन करू नका.

दररोज व्यायाम करा : असे केल्याने रक्ताभिसरण सुरळीतपणे होते आणि हृदयाच्या स्नायूवरील ताण कमी होतो. तसेच वजन वाढीवर नियंत्रण मिळविता येते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news