पाठ सुंदर दिसण्यासाठी या आहेत खास टिप्स!

Published on
Updated on

डॉ. रिंकी कपूर

बॅकलेस चोळ्या परिधान करण्याचा आणि उजळ पाठीचे दर्शन घडविण्याचा उत्सव आता उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. हा पारंपरिक पेहेराव करण्याची तुमची इच्छा असेल तर तुमची इच्छापूर्ती होऊन जाऊ दे. 

तुमचा चेहरा असो वा पाठ, दोन्ही सुंदर दिसण्यासाठीच्या काही टिप्स

बॅक फेशिअल : तुम्हाला नैसर्गिकरित्या चांगली त्वचा लाभली असेल आणि तुमच्या पाठीवर कोणतेही डाग किंवा इतर काही समस्या नसतील तर तुम्ही पारंपरिक फेशियल करून घ्यावा जेणेकरून तुमची त्वचा उजळ होईल, तुमचे स्नायू शिथिल होतील आणि तुम्हाला एकदम तजेलदार वाटेल

बॅक पॉलिशिंग : वेळ खूप कमी आहे का? काळजी करू नका तुम्हाला आज किंवा उद्या एखाद्या खास कार्यक्रमाला जायचे असेल तर तुमची पाठ पॉलीश करून घेणे हा जलद मार्ग आहे. यासाठी वापरले जाणारे उपकरण पाठ घासून देते आणि त्वचेचे वरचे काही मृत स्तर आणि निस्तेज स्तर एक्सफोलिएट करते, जेणेकरून खालची स्वच्छ त्वचा दिसू शकेल.

पार्टी पील्स : तुमच्या पाठीवर सौम्य स्वरूपाचे असमतल डाग असतील किंवा अ‍ॅक्नेनंतर आलेले डाग राहिले असतील किंवा फेशिअलपेक्षा तुम्ही अधिक काही हवे असेल तर तुम्ही जलद केमिकल पीलचा पर्याय निवडू शकता. ही साधी वैद्यकीय द्रावणे असतात. ही द्रावणे दवाखान्यातच लावण्यात येतात. या प्रक्रियेला 10-15 मिनिटांचा वेळ लागतो. त्यानंतर मायक्रोस्कोपिकली ती त्वचा एक्सफोलिएट करण्यात येते, जेणेकरून मृत त्वचा निघून जाईल आणि त्याखालील ताजीतवानी त्वचा दिसून येईल.

पपई पील, लॅक्टिक पील यासारख्यांना पार्टी पील्स असे म्हटले जाते. कारण ते त्वचेला तत्काळ उजळपणा देतात. असे असले तरी दीर्घकालीन परिणाम साध्य करण्यासाठी एका महिन्याच्या कालावधीत 3-4 सत्रे करून घ्यावीत. तुमची त्वचा उजळ करण्याचा हा सर्वात जलद मार्ग आहे.

केमिकल पील्स : हेसुद्धा 'पार्टी पील' उपायांसारखेच असतात. फरक एवढाच की, या प्रक्रियेत रासायनिक द्रावणांचा उपयोग करण्यात येतो. त्यामुळे 2 ते 3 दिवस त्वचा लालसर होऊ शकते आणि 4 ते 5 दिवसांनंतर त्वचेला उजळपणा येतो. या प्रक्रियेला बर्‍यापैकी दिवस लागत असल्यामुळे कार्यक्रमाच्या काही दिवस आधी हा उपाय करावा.

स्विच लेझर : त्वेचेचा पोत आणि निस्तेजपणा घालविण्यासाठी ज्या व्यक्ती खिसा जरा जास्त हलका करण्यास तयार आहेत, त्यांच्यासाठी हा उपाय आहे. याला लेझर टोनिंग असेही म्हणतात. कार्यक्रमाच्या एक किंवा दोन दिवस आधीसुद्धा हा उपाय करता येतो. काळपट भागातील पिगमेंट्सवर लेझर बीमचा उपयोग करण्यात येतो आणि त्वचेला उजळपणा प्राप्त होतो. हा परिणाम काही दिवस टिकून राहतो. याचे काहीही साइड इफेक्ट्स नसतात.

काही घरगुती उपाय : साय, मध आणि हळद यांचे मिश्रण करून ते पाठीला लावा. तुमची पाठ उजळ होईल. कॉफी पावडर आणि मध यांचे मिश्रण तयार करून ते लावा. थोडा वेळ थांबा आणि धवून टाका.  लिंबू आणि साखर यांचे मिश्रण तयार करून ते त्वचेवर लावा आणि काही मिनिटांनी ते घासून काढून टाका. मृत आणि निस्तेज त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठीही याचा उपयोग होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news