Heart Attack and Bypass Surgery | हृदयविकाराचा धोका आणि बायपास शस्त्रक्रिया

Heart Attack and Bypass Surgery |
Heart Attack and Bypass Surgery | हृदयविकाराचा धोका आणि बायपास शस्त्रक्रिया
Published on
Updated on

डॉ. बिपीनचंद्र भामरे

भारतामध्ये हृदयविकारांनी पीडित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना हृदयविकारांबाबत असलेल्या गैरसमजुतींमुळे अनेक जण वेळीच उपचार घेत नाहीत. डॉक्टरांनी सल्ला देऊनही काही रुग्ण बायपास शस्त्रक्रिया करणे टाळतात. ही शस्त्रक्रिया आवश्यकता असल्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ती शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे.

हृदयविकार हा भारतातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. बैठी जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या सवयी, ताणतणाव, लठ्ठपणा , मधुमेह, उच्च रक्तदाब आणि अनुवंशिकत्वामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. कोरोनरी आर्टरी डिसीज (धमन्यांमध्ये अडथळा), हृदयविकाराचा झटका, हृदय निकामी होणे आणि एरिथमिया (अनियमित हृदयाची गती) हे सर्वसामान्यपणे दिसणारे आजार आहेत. यामध्ये छातीत दुखणे किंवा अस्वस्थता जाणवणे, दम लागणे, थकवा येणे, हात, मान, जबडा किंवा पाठीत वेदना होणे, घाम येणे, मळमळणे आणि चक्कर येणे अशी लक्षणे दिसू शकतात.

अनेक लोक छातीत दुखणे किंवा दम लागणे या सुरुवातीच्या लक्षांकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे उपचारास विलंब होतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा हृदय निकामी होण्यासारख्या गंभीर गुंतागुंती उद्भवतात. अनेकांना बायपास शस्त्रक्रियेची भीती वाटते.

बायपास शस्त्रक्रिया का करावी?

बायपास शस्त्रक्रिया, ज्याला कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग असेही म्हणतात, ही जीव वाचवणारी प्रक्रिया आहे. यामध्ये बंद झालेल्या धमन्यांना वळसा घालून हृदयापर्यंत रक्तपुरवठा पुन्हा सुरळीत केला जातो. गंभीर अडथळे असल्यास कार्डिएक सर्जन ही शस्त्रक्रिया सुचवतात आणि ती वारंवार होणारे हार्ट अटॅक टाळण्यास मदत करते.

आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित आणि प्रभावी ठरत आहे. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि रुग्ण पुन्हा सहजपणे दैनंदिन जीवन जगू शकतो. योग्य काळजी, नियमित तपासणी आणि सक्रिय जीवनशैली राखल्यास रुग्ण 15 ते 20 वर्षे अधिक निरोगी आयुष्य जगू शकतो.

कोरोनरी आर्टरी डिसीज असलेल्या आणि औषधोपचार किंवा स्टेंटिंगनंतरही आराम न मिळणार्‍या रुग्णांना बायपास शस्त्रक्रिया सुचवली जाते. तसेच, मधुमेह असलेल्या आणि वारंवार हृदयाशी संबंधित त्रास जाणवणार्‍या रुग्णांसाठीही ही शस्त्रक्रिया उपयुक्त ठरते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news