

तुम्ही वजन कमी करण्याचा खूप प्रयत्न करत आहात; पण मनासारखे परिणाम मिळत नाहीत? याचे कारण बाजारातील पॅकेटबंद पदार्थांमध्ये लपलेले असू शकते. ‘आरोग्यदायी’ किंवा ‘हेल्दी’ समजले जाणारे अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ टाळल्यास, तुमचे वजन आणि शरीरातील चरबी दुप्पट वेगाने कमी होऊ शकते! अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ टाळल्यास वजन घटवण्याचा वेग दुप्पट होतो. ‘होलग्रेन यिल’, ‘प्रोटिन बार’सारखे पदार्थही वजन कमी करण्यात अडथळा आणतात.
व्यसनाधीन : हे पदार्थ केवळ पौष्टिकद़ृष्ट्या निकृष्ट नसतात, तर ते जैविक आणि वर्तणुकीशी संबंधित व्यसन लावू शकतात. यामुळे तुम्हाला भूकेवर नियंत्रण ठेवणे कठीण होते.
पोषकतत्त्वांची कमतरता : प्रक्रियेदरम्यान यातील नैसर्गिक पोषकतत्त्वे नष्ट होतात आणि कृत्रिम घटक टाकले जातात.
हे असे पदार्थ आहेत, ज्यांवर खूप जास्त प्रक्रिया केलेली असते आणि त्यात साखर, मीठ व चरबी यांचे प्रमाण प्रचंड असते.
उदाहरणे : इन्स्टंट नूडल्स, बिस्किटे, चिप्स, पॅकेटबंद स्नॅक्स, प्रक्रिया केलेले मांस, आणि गोड पेये.
* पॅकेटवरील ‘हेल्दी’, ‘डायट’, ‘लो-फॅट’ यांसारख्या शब्दांना भुलू नका.
* शक्यतोवर नैसर्गिक आणि कमीत कमी प्रक्रिया केलेले पदार्थ (उदा. फळे, भाज्या, धान्य, डाळी) निवडा.
* तुमचे आरोग्य तुमच्या हातात आहे. पॅकेट उघडण्यापूर्वी विचार करा!
* भारतात अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थांचा वापर 53 पटीने वाढला आहे.
* याच काळात देशातील लठ्ठपणाचे प्रमाण जवळपास दुप्पट झाले आहे. हा निव्वळ योगायोग नाही!