

आपण काय खातो आणि कसे खातो, याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. काही अन्नपदार्थ असे असतात की जे भिजवून खाल्ल्यास त्यांचे पोषणमूल्य वाढते आणि शरीराला ते अधिक चांगलेरीत्या लाभतात. तसेच अशा अन्नपदार्थांचे पचन सुलभ होते आणि पोषक घटकांचे शोषण शरीरात योग्य प्रकारे होते. आज आपण अशाच काही अन्नपदार्थांची माहिती घेणार आहोत, जे नेहमी भिजवूनच खाल्ले पाहिजेत
बदाम, अक्रोड, चिया सीड्स, अलसी या बीया आणि सुकामेव्यांमध्ये फायटिक अॅसिड असते, जे आयर्न, झिंक, कॅल्शियम यांसारख्या खनिजांच्या शोषणात अडथळा निर्माण करते. हे अन्नपदार्थ पाण्यात भिजवल्याने फायटिक अॅसिडचे प्रमाण कमी होते आणि शरीराला अधिक पोषण मिळते.
ब्रोकली, पत्ता गोभी, फ्लॉवर अशा काही भाज्यांमध्ये असे संयुगे असतात जी आयोडीनचे शोषण रोखतात, त्यामुळे थायरॉईडसंबंधी समस्या उद्भवू शकतात. या भाज्या भिजविल्यास त्यातील ही घातक संयुगे निष्क्रिय होतात आणि त्यांची कडवट चवही कमी होते.
डाळी, चणे, राजमा, मूग यांसारख्या कडधान्यांमध्ये प्रथिने, फायबर आणि अनेक पोषक घटक असतात. मात्र त्यात लेक्टिन व फायटिक अॅसिड देखील असते, जे पचनतंत्रासाठी घातक असू शकते. या अन्नपदार्थांना भिजवल्याने त्यांचे पचन चांगले होते आणि पोषक घटकांचे शोषण प्रभावीपणे होते.
ओट्स हा एक लोकप्रिय आरोग्यदायी पदार्थ मानला जातो, पण तो भिजवून खाल्ल्यास अधिक फायदेशीर ठरतो. ओट्समधील फायटिक अॅसिड भिजवल्यामुळे कमी होते आणि पचन अधिक सुलभ होते.
धान्यांमध्येही फायटिक अॅसिड आणि काही एंझाइम्स असतात जे शरीरात पोषक घटकांचे शोषण अडवतात. यामुळे पचन क्रिया मंदावते. धान्य भिजवून वापरल्यास पचनक्रिया सुधारते आणि शरीराला आवश्यक पोषण सहज मिळते.