पुढारी डेस्क
भारतीय महिलांची ओळख त्यांची साडी आणि त्यांनी घातलेल्या अनेक अलंकाराने होते. त्यात बांगड्या तसेच कपाळावर लावलेल्या कुंकवाने होते. हे कुंकू भुवयांचा मध्ये लावतात. मात्र, हल्ली कुंकू लावण्याची परंपरा लोप पावत चालली आहे. कुंकवा एवेजी टिकली लावतात. टिकली कपाळाला चिटकून बसते. हिंदू परंपरेमध्ये कुंकू आणि टिकलीला सौभाग्याचे लक्षण मानले जाते. मात्र, हे कुंकू केवळ सौभाग्याचे लेणं नसून आरोग्यासाठी देखील तितेकेच फायद्याचे आहे.
कुंकवाने ताण दूर होताे
कुंकवात मरकरी अर्थात पारा असतो. कुंकवामध्ये पाण्यासारखा धातू अधिक प्रमाणात असल्याने कुंकू लावल्याने ताण दूर होतो आणि डोकं शांत राहतं. लग्नानंतर कुंकू लावण्यामागील कारण आहे की याने रक्ताभिसरण सुधारण्यासह यौन क्षमतादेखील वाढते.
सौंदर्य वाढतं
कुंकू लावल्याने महिलांचा सौंदर्यामध्ये अजून भर पडते. अर्थातच महिलांचे सौंदर्य खुलून उठते. कुंकू लावण्याने चेहर्यावर वेळेपूर्वी सुरकुत्या पडत नाही. तसेच कुंकू महिलांच्या शरीरात विद्युत ऊर्जा नियंत्रित करते. कुंकू लावताना आपल्या भांगाच्या आज्ञाचक्रावर दाब दिला जातो त्यामुळे तेथील बिंदू दाबले जाऊन चेहर्याच्या स्नायूंना चांगला रक्तपुरवठा होतो.
एकाग्रता वाढते
योग विज्ञानाच्या दृष्टीने कुंकवाचा संबंध थेट आपल्या मनाशी जोडला गेलेला आहे. आज्ञाचक्र महिलांच्या मनाला नियंत्रित करत असते. जेव्हा आज्ञा चक्रावर दबाव पडतो तेव्हा मन एकाग्र केले जाते. आज्ञाचक्रावर स्त्रिया कुंकू लावतात त्यामुळे त्यांचे मन एकाग्र राहण्यास मदत होते.
अॅक्यूप्रेशर पद्धतीतील महत्व
अॅक्यूप्रेशर या उपचार पद्धतीतही या भुवयाचा मधल्या भागाचे महत्व आधारेखित केले आहे. अॅक्युप्रेशरमध्ये या भागाला थर्ड आय असे म्हटले जाते. या भागावर रोज प्रेशर दिल्यास अनेक फायदे आपल्या शरीराला होतात. त्यामुळे कुंकू किंवा टिकली दररोज लावली पाहिजे. टिकली लावताना त्या भागावर थोडा दाब देऊन लावावी. त्याचे आरोग्यदायी फायदे नक्कीच आपल्या शरीराला होतील.