हॅप्पी दिवाळी | पुढारी

Published on
Updated on

डॉ. शक्ती पातकर

दिवाळी जवळ आली की, वेटलॉसच्या सगळ्या पेशंटचे वेगवेगळे प्रश्न सुरू होतात. मॅडम थोडासा फराळ खाल्ला तर चालेल? एका करंजीमध्ये/एका लाडूमध्ये किती कॅलरीज असतात? थोडासा फराळ खाऊन जास्त व्यायाम केला तर चालेल? फराळ खायचाच असेल तर नेहमीच्या जेवणातलं काय कमी करू? सकाळी खाऊ की दुपारी खाऊ? गोड पदार्थात तिखटपेक्षा जास्त कॅलरीज असतात का? चकली आणि लाडूमधून प्रोटिन मिळतं का? विकतचा फराळ खात नाही; पण घरी केलेला तरी थोडा फराळ खाऊ का?

मला हसू आवरत नाही; पण थोडी दयासद्धा येते. वर्षातून एकदाच येणारा हा सण, ज्याची वर्षभर आपण वाट बघतो. करोडोंची उलाढाल होते. या सणादरम्यान,  प्रश्नात अडकलेले असतात. 'मी फराळ खाऊ का नको?'

पण थोडंस खोलात शिरलं की समजतं, की हा फराळ फटाके, कंदील, रांगोळी, आणि नवीन कपडे यापलीकडे असं काहीतरी असतं या दिवाळीमध्ये, की ज्याच्यासाठी या दिवाळीची वाट पाहावी एकदा दिवाळी संपली की, मग पुन्हा ती वर्षानंतरच येणार असते. 

एक आजी-आजोबा येतात माझ्याकडे, ज्यांचा मुलगा सून आणि नातवंडे फॉरेनहून दरवर्षी दिवाळीला येतात. मुलाचा तसा फोन आला की, दोन महिने आधीपासूनच आजीची दिवाळीची लगबग सुरू होते. या वर्षी तो मुलगा दिवाळी संपल्यावर दोन दिवसांनी पोहोचणार आहे. त्यामुळे आजी-आजोबांची खरी दिवाळी संगळ्यांनी दिवाळी संपल्यावरच सुरू होणार आहे. 

एका पेशंटच्या सासूबाई 3-4 महिन्यांपूर्वीच वारल्या आहेत. त्यामुळे यंदा त्यांच्याकडे दिवाळी नाही. एका मुलीचे वडील हल्लीच वारले आहेत. त्यामुळे तिची मनस्थिती नसतानासुद्धा रित म्हणून सगळा फराळ करून मनःस्थिती नसतानासुद्धा रित म्हणून सगळा फराळ करून दिवाळीच्या आधीच माहेरी पोहोचवायचा आहे.

नोकरी करणारे लोक दिवाळीचा बोनस मिळणार म्हणून खूश आहेत. माझे शाळेत जाणार्‍या वयाचे पेशंटस् फटाके उडवायला मिळणार आणि शाळेला सुट्टी आहे. म्हणून खूश आहेत, तर मेडिकल आणि इंजिनिअरिंगला असलेले पेशंटस् नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये परीक्षा असल्यामुळे दिवाळीलासुद्धा अभ्यास करावा लागणार म्हणून दुःखी आहेत. 

एका मुस्लिम पेशंटनेही मला विचारलं, मॅडम मी बे्रकफास्टला थोडासा चिवडा किंवा चकली खाल्ली तर चालेल, मी म्हटलं, "तुमच्याकडे शेजार्‍यांकडून फराळ येतो का? " तर तिने सांगितलं, "नाही मॅडम, आम्ही  स्वतः दिवाळीला सगळा फराळ विकत आणतो, कंदील लावतो, रांगोळीपण काढतो" मला तर त्यांचं खूप कौतुक वाटलं. 

एका ख्रिश्चन फॅमिलीमधल्या एका भावाचं  कपड्यांचं दुकान आहे, तर एकाची टॅ्रव्हल्स एजन्सी आहे. त्यांनी सांगितलं की, आम्ही जिथे राहतो, तिथे सगळे हिंदूच राहतात. आणि आमची मुलं लहान आहेत. त्यांना काय समजणार हिंदू आणि ख्रिश्चन? म्हूणन आम्ही दिवाळी आणि ख्रिसमस दोन्ही साजरं करतो. दिवाळीला लावलेले कंदील आणि लायटिंग ख्रिसमस दोन्ही साजरं करतो. दिवाळीला लावलेले कंदील आणि लायटिंग ख्रिसमस नंतरच काढतो! 

पण या सर्वांत काही असे पेशंटस्ही आहेत, की जे आपल्या डाएटिंगवर ठाम आहेत. "मी या दिवाळीला फराळ खाणार नाही म्हणजे नाही. माझं वजन छानपैकी उतरायला लागलं आहे, त्यात आता पुन्हा कसलाही अडथळा नको" असं त्यांनी सांगितलं त्यांचं किती कौतुक करू आणि किती नको असं मला झालं. 

सगळ्या पेशंटस्चा विचार करते तेव्हा जाणवतं की, दिवाळीचं स्थान, महत्त्व प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळं आहे. वरवर दिसतं, तस सगळं छान छान असत नाही. कोणाकडे तूपात फराळ बनतो, तर कुणाकडे तेलाची पणतीही जळत नाही. प्रत्येकाची दिवाळी वेगळी. आयुष्याचंही तसंच आहे ना!  प्रत्येकाचं स्वतःचं, स्वतंत्र असं जग आहे! दुनिया तो एक ही है। फिरभी सबकी कितनी अलग है!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news