Hair Health Diet| केसांच्या समस्या आणि अंतर्गत पोषण

Hair Health Diet|
Hair Health Diet| केसांच्या समस्या आणि अंतर्गत पोषण
Published on
Updated on

ऋजुता दिवेकर

बहुतांश लोक केसांच्या बाह्य उपचारांवर भर देतात, मात्र अंतर्गत पोषण हेच केसांच्या वाढीसाठी आणि मजबुतीसाठी पाया ठरते, असे सेलीब्रेटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांचे मत आहे.

ऋजुता दिवेकर यांनी केसांच्या वाढीसाठी सूचवलेले मुख्य आहार घटक खालीलप्रमाणे आहेत :

भाताचा आहारात समावेश

अनेकदा वजन वाढण्याच्या भीतीने लोक भात खाणे टाळतात. मात्र, ऋजुता यांच्या मते दिवसातून किमान एकदा भात खाणे आवश्यक आहे. भातामुळे वजन वाढत नाही, उलट तो शरीराच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत पोषक ठरतो.

हंगामी फळे

आवळा, पेरू, आंबा यांसारखी हंगामी फळे केसांच्या मुळांना नैसर्गिकरीत्या पोषण देतात. या फळांमध्ये असलेल्या ‘क’ जीवनसत्वामुळे लोह शोषले जाण्यास मदत होते, परिणामी रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी सुधारते. हिमोग्लोबिनची पातळी योग्य असल्यास केसांचा रंग, घनता आणि मजबुती टिकून राहते.

कडधान्ये आणि डाळी

मूग, तुरीची डाळ, चवळी यांसारख्या कडधान्यांमध्ये अमिनो अ‍ॅसिडस्, ‘ब’ जीवनसत्व आणि तंतुमय पदार्थांचे (फायबर) प्रमाण भरपूर असते. हे घटक केसांना आतून ताकद देतात आणि केस गळती रोखण्यास मदत करतात.

अळीवाच्या बियांचे महत्त्व

केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी अळीव बिया अत्यंत गुणकारी आहेत. या बियांपासून लोह आणि फॉलिक अ‍ॅसिड मिळते. मात्र, या बिया सकाळी रिकाम्या पोटी पाण्यासोबत न घेता, त्याचे लाडू किंवा खीर करून खाण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

केसांची निगा आणि तेल मालिश

केवळ आहारच नाही, तर बाह्य निगा राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आठवड्यातून किमान एकदा 30 मिनिटे केसांना तेल लावून मालिश करावी. तसेच दररोज केस विंचरणे आणि रासायनिक प्रक्रिया टाळणे केसांच्या आरोग्यासाठी हिताचे ठरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news