संधीवात व होमिओपॅथी | पुढारी

Published on
Updated on

डॉ. सौ. सपना गांधी

संधीवातातील अनेक प्रकारातील एक प्रकार आहे र्‍हुमॅटॉईड आर्थ्रायटीस (Rheumatoid Arthritis) तर या र्‍हुमॅटॉईड आथ्रॉयटीसचा पूर्ण निदान झालेले 43 वय वर्ष असणारे एक पेशंट 2008 साली आले होते, तेव्हा त्यांना डावा खांदा, डावे मनगट व त्याच हाताची बोटे यात खूप वेदना होत होत्या, तसेच ती बोटे नीट वळतही नव्हती, मूठ झाकता येत नव्हती की हातात वस्तू नीट पकडता येत नव्हती. सांध्यावर सूजही यायची. या तक्रारीची वाढ हवेतील बदल, ढगाळ वातावरण, थंडीच्या मोसमात, सकाळी झोपेतून उठल्यावर, एका कुशीवरून दुसर्‍या कुशीवर वळताना, वाढायची. त्यांना आराम पडायचा तो थोडी हालचाल केल्यावर. अशा प्रकारे त्यांच्या शारीरिक तक्रारी असून त्यामुळे त्यांच्या रोजच्या कामावर, सर्व्हिसवर परिणाम होऊ लागला.

या रुग्णांची उष्ण प्रकृती असून त्यांना आहारात कडधान्य, मटण, अंडी, दूध, दही, गोड, बटाटा, केळ व ताक इ. खूप आवडायचे; पण दूध, गोड व हरभराडाळ यांनी त्रास खूप वाढायचा बाकी जेवण व तहान नॉर्मल होती. घाम-चेहरा, पोट व छातीवर येत असे झाले. वरीलप्रमाणे त्याची शारीरिक तक्रार, घाम, आवड-नावड हे जाणून घेऊन झाले. आता त्यांच्या मानसिकतेकडे वळले असता त्यांची खालीलप्रमाणे स्वभाव वैशिष्टे मिळाली.

अ) मदतीसाठी नेहमी पुढाकार, दयाळू.

ब) घाबरट मनोवृत्ती. 

क) माघार घेणे.

ड) सर्वांच्यात मिक्स होण्याची आवड.

इ) परतफेडीची अपेक्षा.

• आनुवंशिक आजार – 

आजोबांना दमा, आईला क्षयरोग (T.B.), काकांना कॅन्सर व वडिलांचे मुळव्याधीचे ऑपरेशन झाले होते.

पूर्व तपासणीमध्ये – 

रक्‍ताची तपासणी – Serum uricacid 4.7 mgm/100ml. R.A. test-Positive ही 2004 मधील तपासणी. होमिओपॅथिकच्या शास्त्राप्रमाणे या रुग्णांचा पूर्ण प्राकृतिक अभ्यास करून, डळाळश्रळर ीळाळश्रळर्लीी र्लीीशर्पीीींश या तत्त्वाच्या आधाराने त्या रुग्णांचे प्राकृतिक औषध Lycopodium 30 हे निवडले व एक सिंगल डोस देऊन पुन्हा 10 दिवसांनी बोलावले असता त्यांच्या तक्रारींमध्ये चांगला फरक पडला. त्यांना आराम पडला. नंतर Lyco 200 हे औषध दिले असे तीन महिने दिले. तोपर्यंत पेशंटच्या हात, मनगट व बोटे यांच्या वेदनाही कमी झाल्या व हाताची हालचालही चांगली होऊ लागली. नंतर त्यांची सहा महिने ट्रिटमेंट झाल्यावर 2008 मध्ये रक्‍ताची तपासणी केली असता RA-test  निगेटिव्ह आली. तरीही त्यांना 2/3 महिने पुढे औषध दिले कारण आता फक्‍त गोड व हरभर्‍याचे खाल्‍ले तरच थोडा त्रास होऊन तो पुढे कमीही यायचा.

ट्रिटमेंट बंद करून सहा महिने झाल्यावर पुन्हा एकदा रक्‍ताची तपासणी केली असता RA-test निगेटिव्हच आली. अशा प्रकारे त्या रुग्णाचा संधीवात कायमस्वरूपी मुळापासून बरा झाला. होमिओपॅथिक औषधे खाण्यास सोपी, गोड व कसलेही साईड इफेक्टस नाहीत. 

टीप :- प्रत्येक व्यक्‍तीनुसार औषध वेेगवेगळे असू शकते. आपल्या तज्ज्ञ होमिओपॅथीकडूनच औषधे घ्यावीत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news