सोप्या पध्दतीने घरीचं तयार करा ‘हे’ कुल ड्रिंक्स 

पुढारी ऑनलाईन डेस्क

बाहेरून ज्यूस, कोल्ड्रींक खरेदी करताना आपल्याला पैसे मोजावे लागतात. कधी कधी खिशात पैसे नसतील तर हे आपल्याला परवडणारे नसते. मग, अशा स्थितीत आपल्याला घरच्या घरी उत्तम, स्वादिष्ट आणि कमी पैशांमध्ये कुल ड्रिंक्स तयार करता येतात. एका डायटीशियनने वेबिनारमध्ये इम्युनिटी बूस्टिंग ड्रिंक्सच्या या तीन रेसिपी विषयी सांगितले होते. 

समर कूल ड्रिंक्स अधिक विटॅमिन्स मिळण्यासाठी उत्तम असतात. यासाठी कुकुंबर-स्पिनॅच ज्यूस, वॉटरमेलन मिंट स्मूदी, ड्राय फ्रूट स्मूदी मधासोबत घेतले तरी ते फायदेशीर आहे. 

उन्हाळा सुरू आहे. तर कोरोनाची दूसरी लाट गतीने संक्रमित होत आहे. भीषण गर्मीमध्ये तहान भागवण्यासाठी फ्रिजचे  थंड पाणी पिणे योग्य नाही. तर विटॅमिन मिळण्यासाठी काही खास ड्रिंक्सदेखील प्यायला हवे. 

कुकुंबर-स्पिनॅच ज्यूस

या ड्रिंकमध्ये विटॅमिन ए, के, सी, मॅग्नीशियम, कॅल्शियम, कॉपर आणि पोटॅशियम मिळेल. काकडी, केळ, आले आणि  पालक हे १० मिनिटसाठी रेफ्रिजरेट करा आणि थंड असतानाचं मिक्सरवर मिश्रण तयार करा. त्यात लिंबूचा रस आणि थोडं मीठ मिसळून प्यावे. 

वॉटरमेलन मिंट स्मूदी

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कलिंगडचे काही तुकडे, पुदीन्याची पाने,  भोपळ्याच्या बिया मिक्सरवर एकत्र करा. यामुळे झिंक आणि ओमेगा-३ वाढेल. 

ड्राय-फ्रूट स्मूदी

काजू, बदाम, अंजीर आणि खजूरला ३० मिनिट भिजवून घ्यावे. पेस्ट बनवून गोड होण्यासाठी त्यात मध घालावे. पेस्टला २ कप दुधासोबत मिसळून प्यावे. यातून विटॅमिन ए, बी आणि सी मिळेल. 

 

logo
Pudhari News
pudhari.news