पुढारी ऑनलाईन डेस्क
सेक्स हा आनंदी सहजीवनाच्या अनेक रहस्यांपैकी ते एक महत्त्वपूर्ण रहस्य आहे, असे अनेक संशोधकांचे मत आहे. आनंददायी सेक्स जीवन तुम्हाला दीर्घ काळापर्यंत एकमेकांशी बांधून ठेवते. त्याच बरोबर हस्तमैथुन हाही एक जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे, असं लैंगिक समस्या तज्ज्ञ सांगत असतात. मात्र, दररोज हस्तमैथुन केल्याने ताकद कमी होते? असा गैसमज ब-याच लोकांमध्ये असतो. याचविषयी लैंगिक समस्या तज्ञ डॉ. राहुल पाटील यांना विचारले असता त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
डॉ. राहुल पाटील सांगतात, हस्तमैथुन करणे ही स्वाभाविक क्रिया आहे. त्याने काही धोका होत नसतो. वयात येताना सतत याविषयी चुकीची माहिती कानावर पडत असते. त्यात खोट्या जाहिराती आणखी मारा करत असतात. या सर्व प्रकाराने हस्तमैथुन केल्याने खरंतर चांगला व्यायामच होत असतो. पण थकवा येतो हे सतत ऐकल्याने तसेच वाटू लागते. डोळे खोल गेले असे वाटते. प्रत्यक्षात काही वाईट परिणाम होत नाही. एकदा त्यामागील शास्त्रीय सत्य समजले की ही सगळे लक्षणे थांबतात. इथं गरज आहे लैंगिक अवयव आणि त्याची नैसर्गिक क्रिया कशी असते, हे जाणून घेण्याची. पुरुषाला असं वाटतं की यावर औषध हवे. इथेच भोंदू लोक यावर उपाय म्हणून लाखो रुपये खर्च करायला लावतात. पण शास्त्रीय माहिती दिली की पूर्ण तक्रार नाहीशी होते, हे सत्य कोण सांगत नाही.
एकदा सेक्स केल्यावर दुसरा सेक्स अर्ध्या तासानं करावा?
डॉ. पाटील पुढे म्हणतात की, लोकांना दोन वेळा सेक्स केला की चांगलं वाटतं. पण दोनवेळा हस्तमैथुन केलं की ताकद कमी होते, असे अजब विचार मनात येऊ लागतात. त्यामुळे याबाबत शास्त्रीय माहिती घेणे आवश्यक आहे.
सेक्स करताना स्नायू दुखावू शकतो का?
वेगवेगळे लैंगिक आजार होऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यावी?
सेक्स, हस्तमैथुन करताना लिंग कडकपणा प्रत्येकवेळी तेवढाच असतो का?
किती दिवसांनी सेक्स किंवा हस्तमैथुन केले आहे आणि त्यावेळी कामवासना किती, कुठल्या प्रकारे वासना जास्त वाढते त्यावर तो कडकपणा आणि त्यातला ताण ठरतो. पण प्रत्येकवेळी तोच कडकपणा आलाच पाहिजे याची गरज नाही. तुलना करत राहिलो तर त्यातला आनंद घेता येत नाही. एकदमच कडकपणा नसेल तर त्याला नपुंसकता म्हणतात. कधीतरी असं झालं तर ते गंभीर असतं असं नाही. स्त्री पुरुष पहिल्या सेक्सशी तुलना करत राहतात आणि घाबरतात, अशीही माहिती डॉ. राहुल पाटील यांनी दिली.
गरम पाण्याने आंघोळ केल्यास शुक्राणू निर्मितीवर परिणाम होतो का?
कोरोनामुळे लैंगिक समस्या येतात का?
मुलामुलींच्या हस्तमैथुन करण्याने विवाहानंतर देखील त्यांना फायदा होतो का?