Thyroid Disease | थायरॉईडमुळे वजन वाढल्यास करा हे उपाय...

थायरॉईडने ग्रस्त असलेल्या काही व्यक्तींचे वजन वेगाने वाढते तर काही लोकांचे वजन वेगाने कमी होते.
Thyroid Disease
Thyroid File Photo
Published on
Updated on

डॉ. संतोष काळे

थायरॉईड ग्रंथी शरीरातील चयापचय क्रिया नियंत्रित करण्याचे काम करते. त्यामुळेच थायरॉईड ग्रंथींचे काम योग्य प्रकारे होत नसेल तर आरोग्याच्या अनेक तक्रारी भेडसावतात. थायरॉईड ग्रंथीचे असंतुलन दोन प्रकारचे असते. थायरॉईडच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. सर्वसाधारणपणे महिलांमध्ये हा विकार जास्त वेगाने वाढताना दिसतो आहे. (Thyroid Disease)

Thyroid Disease
Nashik News | नाशिकच्या तीन जागांवर शरद पवार गटाचा दावा

पहिल्या अवस्थेत थायरॉईड ग्रंथींमधून कमी प्रमाणात संप्रेरके स्त्रवतात त्याला हायपोथायरॉईडिइम म्हणतात तर दुसऱ्या अवस्थेत थायरॉईड ग्रंथींमधून अधिक प्रमाणात संप्रेरके स्रवतात. त्याला हायपोथायरॉइडिझम म्हणतात. थायरॉईड विकारामुळे जर वजन वाढत असेल तर आपल्याला हायपोथायरॉइडिझम आहे.

वजन वाढणे थांबवण्यासाठी जीवनशैलीतील काही सवयी बदलाव्या लागतील. सर्वप्रथम तपासणी करा वजन वाढणे हे काही फक्त थायरॉईडचे लक्षण असते असे नाही. त्यामुळे थायरॉईडची तपासणी करून घ्यावी. त्यामधून थायरॉईड असल्यास त्याचा कोणता प्रकार आहे ते समजून घेता येईल. अंडर अॅक्टिव्ह थायरॉईड की ओव्हर अॅक्टिव्ह थायरॉईड यापैकी कोणता आहे हे समजून घेता येईल.

या तपासणीच्या निष्कर्षानंतरच पुढे काही मार्ग आखता येईल. इतरही काही गरजेच्या तपासण्या करून डॉक्टर वजन नियंत्रित ठेवण्यासाठी कशा प्रकारची जीवनशैली अंगीकारावी याविषयी मार्गदर्शन करू शकतील तसेच उपचारांची दिशा देखील ठरवता येईल. थायरॉईडमध्ये वजन कमी करण्यासाठी शरीराला योग्य पोषण मिळण्याबरोबरच आहाराच्या काही सवयी जरूर बदलाव्या लागतील.

नियमित व्यायामाबरोबर आपल्या आहारात थोडी कपात करून त्याऐवजी उकडलेल्या भाज्या, सलाड यांचे सेवन करावे. त्यामुळे थायरॉईड असले तरीही वजन वेगाने कमी होण्यास मदत होईल. त्याशिवाय मीठाचा वापर कमी करायला हवा. वजन कमी करण्यासाठी अनेक जण ग्रीन टी चा वापर करतात. शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी त्याची मदत होते. त्यामुळे वजन कमी होण्याची प्रक्रियाही वेगाने होते. पण थायरॉईडच्या विकारात ग्रीनटीचे सेवन हानीकारक ठरू शकते. त्यामुळे याबाबत वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा.

Thyroid Disease
Horoscope Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | , गुरुवार, ८ ऑगस्‍ट २०२४

थायरॉईड विकारामध्ये स्थूलता वाढण्याचे मोठे कारण म्हणजे औषधांमधील अनियमितता. त्यामुळे थायरॉईड असेल तर गोळ्या घेण्याची एक वेळ ठरवा आणि त्याच वेळेला औषधे घ्यावीत. मुख्य म्हणजे गोळी घेणे विसरता कामा नये. थायरॉईडच्या विकारात आहारात उकडलेला बटाटा, रताळे यांचे सेवन आपण करू शकतो.

याच्या सेवनाने शरीराला कोलेस्ट्रॉल कमी मिळते पण पोटॅशिअम भरपूर प्रमाणात मिळते जे थायरॉईड विकारात आवश्यक असते. या दरम्यान पांढरा तांदुळ खाण्याऐवजी ब्राऊन राईसचे सेवन करावे. त्याशिवाय तंतुमय घटकांसाठी मोडाची कडधान्ये, डाळी सेवन कराव्यात. बी जीवनसत्त्वासाठी दही, दूध, फळाचे रस तसेच सुकामेवा सेवन करू शकतो. कॅफीन युक्त पदार्थ, ग्लुटेन युक्त आहार, फास्टफूड तसेच गोड पदार्थांचे सेवन करू नये.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news