Bluetooth earphones brain tumor risk |ब्लूटूथ इयरफोन्समुळे ब्रेन ट्यूमर होतो?

Bluetooth earphones brain tumor risk |
Bluetooth earphones brain tumor risk |ब्लूटूथ इयरफोन्समुळे ब्रेन ट्यूमर होतो?
Published on
Updated on

डॉ. रूपा जुथानी

आजच्या धावपळीच्या युगात ब्लूटूथ इयरफोन्स हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहेत. प्रवासात असो वा कार्यालयात, हे उपकरण सतत आपल्या कानाशी जोडलेले असते. मात्र, याच वाढत्या वापरासोबत रेडिएशन आणि मेंदूच्या कर्करोगाच्या (ट्यूमर) जोखमीबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे. तथापि, ही केवळ एक भीती असून याला कोणताही शास्त्रीय आधार नाही.

चार वर्षांपूर्वी म्हणजे 2022 मध्ये अद्ययावत केलेल्या एका व्यापक संशोधनात सुमारे दहा लाख महिलांच्या 14 वर्षांच्या डेटाचा अभ्यास करण्यात आला होता. या प्रदीर्घ संशोधनानंतर ब्लूटूथचा वापर आणि मेंदूचा कर्करोग यांचा कोणताही परस्पर संबंध आढळून आलेला नाही. त्यामुळे सामान्य वापरासाठी ही उपकरणे सुरक्षित मानली जातात. ब्लूटूथ उपकरणांमधून उत्सर्जित होणारे रेडिएशन हे ‘नॉन-आयोनाइजिंग’ प्रकारचे असते. क्ष-किरण (एक्स-रे) सारख्या घातक किरणांच्या उलट, हे सौम्य रेडिएशन आपल्या शरीरातील पेशींच्या ‘डीएनए’ला कोणतीही इजा पोहोचवत नाही. पेशींमधील ‘डीएनए’ची हानी न झाल्यामुळे कर्करोगाची गाठ निर्माण होण्याची शक्यता उरत नाही.

एक महत्त्वाची बाब म्हणजे, आपण जेव्हा मोबाईल फोन थेट कानाला लावून बोलतो, तेव्हा रेडिएशनचा धोका अधिक असतो. फोन चार्ज होत असताना किंवा कॉल जोडला जात असताना त्यातून सर्वाधिक लहरी बाहेर पडतात. अशावेळी फोन डोक्यापासून काही अंतरावर ठेवणे हिताचे ठरते. त्यामुळे थेट फोन कानाला लावण्यापेक्षा इयरफोन्स वापरणे हा अधिक सुरक्षित पर्याय ठरतो.

आपल्या श्रवणशक्तीच्या सुरक्षेसाठी फोन ‘स्पीकर’वर ठेवून बोलणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी हे शक्य नसल्यास हेडफोन्सचा वापर करावा. संशोधनानुसार, फोन थेट कानाला लावल्यामुळे हियरिंग नर्व्हवर जे परिणाम होतात, ते हेडफोन्स वापरल्यास टाळता येतात. कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापर मर्यादित आणि आवश्यकतेनुसार करणे हेच उत्तम आरोग्याचे सूत्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news