गर्भाशय काढण्याच्या विविध पद्धती | पुढारी

Published on
Updated on

डॉ. प्रवीण हेन्द्रे

गर्भाशयाचे विविध प्रकारचे विकार व त्यावर गर्भाशय न काढता करता येण्यासारखे अनेक उपचार आपण गेल्या काही लेखांमध्ये पाहिले आहेत. परंतु, जेव्हा गर्भाशय टिकविण्याच्या काही प्रणाली वापराव्या लागतात. परंतु, काही स्त्रियांमध्ये त्याचा उपयोग होत नाही किंवा रजोनिवृत्तीचे वय झालेले असते व काही कारणांमुळे गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया अपरिहार्य असते. अशा परिस्थितीमध्ये गर्भाशय काढावयाचा निर्णय घ्यावा लागतो व अशा परिस्थितीमध्ये गर्भाशय काढण्याच्या विविध पद्धतीचा अवलंब करावा लागतो, त्याची आपण थोडक्यात माहिती घेऊया.

ही शस्त्रक्रिया मुख्यत्वे दोन मार्गांद्वारे केली जाते.

1) जननमार्गाद्वारे.

2) पोटाला छेद घेऊन.

गर्भाशय ओटीपोटातील उदर पोकळीमध्ये असते. व त्याला रक्तपुरवठा 3 ते 4 मार्गाने होत असतो. कोणतीही अवयव उदा. अपेंडिक्स, पित्ताशय किंवा गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रिया करताना सर्वप्रथम त्याला होणारा रक्तपुरवठा खंडित करावा लागतो. तसेच त्या अवयवाची शरीरातील इतर अवयवांना असलेला जोड खंडित करावा लागतो. गर्भाशय हे ओटीपोटातील उदरपोकळीत स्थिर करण्यासाठी बंधांचे जोड गर्भाशयाकडून पोटातील स्नायूंना जोडलेले असते. हे बंध विलग करावे लागतात. व गर्भाशय अशाप्रकारे शरीरापासून सुटे झाले की, ते शरीराबाहेर काढावे लागते. कोणतीही शस्त्रक्रिया करण्यासाठी शरीराला असलेले नैसर्गिक छिद्र वापरले तर अशी शस्त्रक्रिया सुलभपणे करता येते. म्हणून आधुनिक वैद्यकीय प्रणालीद्वारे करावयाचे उपाय हे Endoscopy द्वारे करण्याचा प्रयत्न असतो. नैसर्गिक छिद्राद्वारे आतड्याच्या शस्त्रक्रियेपासून जठरातील शस्त्रक्रियेपर्यंत विविध शस्त्रक्रिया आता उपलब्ध आहेत. कोणतेही विज्ञान हे कधीही स्थिर राहात नाही. त्यामध्ये प्रगती व स्थित्यांतरे होतच असतात.

त्यातील काही यशस्वी होतात तर काही काळानुरूप उपयुक्तता सिद्ध न झाल्यामुळे विस्मरणात जातात. परंतु, हा संशोधनाचा ध्यास हा विज्ञानाला चालूच ठेवावा लागतो. इतर अनेक विषयांमध्ये संशोधनाला WHO  ची परवानगी आहे. परंतु, एक्स-रे व गरोदरपणामध्ये होणार्‍या उलटी व मळमळीसाठीच्या डोहाळ्यावरती Thaladomide नावाचे औषध वापरण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे उलटी व मळमळ पूर्ण बरी होत होती. परंतु, त्याच्या फारमोठ्या दुष्परिणामामुळे काही बालके हात व पाया विना जन्माला आली. (Phocomelia) याला वैद्यकीय विश्वात Thaladomide Tragedy म्हणून ओळखले जाते. तेव्हापासून गरोदरपणामध्ये काही ठराविक औषधे जी वापरून अर्भकावर किंवा गर्भावर परिणाम होत नाही, हे सिद्ध झालेली आहेत. याखेरीज नवीन कोणत्याही  संशोधनासाठी औषधी द्रव्य गरोदर स्त्रिला देण्यास संपूर्ण बंदी आहे. म्हणजेच नवीन संशोधन करताना गरोदर स्त्रियांवर कोणतेही प्रयोग करता येत नाहीत. कारण ज्याचा दुष्परिणाम कोणता होणार हे माहिती नाही, असे द्रव्य देऊन आणखी नवीन समस्या तयार करण्याची वैद्यकीय शास्त्राला परवडणार नाही.

असो. दुर्बीण शस्त्रक्रिया जेव्हा उपयुक्त आहे हे समजले तेव्हा काही वैद्यकीय बांधवांनी Notes Natural Orifice trans luminal surgary चा नवीन प्रकार प्रयोग करायचा ठरवला. या प्रयोगाद्वारे पोटातील विकारासाठी उदा. आतड्याच्या, अपेंडिक्स व पित्ताशयाच्या विकारासाठी करावयाची शस्त्रक्रिया Trans Luminal म्हणजे नैसर्गिक छिद्राद्वारे करण्याचे प्रयोग करण्यात आले. अशा शस्त्रक्रिया करताना Endoscopy एन्डोस्कोपीद्वारे जठर अथवा मोठ्या आतड्याला छिद्र पाडून पोटाच्या उदरपोकळीमध्ये (Peritoneal Cavity) प्रवेश करण्यात येत असे व इच्छीत अवयवावर शस्त्रक्रिया करून तो अवयव जठर किंवा मोठ्या आतड्याच्या छिद्रातून शरीराबाहेर काढला जात असे. व शस्त्रक्रियेद्वारे केलेले हे छिद्र आतून टाके घालून बंद केले जाई. हा प्रयोग जवळ जवळ 5 ते 9 वर्षे चालला. परंतु, अशा प्रणालीद्वारे होणार्‍या गुंतागुतीमुळे अनेक रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला किंवा पुन्हा वेगळी शस्त्रक्रिया करणे भाग झाले व ही प्रणाली काळाच्या ओघात बाजूला पडली.

परंतु, गर्भाशय काढण्याची एकच शस्त्रक्रिया ही पारंपरिक बर्‍याच वर्षांपासून सुरू आहे ती म्हणजे जजनमार्गावाटे गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया होय. व ही शस्त्रक्रिया दिवसेंदिवस प्रगत होत चाललेली दिसते. ज्या स्त्रियांमध्ये जनन मार्गावाटे गर्भाशय काढणे शक्य आहे त्यांना या मार्गावाटे केलेल्या शस्त्रक्रियेचा खूप फायदा होतो. अशा शस्त्रक्रिया अंग बाहेर आल्यानंतर अथवा जेव्हा गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया अपरिहार्य आहे, परंतु गर्भाशय खाली सरकलेले नाही अशावेळी Non Desent vaginal Hysterectomy या प्रणालीद्वारे काढता येतात.

अशा शस्त्रक्रिया या सर्वात सुलभ व पेशंटसाठी सर्वोत्तम आहेत. गरज असते ती या शस्त्रक्रिया करणार्‍या तज्ज्ञ स्त्रीरोग तज्ज्ञाची.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news