डॉ. सौ. सपना गांधी
आजच्या युगामध्ये आक्रमकांवर असलेला आजार, प्रत्येक घरामध्ये एखादा तरी सापडतोच डायबेटीसचा अगदी गोड आगार, साखरेसारखाच एकदा का तो शरीराला चिकटलाच तर तो शेवटपर्यंत साथ देतो आणि त्याचा Maintanance साठी रोजच्या डायबेटीसच्या नोगा, इजेक्शनने नियमित घेणारी मंडळी आपल्याला सत्याचीच झाली आहेत. मेडिकल दुकानामध्ये डायबेटीसची औषधे जसा किराणा माल महिन्याचा परतात तसेच महिन्याची परतात. डायबेटीस टाईप आणि डायबेटीस टाईप-2 असे दोन प्रकार आहेत.
डायबेटीस टाईप-ह प्रकारात रूपाच्या शरीरात पन्क्रियाज इन्सुलीन तयार करतच नाही. त्यामुळे रक्तातील साखरेचे पेशीमध्ये शिरकाव होता, साखर रक्तातच राहते. साखरेचे ऊर्जेत रूपांतर न होता साखर जास्त प्रमाणात रक्तवाहाच्या मध्यच राहते. हडायबेटीस टाईलहान मुलांमध्ये जास्त दिसून येतो. साधारण 10000 मुले ही टाईप डायबेटीसची भारतात आढळून येत आहेत.
'Pre Diabetes' धमिक अवस्था डायबेटीसची जर खराब जीवनशैली असेल तर इश्रेेव र्डीसरी पातली ही नॉर्मलपेक्षा जास्त असते. या इतकी पण जास्त नसते की. Diabetes आजार घोषित करण्यात येईल. उदा. वजन वाद, ओबेसिटी, उच्च रक्तबाद, वाढलेले खराब कट, रक्तातले (कोलेस्ट्रॉल, ट्रायबीसराईडस् /LDL)
डायबेटीस टाईप 2 – प्रकार सर्वसाधारण सर्वत्र पाहण्यास मिळतो. वयाच्या 45 वर्षांनंतर सहसा दिसून येतो. PCOD पॉलिसीस्टीक ओव्हरियन डिसीज. बैठे कामकाज अनुवंशिकता, आजूबाजूच्या वातावरणाचा, मानसिक ताण/ तणाव. डायबेटीस टाईप-2 मध्ये शरीरातच इन्सुलिन कमी स्रावते किंवा शरीर त्या इन्सुलिनचा वापर करण्यास असू शकते.
लक्षणे– वाढलेली तहान, वारंवार लघवीला जावे लागणे, वाढलेली भूक, मरगळ, अशक्तपणा, उत्साह न वाटणे, वजन घटणे, तोंडाला कोरड पडणे, शरीराला खाज येणे, अंधूक दिसणे, कधी कधी लक्षणे अभावीच रक्तातील साखर वाढलेली असते.
कारणे– शरीरातील पॅन्क्रीयाज-इन्सुलीन निर्माण कमी करते तर कधी कधी इन्सुलीन निर्माण होत नाही. तर कधी शरीर ते इन्सुलीन पूर्व प्रमाणात स्वीकारण्यास असक्षम असते. नक्की असे का होते हे अजून कारण समजू शकले नाही. तरीपण मानसिक ताण/तणाव, वातावरणातील परिणाम,अनुवंशिकता, प्रमाणापेक्षा वजन वाढणे,जीवनशैली high, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, जंकफूड, थंड पेय इ.वापर होणे.
डायबेटीस टाईप 2-मध्ये रक्तातील साखर पेशींमध्ये न शिरता तशीच रक्तात राहते. त्यामुळे साखरेचे ऊर्जेत रूपांतर न होता, ती साखर पूर्ण शरीरातील रक्तात मिसळते. प्रेग्नन्सी दरम्यान जर आईला डायबेटीस असेल तर बाळाला होण्याचा चान्स आहे.
कॉम्प्लिकेशन– गँग्रीन, जखमा लवकर बर्या न होणे, बधीरपणा पायांना, मुंग्या येणे, शरीरावर काळे डाग पडणे,न्युरोपथी, बहिरेपणा, हार्ट अॅटॅक येण्याचे प्रमाण वाढते, लैंगिक ताठरपणात अडचण येणे, किडनी फेल्युअर इ.
जीवनशैलीतील बदल– खाण्यापिण्यामध्ये फायबरयुक्त आहार घ्यावा. पालेभाज्या, फळे, पोषक कार्बोहायड्रेटस, कडधान्ये घ्यावीत. थोड्या थोड्या वेळांनी खावे. वजन कंट्रोलमध्ये ठेवावे. रोज चालणे आणि योगासने, एरोबीक्स सारखे व्यायाम करावेत. प्राणायाम करावेत. 10 टक्के लोकांना डायबेटीस आहे. चारातल्या एकाला आपल्याला डायबेटीस आहे ही कल्पनाच नसते. Pre Diabetes लोक तर जागृतच नसतात, काळजी घेत नाहीत. युनायटेड स्टेटमध्ये डायबेटीस. हे 7 वे कारण कारण आहे मृत्यूचे. तपासण्या-
Blood Sugar Test-Fasting Post Pandial (P.P.) Urine Sugar Level
होमिओपॅथीमध्ये डायबेटीसवर नैसर्गिकरीत्या खूप छान उपचार आहे. डायबेटीस हा जर प्राथमिक अवस्थेत असेल तर फक्त होमिओपॅथिक औषधांनी पूर्णपणे बरा होतो आणि जर जुनाट डायबेटीस असेल तर मात्र अॅलोपॅथिक औषधांबरोबर जर होमिओपॅथिक औषधे अचूक प्रमाणात वापरली तर पुढे रुग्णाला होणारी कॉम्प्लिकेशन्स टाळली जातात व रुग्णाला त्यांच्या रूटीन जीवनामध्ये जगताना सहाय्य करते. आराम देते, मानसिक शारीरिक स्वास्थ्य लाभते. आहे त्या गोळ्या कमी होतात. खालील होमिओपॅथिक औषधे ही त्या त्या तज्ज्ञ होमिओपॅथीक डॉक्टरांकडूनच घ्यावीत.
1. अर्सेनिक अल्बन – हे औषध जुनाट डायबेटीसवर उपयोगी पडते जेव्हा रुग्णाला कॉम्प्लिकेशन्स गँग्रीन, पायाला जखमा होऊन त्यातून घाणेरडा वास येणे, पाय बधीर होऊन, मुंग्या येणे, रुग्णाला डायबेटीसचा इफेक्ट पचनावर पण होऊन जुलाब लागतात. हिरवट-पातळ असे जुलाब होते. थंड प्रकृतीचे रुग्ण असून स्वच्छता/टापटीपपणा इकडे खूप कटाक्षाने लक्ष देतात घाम अजिबात आवडत नसते सारखे बेचैन असतात. कुठल्याही गोष्टींची काळजी करतात. थोडे थोडे पाणी सारखे पितात. जखमांना आग असते फॅटी लिव्हर/फॅटी हार्ट असणे. औषधांचा फारसा उपयोग होत नाही, असे त्यांना वाटत असते.
2. फॉस्फरिक अॅसिड – डायबेटीसचा साईड इफेक्ट म्हणजे खूप अशक्तपणा/विकनेस येतो. वजन झपाट्यांनी कमी होते. हळव्या स्वभावाची माणसे असतात. त्यांना थंड पेय खूप आवडते. एकोप्यांनी राहण्यास आवडते. काही दुःखद घटनांचा त्यांच्यावर खोल परिणाम होतो. प्रेमभंग झाल्यावर,कालांतराने त्यांच्या भावना बोथट होतात. अॅक्सिडेंट/ऑपरेशन सारख्या गोष्टीनंतर ही रुग्णांच्या तक्रारी वाढतात.
3. कार्सिनोसीन – हे औषध नोसोड आहे. हे रुग्ण खूप अॅक्टिव, चिअरफूल असतात. आज्ञाधारक स्वभाव असतो. शिवाय या रुग्णांना चित्रकला/संगीत/डान्सची खूप आवड असते. फिरायला जाणे दूरवर आवडते. लहानपणापासून पालकाच्या धाकात वाढलेले असतात. खूप हळवे स्वभावांनी असल्याने कोणी रागावलेले आवडत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडे अगदी लहानपणापासून जबाबदारी घेण्याची वृत्ती असते. थोडे टेन्शन घेणारे, भित्रे असेही असतात. लहान मुलांमधील डायबेटीस तसेच मोठ्या माणसांनाही उपयोगी पडते.
4. लायकोपोडीयम – हे औषध डायबेटीस वर उत्तम आहे. रुग्णाला डायबेटीसबरोबर पचनासंबंधित ही आजार होतात. गॅसेस/ढेकर/पोट फुगणे-गच्च होणे इ. हे रुग्ण उष्ण प्रकृतीचे असून, त्यांना गोडची आवड असते. रुग्णाला डायबेटीसबरोबर, लिव्हरवर सूज येणे, फॅटी लिव्हरसारखे तक्रारी असतात. बिजनेस किंवा पदाधिकारी पदावर असता. असे अनेक होमिओपॅथिक औषधे डायबेटीस आजारावर उपयोगी पडतात; पण ही औषधे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घ्यावीत. होमिओपॅथिक उपचार करताना रुग्णाचा स्वभाव/आजाराची लक्षणे/अनुवंशिकता/थंड उष्ण प्रकृती/आहारातील आवडी निवडी इ. सर्व गोष्टींचा सूक्ष्म गोष्टी विचारात घेऊन योग्य अभ्यास करून त्या त्या रुग्णाचे वेगवेगळे औषध देण्यात येते. त्यामुळे आजाराचे मूळ कायमस्वरूपी घालवण्यास उपयुक्त ठरते.