कोव्हिड लसीमधील कोणत्या घटकाची अ‍ॅलर्जी होऊ शकते?

लस हे शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीस चालना देऊन विशिष्ट रोगास प्रतिबंध करण्यास मदत करते. कोव्हिड लसींमध्ये संपूर्ण विषाणू नसून त्यातील केवळ एक भाग असतो. लसीकरणानंतर ताप आणि इतर सौम्य दुष्परिणाम आपल्या रोगप्रतिकारक शक्तीच्या प्रतिसादामुळे उद्भवतात. काही लसींमध्ये जिवंत कोव्हिड विषाणू वापरला आहे. त्यापैकी दोन लसी भारतात तयार केलेल्या आहेत. गोवर, टीबी यासारख्या आजारांसाठी आपण यापूर्वी त्यावरील लसी घेतलेल्या आहेत.

कोव्हिड लसीकरणाबाबत –

• कोव्हिड लसीमधील कोणत्या घटकाची अ‍ॅलर्जी होऊ शकते, हे अगोदर जाणून घेणे आवश्यक आहे. पॉलीथिलीन ग्लायकोल आणि पॉलिसॉर्बेटसारखे घटक अ‍ॅलर्जीसाठी कारणीभूत ठरतात.

• कोव्हिड लसीच्या पहिल्या डोसनंतर संवेदनशील व्यक्तीस अ‍ॅलर्जी निर्माण होण्याची शक्यता असते.

• कमकुवत रोगप्रतिकारक यंत्रणा, दीर्घकालीन आरोग्याची समस्या, अवयव प्रत्यारोपण झालेला रुग्ण आणि रोगप्रतिकारक औषधांचा वापर सुरू असणार्‍या रुग्णांनी काळजी घेणे आवश्यक असते. 

• वॉरफेरीनचा वापर करत असलेला रुग्णाने लस घेऊ नये, तसेच कोग्युलेशन डिसऑर्डर, क्लोटिंग फॅक्टरची कमतरता, कोगुलोपॅथी किंवा प्लेटलेट डिसऑर्डर असलेले रुग्ण यांनी लस घेऊ नये.

• 16 वर्षांखालील रुग्णांनी तसेच गर्भवती किंवा स्तनपान देणारी महिला यांनी ही लस घेऊ नये.

 लसीकरण करण्यापूर्वी अशी घ्या खबरदारी

• कोरोनाबाधित असाल, तर लसीकरणास जाणे टाळावे. कारण, लसीकरण करताना तुमच्यामुळे इतरांनाही त्याचा संसर्ग होण्याची शक्यता असते. बाधितांनी साधारण 90 दिवस लस घेणे टाळावे.

• अल्कोहोलच्या सेवनाने अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता असते. त्यामुळे लसीकरणाच्या चोवीस तास आधी आणि लसीकरणानंतर 45 दिवस अल्कोहोलचे सेवन टाळावे. जेणेकरून त्याचा रोगप्रतिकराक शक्तीवर दुष्परिणाम होणार नाही.

• लसीकरणापूर्वी पेन किलर्सच्या औषधांचे सेवन टाळा; पण लसीकरणानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतले जाऊ शकते.

• एखादी व्यक्ती आजारी असेल, तर त्या व्यक्तीने लस घेऊ नये. ही लस घेणारी व्यक्ती फिट आणि हेल्दी असणे अधिक गरजेचे आहे.

• अन्नाची, धुळीची आणि त्वचेची अ‍ॅलर्जी असल्यास लस घेण्यापूर्वी त्या व्यक्तीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

लसीकरणानंतरची काळजी 

• लसीकरणानंतर प्रतीक्षालयात तीस मिनिटे थांबावे. लस घेतल्यानंतरही मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतर राखावे आणि हातांची योग्य स्वच्छता राखावी, तसेच खबरदारीच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.  

• वृद्ध आणि अशा प्रकारच्या कोमॉर्बोडिटी असलेल्या लोकांनी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. मधुमेह, ब्रोन्कायटिस, दमा, कर्करोग किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी.

• लसीकरणानंतर वेदना आणि सूज येऊ शकते. थंड, ओलसर कापड घ्यावे किंवा ज्या ठिकाणी लस दिली गेली आहे तेथे एक बर्फ पॅक लपेटून घ्यावा.

• लसीकरणानंतर थकवा, ताप, थंडी, मळमळ, उलट्या, सांधेदुखी असल्यास एक किंवा दोन दिवसांत कमी होईल. परंतु, इतर काही गंभीर लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

डॉ. तुषार राणे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news