

केराटायटीस हा डोळ्यांच्या कॉर्नियाचा दाह किंवा संसर्गामुळे होणारा आजार आहे. हा संसर्ग बॅक्टेरिया, विषाणू, बुरशी किंवा इतर परजीवींमुळे होतो. डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास केराटायटीस गंभीर स्वरूप धारण करू शकतो आणि अंधत्वासारख्या समस्या उद्भवू शकतात.
बॅक्टेरियल संसर्ग : खराब स्वच्छता असलेल्या कॉन्टॅक्ट लेन्समुळे किंवा डोळ्यातील जखमेमुळे होतो.
व्हायरल केराटायटीस : हर्पिस सिम्प्लेक्स व्हायरस किंवा व्हेरिसेला झोस्टर सारख्या विषाणूंमुळे होतो.
बुरशीजन्य (फंगल) केराटायटीस : डोळ्यात माती किंवा वनस्पतीजन्य पदार्थ गेल्यास किंवा कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीमुळे होतो.
परजीवी केराटायटीस ः कॉन्टॅक्ट लेन्स चुकीच्या प्रकारे वापरल्यास किंवा दूषित पाणी डोळ्यात गेल्यास होतो. धूळ, धूर किंवा रासायनिक पदार्थ डोळ्यात गेल्यास केराटायटीस होऊ शकतो. सतत स्क्रीनकडे पाहणे, कमी झोप आणि डोळ्यांची निगा न राखल्यास डोळ्यांची प्रतिकारशक्ती कमी होते.
डोळ्यात लाली येणे आणि सूज
डोळ्यात जळजळ किंवा तीव्र वेदना
प्रकाशास संवेदनशीलता (फोटोफोबिया)
डोळ्यातून जळजळीत किंवा चिकट स्राव होणे
अस्पष्ट किंवा धूसर दिसणे
डोळ्यात काही कण असल्यासारखी भावना
केराटायटीसचे संभाव्य धोके
उपचार न केल्यास कॉर्नियावर डाग पडून दृष्टी कमी होण्याचा धोका असतो.
गंभीर अवस्थेत अंधत्व येऊ शकते.
संसर्ग वाढल्यास डोळ्यातील आतील भागाला नुकसान होऊ शकते.
काही प्रकारच्या विषाणूंमुळे केराटायटीस पुन्हा पुन्हा होण्याची शक्यता असते.
कॉर्निया ट्रान्सप्लांट: ज्या रुग्णांमध्ये गंभीर नुकसान झाले असेल, त्यांच्यासाठी कॉर्निया प्रत्यारोपण केला जातो.
स्क्रॅपिंग: संसर्गित भाग काढण्यासाठी कॉर्नियाच्या वरच्या थराची सफाई केली जाते.
डोळे स्वच्छ आणि सुरक्षित ठेवावेत.
कॉन्टॅक्ट लेन्स स्वच्छ धुवून वापरावेत.
डोळ्यांना ताण न येण्याची काळजी घ्यावी.
डोळ्यांना लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत.
प्रखर प्रकाश आणि धुळीपासून संरक्षणासाठी दर्जेदार सनग्लासेस वापरावेत.
कोणतेही लक्षण आढळल्यास त्वरित नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.