डॉ. प्रिया पाटील
पावसाळा आला की आपण आपल्या जीवनशैलीत बरेच बदल करतो. उन्हाळ्याच्या चार महिन्यांत तावून सुलाखून निघालेलं शरीर पावसाळ्याच्या सरींना भुलतं आणि आपण बिनदिक्कत पावसात भिजतो. इथूनच सुरुवात होते पावसाळ्यात होणार्या लहान-सहान आजारांना, आज आपण सर्दीविषयी थोडे जाणून घेऊ.
सामान्य सर्दी हा एक संक्रामक रोग आहे. जो विषाणूमुळे होतो. जो हवेतून शिंकाद्वारे, थेट संपर्कातून जसे आजारी माणसाच्या वस्तू हाताळण्याने, नाकातून श्वसनमार्गात संक्रमण करतो.
सामान्य सर्दी ही मर्यादित कालावधीमध्ये बरी होते. त्याचा कालावधी 5 ते 7 दिवसांचा असतो. ही सामान्य सर्दी ज्या विषाणूमुळे होते त्याला र्हीव्हायरस (Rhinovirus) असे म्हणतात.
लक्षणे ः-
नाक गळणे/नाक वाहणे, सतत न थांबणार्या शिंका, नाक गच्च होणे, डोळ्यांतून सतत पाणी येेणे, वास न येणे, सर्दी प्रथम पाण्यासारखी वाहते. नंतर जंतूसंसर्ग वाढल्यास पिवळी व नंतर हिरवट होते, तसेच इतर शारीरिक लक्षणेही दिसून येतात. जसे ताप येणे, थंडी वाजणे, सौम्य किंवा तीव्र अंगदुखी, घशामुळे जळजळ, डोकेदुखी, कान दुखणे, गच्च होणे.
ही सर्व लक्षणे जाणून घेतल्यानंतर आपण सामान्य सर्दी रोखणे हे सुद्धा आवश्यक आहे.
सामान्य सर्दी ही संक्रमणातून पसरणारी आहे. म्हणून आपण सर्वप्रथम स्वच्छतेवर भर देणे गरजेचे आहे. घरी आल्यावर हात-पाय जरूर धुवावेत. शिंकताना नाकाला, तोंडासमोर रूमाल धरावा. खोकताना नेहमी तोंडाला रूमाल लावावा. पावसात भिजणे टाळावे. खाण्या-पिण्यात योग्य तो बदल करावा, घशाची काळजी घ्यावी. त्याकरिता मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे योग्य ठरेल.
सर्दी व होणारा कफ यांची लक्षणे लक्षात घेऊन त्यावर उपचार घेणेच योग्य ठरेल.
होमिओपॅथिक औषधे
1) एलियम सेपा – सर्दी असते, सर्दीसोबत शिंका जास्त असतात, डोळ्यांतून पाणी येते, नाकातून पाण्यासारखी सर्दी वाहते, नाकातून व डोळ्यांतून पाणी येते. नाकात जळजळ झाल्यासारखे वाटते. सर्दी थंड वातावरणामुळे होते.
2) नक्स वोमिका ः-
हवेत किंवा वातावरणाच्या बदलामुळे सर्दी होते. सर्दीचे प्रमाण सकाळी जास्त असते. सकाळी शिंकांचे प्रमाण जास्त असते. नाक चोंदणे, नाक गच्च होणे, यासारख्या तक्रारी या औषधात जास्त प्रमाणात असतात.
3) युफ्रेशिया ः
सर्दी, वारंवार शिंका तसेच नाका-डोळ्यांतून पाणी वाहते. डोळ्यांतील जळजळ व पाणी वाहने सर्दीसोबत खोकलासुद्धा असतो. संध्याकाळी या पेशंटला त्रास होतो.
4) बेलाडौना ः
सर्दीमुळे डोकेदुखी, ताप भरणे या कारणासाठी बेलाडौनाचा वापर होतो. सर्दी पांढर्या रंगाची असते. हवेत बदल सकाळी लवकर उठल्यावर सर्दी, तसेच शिंका राहतात. सर्दीमुळे नाक लाल होेते. लहान मुलांना सर्दीसोबत ताप भरणे.
5) डलकामेरा ः-
पावसाळा दिवसातील ऋतूतील बदलामुळे होणारा त्रास. पावसाळ्यानंतर नाक चोंदणे, नाक बंद होणे, नाक जास्त गच्च होणे, लहान मुलांमध्ये साधारण गार वातावरणातील बदलामुळे सर्दी होऊन नाक गच्च होेणे. सर्दी पांढरट व पिवळी होणे, मोकळ्या हवेत फिरल्याने डोळ्यांतून फार पाणी येणे.
6) हिपर सल्फर ः-
पावसातील दिवसांतील थंड वातावरणामुळे लहान मुले, तसेच मोठ्या माणसांनासुद्धा गार हवेचा त्रास होतो. सर्दी पिकणे, पिवळट, हिरवी होणे, सर्दी बरेच दिवस राहणे, सकाळचा त्रास होणे, सर्दीसोबत घसा कानाचा त्रास होणे, तसेच सर्दीमध्ये गरम कपडे घालणे, कानाला बांधणे, त्यामुळे पेशंटला बरे वाटते.
वरील औषधांचा वापर वैद्यकीय सल्ल्यानुसार करावा.