प्रमोद ढेरे
निरोगी राहायचे असेल तर किमान चाळीशीनंतर रुटीन चेकअप करा, दिनचर्येत व्यायामाचा समावेश, सवयीत योग्य तो बदल व सहा महिन्यांतून एकदा किंवा किमान वर्षातून एकदा तरी आपल्या रक्ताभिसरण संस्थेचे सर्व्हिसिंग हर्बल पद्धतीने केले पाहिजे…
आपले रक्ताभिसरण म्हणजे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित असलेच पाहिजे कारण आपण जे खातो त्याचं पचन झाल्यानंतर आहाररसात रुपांतर होते व हा आहाररस आपल्या रक्ताभिसरणाने आपल्या सर्व पेशींपर्यंत पोहोचवला जातो. त्यामुळेच आपल्या शरीरातील सर्व पेशींना आवश्यक ती पोषकतत्त्वं मिळून आपली प्रतिकारशक्ती वाढते व आपण जास्तीतजास्त निरोगी राहतो. त्यामुळेच आपले रक्ताभिसरण म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित असलेच पाहिजे.
आता रक्ताभिसरण व्यवस्थित होण्यासाठी व्यायाम केला पाहिजे आणि व्यायामाला दुसरा कोणताही पर्याय नाही. व्यायाम केल्यामुळे दम लागतो. दम लागल्यामुळे आपल्या हृदयाचे पंपिंग वाढते त्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होते. त्यामुळे रक्ताला नेमून दिलेले जे काम आहे, ऑक्सिजन व न्यूट्रिशन सर्व अवयवांपर्यंत पोहोचवण्याचे ते व्यवस्थित होते. त्यामुळेच व्यायाम केल्यावर आपल्याला उत्साही आणि आनंदी वाटते. आता रोज एकसारखा व्यायाम केला पाहिजे असंही काही नाही. आज सूर्यनमस्कार मारले, उद्या डोंगर चाढायला गेला, परवा पोहायला गेला, थेरवा सायकलिंग केली तरी उत्तमच. बरेच लोक म्हणतात आमची दिवसभर भरपूर पळापळ होत असते, त्यामुळे आम्हाला वेगळा व्यायाम करायची गरजच नाही. मात्र, आयुर्वेदामध्ये व्यायाम करण्यासाठी जो वेळ सांगितला आहे तो पहाटे चार ते सहा. कारण या काळाला आयुर्वेदामध्ये ब्रह्मकाळ म्हटले आहे. कारण या काळात हवेमध्ये प्रदूषण कमी असते, ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असते आणि ओझोनचा थरही खाली आलेला असतो. त्यामुळेच या काळात केलेला व्यायाम शरीरासाठी जास्त फायदेशीर असतो.
ज्यांचे वजन उंचीप्रमाणे व्यवस्थित आहे, त्यांनी पहाटे चार ते सहा या वेळेत आर्धा तास व्यायाम केला तरी त्यांना तो पुरेसा आहे. मात्र, ज्यांचे वजन जास्त आहे व त्यांना ते कमी करायचे आहे, त्यांनी पहाटे चार ते सहा या वेळेत किमान एक तास व्यायाम करणे गरजेचे आहे. कारण जेव्हा तुम्ही व्यायमाला सुरुवात करता तेव्हा पहिल्या पंधरा-वीस मिनिटांत तुमच्या शरीरातील ग्लुकोज वापरले जात असते व नंतरच्या चाळीस-पंचेचाळीस मिनिटांमध्ये तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी जळत असते म्हणजेच फॅट बर्न होत असते. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी पहाटे चार ते सहा या वेळेत किमान एक तास तरी व्यायाम करणे गरजेचे आहे.
रक्ताभिसरण व्यवस्थित होण्यासाठी अजून एक महत्त्वाचे म्हणजे किमान वर्षातून एकदा आपल्या रक्ताभिसरण संस्थेचे सर्व्हिसिंग करणे गरजेचे आहे. म्हणजेच जसे आपण आपल्या गाड्यांचे सर्व्हिसिंग ठराविक किलोमीटर किंवा ठराविक कालावधी झाल्यावर करतो अगदी त्याप्रमाणेच. आणि शरीरात ठिकठिकाणी वेदना होत असतील, सूज येत असेल, हाता-पायांना मुंग्या येत असतील, तर मात्र रक्ताभिसरण संस्थेचे सर्व्हिसिंग करणे गरजेचेच आहे हे लक्षात घ्या. कारण जिथे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होत नाही तिथे एकतर मुंग्या येतात, सूज येते किंवा वेदना होतात.
तुम्ही मांडी घालून बराच वेळ बसला तर पायांना मुंग्या येतात. पाय दुखतातही. मात्र जेव्हा तुम्ही उठता, पाय झटकता, चालायला लागता तेव्हा मुंग्या निघून जातात, वेदनाही थांबतात. कारण जेव्हा तुम्ही मांडी घातलेली असते तेव्हा पायांची घडी पडल्यामुळे तिथले रक्ताभिसरण मंदावते, व्यवस्थित होत नाही. त्यामुळेच मुंग्या येतात आणि वेदना होतात. लांबच्या प्रवासात एकाच ठिकाणी एकाच स्थितीत बराच वेळ बसल्यामुळे पायांना सूज आल्याचा अनुभव कित्येकांनी घेतला असेल. कारण एकाच ठिकाणी, एकाच स्थितीमध्ये बराच वेळ बसल्यामुळे, हालचाल नसल्यामुळे रक्ताभिसरण मंदावते व पायांना सूज येते. म्हणजेच निष्कर्ष काय, तर जिथे रक्त व्यवस्थित पोहोचत नाही तिथे एक तर मुंग्या येतात, सूज येते किंवा वेदना होतात. आणि अशी लक्षणं म्हणजे हृदयविकार, अर्धांगवायू अशा मोठ्या आजारांची प्राथमिक लक्षणं असू शकतात. हे लक्षात घेऊन जर आपण आपल्या दिनचर्येत व्यायामाचा समावेश केला आणि तेलकट-तुपकट खाणे कमी करणे, नियमित गरम पाणी पिणे असा सवयीत योग्य तो बदल केला तसेच किमान सहा महिन्यांतून एकदा वेळोवेळी आपल्या रक्ताभिसरण संस्थेचे सर्व्हिसिंग केले तर हृदयविकार, अर्धांगवायू अशा जीवघेण्या आजारांपासून आपण निश्चितच दूर राहू शकता.
रक्ताभिसरण संस्थेचे सहा महिन्यांतून एकदा किंवा किमान वर्षातून एकदा तरी सर्व्हिसिंग करण्याने तुम्हाला भविष्यात कधीच हृदयविकार, अर्धांगवायू असे रक्ताभिसरण संस्थेशी निगडित मोठे आजार होणार नाहीत. कारण आपण जे तेलकट खातो त्यामुळे आपल्या शरीरात कोलेस्टेरॉल क्रीस्टल तयार होतात, व्यायाम व शारीरिक श्रमांचा अभाव असल्यामुळे रक्तात ब्लड फॅट तयार होते. शिवाय आज प्रदूषित अन्न-हवा-पाणी यामुळे आपल्या शरीरात अनेक विषारी द्रव्ये जातच असतात. हे कोलेस्टेरॉल क्रिस्टल, ब्लड फॅट व विषारी द्रव्ये रक्तात आल्यामुळे रक्त घट्ट होते. त्यामुळे ते व्यवस्थित सर्क्युलेट होत नाही. त्यामुळे जिथे पोहोचत नाही तिथे एकतर मुंग्या येतात, सूज येते किंवा वेदना होतात.
कालांतराने हे जे कोलेस्टेरॉल क्रिस्टल आहे, ब्लड फॅट आहे, विषारी द्रव्ये आहेत ते तुमच्या रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये चिटकून तिथं त्याचा एक थर तयार होतो. त्यामुळे आपल्या रक्तवाहिन्या अरुंद होतात. मग पाण्याच्या पाईपला पुढे बोट लावले, तर पाणी जसे प्रेशरने पुढे जाते तसे आपल्या रक्तवाहिन्या अरुंद झाल्या की रक्तसुद्धा प्रेशरने वाहायला लागते व डॉक्टर जेव्हा आपला रक्तदाब मोजतात तेव्हा तो वाढलाय असं लक्षात येतं आणि रक्तदाबाची लोपथची गोळी चालू होते. ही लोपथची गोळी फक्त रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी असते त्यामुळे ती दररोज नियमितपणे घ्यावीच लागते. कालांतराने गोळीचा डोस वाढवावा लागतो, रक्त पातळ होण्याची गोळी वाढवावी लागते, पुढे या गोळ्यांचा साईड इफेक्ट म्हणून व्हिटामिन बी-कॉम्प्लेक्सची कमतरता होते व हाता-पायांना मुंग्या यायला लागतात, चक्कर आल्यासारखे वाटते म्हणून व्हिटामिन बी-कॉम्प्लेक्सची, मल्टिव्हिटामिनची गोळी वाढवली जाते. शिवाय होणारे अन्य साईड इफेक्ट वेगळेच.