

तुम्हाला माहीत आहे का, की तुमच्या घरातल्या मसाल्याच्या डब्यात असलेली दालचिनी वजन कमी करायला पण मदत करू शकते? हो, जर तुम्ही ती योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने घेतली, तर वजन कमी करण्याच्या तुमच्या प्रवासात ती नक्कीच फायदेशीर ठरू शकते. आपल्या भारतीय घरांमध्ये दालचिनीचा वापर वर्षानुवर्षे होत आला आहे.
कधी चहाचा स्वाद वाढवण्यासाठी, तर कधी भाजीला सुगंध येण्यासाठी. अनेक संशोधनांमध्येही हे सिद्ध झालंय की दालचिनी आपली पचनशक्ती (Metabolism) वाढवते. त्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते.
दालचिनीमध्ये 'सिनामल्डिहाइड' नावाचा एक खास घटक असतो, ज्यामुळे तिला एक वेगळा सुगंध आणि हलकासा तिखटपणा येतो. चला तर मग, जाणून घेऊया की दालचिनी वजन कमी करण्यासाठी कशी मदत करते आणि ती घेण्याची योग्य पद्धत कोणती?
जेव्हा आपल्या रक्तातील साखर (Blood Sugar Level) सारखी वर-खाली होते, तेव्हा आपल्याला सारखी भूक लागते आणि गोड खावंसं वाटतं. दालचिनी ही शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवायला मदत करते, ज्यामुळे सारखं खाण्याची इच्छा होत नाही. २०२० मध्ये झालेल्या एका अभ्यासात असं दिसून आलं की, जर रोज जवळपास ३ ग्रॅम दालचिनी १२ आठवड्यांसाठी घेतली, तर इन्सुलिन आणि कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारते आणि वजन नियंत्रणात राहतं.
पाव चमचा किंवा अर्धा चमचा दालचिनी पावडर तुम्ही कोमट पाण्यात, हर्बल टीमध्ये, स्मूदी, ओट्स किंवा फळांवर टाकून घेऊ शकता.
नेहमी सिलोन दालचिनी (Ceylon Cinnamon) वापरा, जिला 'खरी दालचिनी' असंही म्हणतात. बाजारात मिळणारी दुसरी 'कॅसिया दालचिनी' जास्त प्रमाणात वापरल्यास त्यात असलेल्या 'कौमारिन' नावाच्या घटकामुळे शरीराला नुकसान होऊ शकतं.
दालचिनी तशी तर खूप आरोग्यदायी आहे, पण ती जास्त प्रमाणात खाणं धोकादायक ठरू शकतं.
यामुळे लिव्हर खराब होऊ शकतं.
तोंडात जळजळ किंवा फोड (तोंड येणे) येऊ शकतात.
जे लोक मधुमेहाची (डायबिटीज) गोळी घेतात, त्यांची शुगर खूपच कमी होऊ शकते.
दालचिनी म्हणजे वजन कमी करण्याची कोणतीही जादूची कांडी नाही. पण जर तुम्ही चांगला आहार, नियमित व्यायाम आणि योग्य जीवनशैलीसोबत दालचिनीचा वापर केला, तर तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात ती नक्कीच मदत करू शकते. तरीही, तुमच्या आहारात याचा समावेश करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.